लक्षणे - ११६ ते १२४

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


१२१
राम माझी माये कै भेटईल । वोरसें देईल आळिंगन ॥१॥
संसारीचें दुःख दाटलें मानसीं । तें मी तुजपासीं सांगईन ॥२॥
उतावेळ चित्त उभारूनी बाहे । रामदास पाहे वाट तुझी ॥३॥

१२२
स्वप्न वाटे सार तैसा हा संसार । पाहातां विचार कळों लागे ॥१॥
स्वप्न वेगीं सरे संसार वोसरे । लालुचीच उरे दोहिकडे ॥२॥
दास म्हणे निद्राकाळीं स्वप्न खरें । भ्रमिष्टासी बरें निद्रासुख ॥३॥

१२३
गर्भवासीं दुःख होत वनितासीं । काय पुरूषासी दुःख नाहिं ॥१॥
दुःख नाहिं नरा त्रिविध तापाचें । किंवा मरणाचें दुःख नाहिं ॥२॥
दुःख नाहिं ऐसा कोण आहे जन । सर्व पराधीन दास म्हणे ॥३॥

१२४
सोरठीचा देव माणदेशा आला । भक्तीसी पावला सावकास ॥१॥
सावकास जाती देवाचे यात्रेसी । होती पुण्यरासी भक्तिभावें ॥२॥
भक्तिभावें देव संतुष्ट करावा । संसार करावा दास म्हणे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP