लक्षणे - ९१ ते ९५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


९१
स्मरण स्मररिपूचें वीषहर्तें वपूचें निज बिज निगमाचें सार सर्वांगमाचें । मथन त्रिभुवनाचें गूज योगीजनांचें जिनव जड जिवांचें नाम या राघवाचें ॥१॥

९२
त्रैलोक्याचें सार वेदा अगोदर । मथुनी साचार काढियेलें ॥१॥
ते हे संत जन सांगती सज्जन । अन्यथा वजन मानूं नये ॥२॥
जें या विश्वजना उपेगासी आलें । बहुतांचें जाले समाधान ॥३॥
रामी रामदासीं राघवीं विश्वास । तेणें गर्भावास दुरी ठेला ॥४॥

९३
नको गद्यपद्यादिकें शब्दज्ञानें नको तर्क साहित्य देहाभिमानें । नको मंत्रयंत्रादि पूजाविधानें नको योगयागादिके धूमेमाने ॥१॥

९४
चढे वैभवे फुंज ज्ञातेपणाचा तेणें अंतरे स्वामि लोकत्रयाचा । म्हणोनी बहू आवडी त्या जनाची जेथें साबडी भक्ति सर्वोत्तमाची ॥१॥

९५
तत्वमसि महावाक्याचा उपदेश । पाहिला निरास चौं देहांचा ॥१॥
तयामधें सार मानली साचार । भक्ती निरंतर राघवाची ॥२॥
कुंडलिनी गोल्हाट श्रीहट त्रिकुट । आणि मूळपीठ ब्रह्मरंध्र ॥३॥
मंत्र तंत्र मुद्रा आसन समाधी । दास म्हणे बुद्धी देखण्याची ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP