मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें| ६१ ते ६५ रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें १ ते ३ ४ ते ६ ७ ते ९ १० ते १३ १४ ते १७ १८ ते २१ २२ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० ६१ ते ६५ ६६ ते ७० ७१ ते ७५ ७६ ते ८० ८१ ते ८५ ८६ ते ९० ९१ ते ९५ ९६ ते १०० १०१ ते १०५ १०६ ते ११० १११ ते ११५ ११६ ते १२० ११६ ते १२४ लक्षणे - ६१ ते ६५ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ लक्षणे - ६१ ते ६५ Translation - भाषांतर ६१सर्व धर्म कर्म हातींचें सांडावें । सत्वर धुंडावें शाश्वतासे ॥१॥शाश्वतासी ठाईं पाडावें विवेके । निरूपणें येकें साधुसंगें ॥२॥साधुसंगें बोध साधूनीयां घ्यावा । वेगची करावा चमत्कार ॥३॥चमत्कारें आतां प्रचीत बाणावी । स्थिती वोळखावी सज्जनाची ॥४॥सज्जनाची स्थिती सज्जन जाणती । साधकांसी गजी दास म्हणे ॥५॥ ६२तीर्थें व्रतें तपें ज्यालागी शिणावें । त्यासी कां नेणावें विवेकानें ॥१॥विवेकानें अविवेकची करावा । निस्चयो धरावा बहुविधा ॥२॥बहुविध जरी बाणला निश्चयो । त्यासी होये लयो वेळ नाहिं ॥३॥वेळ नाहिं बहु रूप संव्हारतां । शाश्वत पाहतां आडळेना ॥४॥आडळेना जंव दिसेना लोचना । ठाउकें सज्जना दास म्हणें ॥५॥६३सृष्टीची रचना सर्वत्र पाहाती । विवेकें राहाती ऐसे थोडे ॥१॥ऐसे थोडे जन जया आत्मज्ञान । नित्य निरंजन वोळखीला ॥२॥वोळखीला देव वोळखीला भक्त । वोळखीला मुक्त योगीराज ॥३॥योगीयांसी योग आहे निरंतर । वियोगें इतर वर्तताती ॥४॥वर्तताती ऐसें कदा न करावें । सार्थक करावें दास म्हणे ॥५॥६४सृष्टी नांदताहे सर्व लोक पाहे । तयांवरी आहे परब्रह्म ॥१॥परब्रह्म आहे निर्मळ निश्चळ । चंचळ चपळ सृष्टी नांदें ॥२॥सृष्टी नांदें तेंची शोधवें अंतर । नित्य निरंतर वोळखावें ॥३॥वोळखावें निजगुज वेदबीज । सहजीं सहज सदोदीत ॥४॥सदोदीत देव येर सर्व माव । ऐसा अभिप्राव दास म्हणे ॥५॥६५माझा कुळस्वामी कैलासीचा राजा । भक्तांचीया काजा पावतसे ॥१॥पावतसे दश भुजा उचलून । माझा पंचानन कईवारी ॥२॥कैवारी देव हा व्याघ्राच्या स्वरूपें । भूमंडळ कोपें जाळूं शके ॥३॥जाळूं शके सृष्टी उघडीतां दृष्टी । तेथे कोण गोष्टी इतरांची ॥४॥इतरांची शक्ती शंकराखालती । वांचविली क्षिती दास म्हणे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP