मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान| जन्मभूमीचे गीत कीर्तन आख्यान भद्रायुचरित्राख्यान भीम भक्तिचरित्राख्यान चंद्रहासाख्यान श्री दासगणु महाराजांची आख्याने मार्कंडेयाख्यान मयूरध्वजाख्यान सेना न्हावी आख्यान वत्सलाहरण जन्मभूमीचे गीत गोपीचंदाख्यान निरुपण नामदेवनिरुपण प्रल्हाद चरित्र राकाबंकाचरित्र. याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी याज्ञवल्क्य संवाद येशु चरित्र श्री एकनाथ चरित्र साक्रेटीसचें चरित्र धर्माख्यान भक्तिपर पद्यें धर्माख्यान अर्जुनतीर्थयात्राख्यान सीताहरणाख्यान बकासुराख्यान बृहस्पतिताराख्यान उषाख्यान भीष्मप्रतिज्ञाख्यान बभ्रुवाहनाख्यान सुलोचनागहिंवराख्यान लक्ष्मणशक्तिआख्यान वालीताराख्यान वृंदाजालंदराख्यान जयद्रथगर्वहरणाख्यान ध्रुवाख्यान गोपीचंदाख्यान कचोपाख्यान सावित्री आख्यान नरनारायणाख्यान अंबरीषाख्यान सुदामाख्यान दामाजीपंताचें आख्यान चंद्रहासाख्यान जन्मभूमीचे गीत कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते. Tags : akhyankirtanliteratureआख्यानकीर्तनसाहित्य जन्मभूमीचे गीत Translation - भाषांतर जन्मभूमीचे गीत प्रसिद्ध पंडिता रमाबाई यांच्या विनंतीवरुन हे गीत मुंबईस "शारदासदन" स्थापन समारंभाच्या वेळी (१८९८ साली) गाण्यासाठी आयत्या वेळी तयार करुन दिले. ना.वा.मो.आहा मम देश भूमि ।प्रिय पितृ जन्म भूमि ।तुझें गीत गाईन मी ।आवडीनें माते ॥१॥नभस्पृष्ट गिरिकूटें ।रम्य महा नदी तटें ।आम्हां तव शोभा वाटे ।अनुपम माते ॥२॥तव वनें उपवनें ।सदा सुगंधि सुमने ।सुस्वरित पक्षी गानें ।उल्हासती माते ॥३॥मधुर संस्कृत वाणी ।काव्य रत्नें कविगणीं ।मंडित पाहूनि मनीं ।तोष होय माते ॥४॥ऋषि ज्ञान विलसित ।धर्मवृक्ष कुसुमित ।नाना दिव्य फलयुक्त ।शोभताती माते ॥५॥सुलभा गार्गी मैत्रेयी ।भैमी सावित्री वैदेही ।धन्या तारा मिराबाई ।कन्या तव माते ॥६॥धीरोदार महाशूर ।तव पुत्र धुरंदर ।राम भीष्म पार्थवीर ।वीरसू तूं माते ॥७॥काळचक्रें तयांप्रति ।लागे भोगणें विपत्ति ।तैशीच ही तव स्थिती ।कांही काळ माते ॥८॥तुझ्या ऐश्वर्याची कीर्ति ।ऐकूनि जे वाखाणिती ।तेच आज कठोरोक्ति ।बोलती तुज माते ॥९॥भाग्यसूर्य मावळला । येईलचि उदयाला ।ऐसा निश्चय चित्ताला ।धीर देतो माते ॥१०॥आम्हीं तुझीं बाळें सर्व ।हरुं तव शत्रुगर्व ।ऐसें येऊ महापर्व ।प्रार्थू देवा माते ॥११॥तुझ्या सेवेलागीं जाण ।अर्पूनियां धन प्राण ।सिद्ध असों थोर सान ।सकळहीं माते ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : December 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP