लक्षणे - ४ ते ६

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  



संसार करीतां म्हणती हा दोषी । न करीतां आळसी पोटपोसा ॥१॥
ऐसा हा लोकीक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥२॥
भक्ती करूं जातां म्हणती हा पसारा । न करीतां नरा निंदिताती ॥३॥
आचारें आसतां म्हणती नाक धरी । येर अनाचारी पापरूपी ॥४॥
सत्संग धरीतां म्हणती हा उपदेसी । येर अभाग्यासी ज्ञान कैंचें ॥५॥
अभाग्यासी म्हणती ठाईंचा करटा । समर्थासी ताठा लावीतसे ॥६॥
बहु बोलों जातां म्हणती हा वाचाळ । न बोलतां सकळ म्हणती गर्वीं ॥७॥
’भेटिस नवजातां म्हणती हा निष्ठुर । जातां म्हणती घर बुडविलें ॥८॥
धर्म न करीतां म्हणती हा संचीतो । करीतां काढीतो दिवाळें कीं ॥९॥
लग्न करूं जातां म्हणती हा मातला । न करीता जाला नपुंसक ॥१०॥
निपुत्रिकां म्हणती पाहा हा चांडाळ । पातकांचें फळ पोरवडा ॥११॥
’मुखें नाम घेतां करीती टवाळी । न घेतां ढवाळी सर्वकाळ ॥१२॥
दिसां मरों नये रात्री मरों नये । कदां सरों नये मागांपुढां ॥१३॥
मर्यादा धरीतां लाजाळू चोखट । न धरीतां धीट म्हणती लोक ॥१४॥
लोक जैसा वोक धरीतां धरेना । अभक्ती सरेना अंतरीची ॥१५॥
दास म्हणे मज तुझाची आभार । दुस्तर संसार तरीजेल ॥१६॥


होणार तें कांहीं आतां पालटेना । तरी चिंत मना कां करीसी ॥१॥
नादाबिंदा भेटी जाली जये काळीं । तेव्हांची कपाळीं लीहीयेलें ॥२॥
हानी मृत्यु लाभ होणार जाणार । सर्वही संसार संचीताचा ॥३॥
लल्लाटीं लीहिलें होउनीयां गेलें । संचीत भोगीलें पाहिजे तें ॥४॥
त्यागूनीया देश सेवीला विदेश । तरी सावकास भोगप्राप्ती ॥५॥
सुखाचा आनंद दुखें होये खेद । ऐसे दोनी भेद पुरातन ॥६॥
देहाचें निमीत्य चुकवितां नये । आतां चिंता काये करूनीयां ॥७॥
त्रैलोक्य त्यागावें तर्‍हीं तें भोगावें । प्राचीन सांगावें कोणापासीं ॥८॥
प्रालब्ध चुकेना ब्रह्मादिकांचेनी । सर्व देवयानि भोगीयेलें ॥९॥
भोगीयेलें देव दानव मानव । किन्नर गंधर्व लोकपाळ ॥१०॥
प्राप्त पालटाया बहु प्रेत्न केले । परी पालटीले नाहीत कीं ॥११॥
रावण वोहर आणी कंसासुर । परीं तें होणार होत आहे ॥१२॥
पुत्राचेनी सळें जालीं नागकुळें । सुटेना कपाळें परीक्षीती ॥१३॥
ऐसे थोर थोर सांगतां अपार । भोगीलें साचार होणारातें ॥१४॥
होणार तें आहे देहाचा समंध । रामदासीं बोध देहातीत ॥१५॥


कोणाचें हें घर कोणाचा संसार । सांडुनी जोजार जाणें लागे ॥१॥
जाणें लागे अंतीं येकलें सेवट । व्यर्थ खटपट सांडुनियां ॥२॥
जन्मवरी देहे संसारी गोविलें नाहिं काहिं केलें आत्महित ॥३॥
आत्महित गेलें संसाराचे वोढी । अंती कोण सोडी रामेंवीण ॥४॥
रामेंवीण कोण्ही सोडविना अंतीं । वायांची रडती जिवलगें ॥५॥
जिवलगीं राम दुरी दुर्‍हाविला । विचार आपुला जाणवेना ॥६॥
जाणवेना पूर्व सुकृतावांचुनी । पापीयाचे मनीं राम कैचा ॥७॥
राम कैचा तया लोकिकांची चाड । पुरविती कोड संसाराचें ॥८॥
संसाराचें कोड तेंचि वाटे गोड । जया नाहिं वाड अनुतप ॥९॥
अनुतापी जाले संसारीं सुटले । राजे राज्य गेले सांडुनीयां ॥१०॥
सांडुनीयां गेले वैभव संपत्ती । पुढें यातायातीचेनी भेणें ॥११॥
भेणें ते शरण रीघाले देवासी । नेले वैकुंठासी भक्तराज ॥१२॥
भक्तराज भावें भेटले देवासी । रामीरामदासीं धन्य वेळा ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP