मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें| ३१ ते ३५ रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें १ ते ३ ४ ते ६ ७ ते ९ १० ते १३ १४ ते १७ १८ ते २१ २२ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० ६१ ते ६५ ६६ ते ७० ७१ ते ७५ ७६ ते ८० ८१ ते ८५ ८६ ते ९० ९१ ते ९५ ९६ ते १०० १०१ ते १०५ १०६ ते ११० १११ ते ११५ ११६ ते १२० ११६ ते १२४ लक्षणे - ३१ ते ३५ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ लक्षणे - ३१ ते ३५ Translation - भाषांतर ३१छत्रसुखासनी अयोध्येचा राजा । नांदतसे माझा मायबाप ॥१॥माझा मायबाप त्रिलोकीं समर्थ । सर्व मनोरथ पूर्ण करी ॥२॥पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा । नाथ अनाथांचा स्वामी माझा ॥३॥स्वामी माझा राम योगियां विश्राम । सांपडले वर्म थोर भाग्य ॥४॥थोर भाग्य ज्याचें राम त्याचें कुळी । संकटीं सांभाळीं भावबळें ॥५॥भावबळें जेहीं धरिला अंतरीं । तया क्षणभरी विसंबेना ॥६॥विसंबेना कदा आपुल्या दासासी । रामी रामदासीं कुळस्वामी ॥७॥३२काया हे काळाची घेऊनी जाणार । तुझेनी होणार काय बापा ॥१॥काय बापा ऐसें जाणोनी नेणसी । मी माझें म्हणसी वायावीण ॥२॥वायावीण शीण केला जन्मवरी । दंभ लोकाचारी नागवण ॥३॥नागवण आली परलोका जातां । लोकिक तत्वता येंही लोकीं ॥४॥केली नाहिं चिंता नामीं कानकोडें । आतां कोण्या तोंडें जात आहे ॥५॥जात आहे सर्व सांडूनि करंटा । जन्मवरी ताठा धरूनियां ॥६॥धरूनीयां ताठा कासया मरावें । भजन करावें दास म्हणे ॥७॥३३पूर्ण समाधान इंद्रियदमन । श्रवण मनन निरंतर ॥१॥निरंतर ज्याचे हृदई विवेक । उपासना येत कोची धन्य ॥२॥धन्य तोचि येक संसारीं पाहातां । विवेकें अनंता ठाइं पाडी ॥३॥ठाईं पाडी निजस्वरूप आपुलं । असोनी चोरलें जन्मोजन्मीं ॥४॥जन्मोजन्मीं केलें पुण्य बहुसाल । तरीच घडेल संतसंग ॥५॥संतसंग जया मानवा आवडे । तेणें गुणें घडे समाधान ॥६॥समाधान घडे सज्जनाच्या संगें । स्वरूपाच्या योगें रामदासीं ॥७॥३४साधु आणी भक्त व्युत्पन्न विरक्त । तपोनिधी शांत अपूर्वता ॥१॥अपूर्वता जनीं शुद्ध समाधानी । जनाचे मिळणीं मिळों जाणें ॥२॥मिळों जाणे जना निर्मळवासना । अंतरिं असेना निंदाद्वेष ॥३॥निंदाद्वेष नसे जनीं लक्ष असे । जेथें कृपा वसे सर्वकाळ ॥४॥सर्वकाळ जेणें सार्थकीं लाविला । वंश उद्धरीला नामघोषें ॥५॥नामघोष वाचे उच्चारीं सर्वदा । संतांच्या संवादा वांटेकरी ॥६॥वाटेकरी जाला सायुज्यमुक्तीचा । धन्य तो दैवांचा दास म्हणे ॥७॥३५विश्रांतीचें स्थळ स्वरूप केवळ । द्वैततळमळ जेथें नाहिं ॥१॥जेथें नाहिं काया नाहिं मोह माया । रंका आणी राया सारिखेंची ॥२॥सारिखेंची सदा सर्वदा स्वरूप । तेंच तुझें रूप जाण बापा ॥३॥जाण बापा स्वयें तूंची आपणासी । सोहंस्मरणासी विसरतां ॥४॥विसरतां सोहं स्मरण आपुलें । मग गुंडाळलें मायाजाळीं ॥५॥मायाजाळीं तुझा तूंची गुंतलासी । यातना भोगिसि नेणोनीयां ॥६॥म्हणोनीयां होईं सावध अंतरीं । सोहं दृढ धरीं दास म्हणे ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP