मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान| याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी कीर्तन आख्यान भद्रायुचरित्राख्यान भीम भक्तिचरित्राख्यान चंद्रहासाख्यान श्री दासगणु महाराजांची आख्याने मार्कंडेयाख्यान मयूरध्वजाख्यान सेना न्हावी आख्यान वत्सलाहरण जन्मभूमीचे गीत गोपीचंदाख्यान निरुपण नामदेवनिरुपण प्रल्हाद चरित्र राकाबंकाचरित्र. याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी याज्ञवल्क्य संवाद येशु चरित्र श्री एकनाथ चरित्र साक्रेटीसचें चरित्र धर्माख्यान भक्तिपर पद्यें धर्माख्यान अर्जुनतीर्थयात्राख्यान सीताहरणाख्यान बकासुराख्यान बृहस्पतिताराख्यान उषाख्यान भीष्मप्रतिज्ञाख्यान बभ्रुवाहनाख्यान सुलोचनागहिंवराख्यान लक्ष्मणशक्तिआख्यान वालीताराख्यान वृंदाजालंदराख्यान जयद्रथगर्वहरणाख्यान ध्रुवाख्यान गोपीचंदाख्यान कचोपाख्यान सावित्री आख्यान नरनारायणाख्यान अंबरीषाख्यान सुदामाख्यान दामाजीपंताचें आख्यान चंद्रहासाख्यान याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते. Tags : akhyankirtanliteratureआख्यानकीर्तनसाहित्य याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी Translation - भाषांतर कीर्तनानुक्रम.पद---- भ्रमे भरें भुललासी सावध । मानवी मागुती नये कायारे सावध ॥धृ.॥ देह गेह सुतधन जायारे सावध ॥ जायांची ही सांदी यांची मायारे सावध ॥१॥भ्रमे भरें. ॥ शिकविति निजगुज श्रुतीरे सावध ॥ षट् शास्त्र श्रवणी गोडी लागोरे सावध ॥२॥भ्रमे भरे . ॥ धरीं धरीं संत संगी प्रीतीरे सावध ॥ देहाचिया काय केली मातीरे सावध ॥३॥भ्रमे भरे. ॥ तुज करुं विनंति मी किती हो सावध ॥ तेणे रंगी निजानंदी जोडी रे सावध ॥४॥ भ्रमे भरे. ॥भ्रमलक्षण.ओंवी --- धन पुत्र आणि दारा ॥ इतुकाचि मानूनि थारा ॥ विसरोनी गेला ईश्वरा । तो एक मूर्ख ॥१॥परमार्थ संसारी तारक ॥ परमार्थ जन्माचे सार्थक । परमार्थ संसारी तारक ॥ परमार्थ दाखवी परलोक ॥ धार्मिकासी ॥२॥असो भगवत्प्राप्तीविण । करी संसाराचा शीण ॥ त्या मूर्खाचे मुखावलोकन । करुंच नये ॥३॥नरदेहाचा दुरुपयोग.श्लोक--- प्राप्य चाप्युत्तमं जन्म. ॥घातक: ॥१॥पद--- दैवें नरतनू सांपडली । मूढा तुज कशि भुल पडली ॥१॥अमूल्य आयुष्य जातें रे । कां करितोसि मातेरें ॥२॥मोह मदें बा कां भुलशी ॥ काळ व्याळ गिळी तुजशी ॥३॥ शिवदिन सांगे मृदुवचनें । सावध होई श्रुतिवचनें ॥४॥श्लोक ---- आत्मक्रीड आत्मरति: क्रियावानेघ ब्रम्हविदां वरिष्ठ: ॥देहभंगुरत्व. श्लोक --- ईश्वरोऽहमहं भोगी । आत्मसंभाविता: स्तब्धा: धनमानमदान्विता: । इत्यज्ञानविमोहिता: ॥ ओवी ---- मी मनें वाचा देहें । करि तें कैसे नोहे ॥ कें मज वांचोनि आहे । आज्ञा सिद्ध आन ॥१॥माझिया कुळाचा उजाळू । कां जातीगोतांचा मेळू ॥ पाहतां ब्रम्हाही हळू । उणाचि असे ॥१॥अभंग --- देह हें काळाचे वित्त कुबेराचें ॥ बा अंतकाळाचे कोणी नाहीं ॥१॥ओंवी --- ऐसें शरीर बहुतांचे ॥ हें मूर्ख म्हणे आमुचें ॥ परंतु खाजें जीवाचे । तापत्रयी बोलिले ॥१॥देह परमार्थी लाविले । तरीच याचें सार्थक झालें ॥ नाही तरी व्यर्थची गेले । ना आघाते मृत्युपंथे ॥१॥गृहाचे परकीयत्व.ओवी--- मृत्तिका खणोन निघर केले । ते माझे असें दृढ कल्पिलें ॥ परी हें बहुतांचे कळलें । नाहींच तयाशी ॥१॥ऐसी गृहाचि स्थिती । मिथ्या आली आत्मप्रतीती ॥ जन्मो दों दिवसांची वस्ति। कोठे तरी करावी ॥२॥कुपुत्र.श्लोक --- यस्य पुत्रो नवै विद्वन्न शूरो न च धार्मिक: ॥ अप्रकाशं कुलं तस्य नष्टचंद्रेण शर्वरी ॥१॥धनचंचलत्व.श्लोक --- हे लक्ष्मि क्षणिके स्वभावचपले मूढे च पापेऽचमे । न त्वं चोत्तमपात्रमिच्छसि खले प्रायेण दुश्चारिणि ॥ ये देवार्चनसत्यशौचनिरता ये चापि धर्मे रता । स्तभ्यो लज्जसि निर्दये गतमतिनीचो जनो वल्लभ: ॥१॥अभंग --- धनवंतालागीं । सर्वमान्यता हे जगीं ॥१॥मातापिता बंधुजन । सर्व मानिती वचन ॥२॥जंव चाले मोठा धंदा । तव बहीण म्हणे दादा ॥३॥सदा श्रृंगार भूषणे । कांता लवे बहुमानें ॥४॥तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत जाण ॥५॥श्लोक --- धनानि भूमौ । गच्छति जीव एक: ॥१॥श्रुतिबोध.श्लोक---यस्मिन् द्यो: पृथिवी । अमृतस्यैष सेतु: ॥१॥यत्सर्वज्ञ: सर्वविद्यस्यैष । यद्विभाति ॥२॥भिद्यते हृदयग्रंथि तस्मिन्दष्टे परावरे ॥३॥सत्संगति.अभंग --- काय बानूं आता संताचे उपकार । तैसे मज येती सांभाळीत ॥१॥श्लोक --- सदा सर्वदा सज्जनाचेंनि संगे । तुटे वाद संवाद तो हितकारी ॥१॥अभंग --- शरण जावें संतजना । सत्य मानावें निर्गुणा ॥१॥नानमती काय चाड । करणें सत्याचा निवाड ॥२॥ज्ञान भक्तीनें शिणवावें । भक्ति तयेसि म्हणावें ॥३॥रामी रामदास सांगे । सर्वकाळ संतसंगे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP