मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें| ७६ ते ८० रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें १ ते ३ ४ ते ६ ७ ते ९ १० ते १३ १४ ते १७ १८ ते २१ २२ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० ६१ ते ६५ ६६ ते ७० ७१ ते ७५ ७६ ते ८० ८१ ते ८५ ८६ ते ९० ९१ ते ९५ ९६ ते १०० १०१ ते १०५ १०६ ते ११० १११ ते ११५ ११६ ते १२० ११६ ते १२४ लक्षणे - ७६ ते ८० समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ लक्षणे - ७६ ते ८० Translation - भाषांतर ७६श्रवण ह्मणिजे ऐकतची जावें । बरें विवरावें ग्रन्थांतरीं ॥१॥ग्रन्थांतरीं कळे तें मुखें बोलावें । कीर्तन जाणावें याचें नंव ॥२॥नांव घ्यावें साचें सर्वदा देवाचें । तिसरें भक्तीचे लक्षण हे ॥३॥लक्षण चौथीचें तें ऐसे जाणावें । पाउले सेवावें सद्गुरूचे ॥४॥गुरूदेवपूजा तेची ते अर्चन । साहावें वंदन नमस्कार ॥५॥नमस्कार कीजे सर्व दास्यभावें । भक्तीचें जाणावें लक्षण हें ॥६॥लक्षण हें सख्य आठवें भक्तीचें । सांगावें जीवीचें देवापासीं ॥७॥देवापासी होतां उरेना मीपण । आत्मनिवेदन रामदासीं ॥८॥७७आरंभी वंदीन बिघ्नविनाशक । मुख्य देव येक कळावया ॥१॥कळावया कांहिं आपुलें स्वहीत । सत्क्रिया विहित वेदाधारें ॥२॥वेदाधारें क्रिया ज्ञान प्रचीतीचें । तरीच मनाचें समाधान ॥३॥समाधान होतें श्रवणमननें । सगुणभजनें अनुतापें ॥४॥अनुतापें त्याग तोची येक योग । देवाचा संयोग दास म्हणे ॥५॥७८जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी । निसंदेह मनीं सर्वकाळ ॥१॥मिथ्या देहभान प्रारब्धा आधीन । राखे समाधान पूर्णपणें ॥२॥आवडिनें करी कर्मउपासना । सर्वकाळ ध्यानरूढ मन ॥३॥जाणे ब्रह्मज्ञान स्वयें उदासीन । मानितो वमन द्रव्यदारा ॥४॥पदार्थाची हाणी होतां नये कोणी । जयाची करणी बोलाऐसी ॥५॥दास म्हणे धन्य सर्वांसी जो मान्य । जयाचा अनन्य समुदाव ॥६॥७९जाणावा तो योगी सदा वीतरागी । अहंभाव त्यागी अंतरींचा ॥१॥स्वजन स्वदेश सांडुनि उदास । तेणें आशापाश तोडियेला ॥२॥रमा सरस्वती वैभव व्यत्पत्ती । ज्ञानबळें चित्तीं चाड नाहीं ॥३॥पूर्णी पूर्णकाम तेणें जो निःकाम । विषयांचा श्रम तुच्छ केला ॥४॥विवेकाचें बळ जाहलें प्रबळ । बाह्य मायाजाळ त्यागियेला ॥५॥धन्य तो पैं दास संसारी उदास । तया रामदास मानितसे ॥६॥८०लाज हे पापिणी लागलीसे पाठीं । तेणें नव्हे भेटी राघवाची ॥१॥राघवाची भेटी तरीच लाहिजे । कीर्तनीं राहिजे क्षण येक ॥२॥क्षण येक मन राघवीं असावें । दुश्चित नसावें सर्वकाळ ॥३॥सर्वकाल गेला देवा न भजतां । कैसे परी आतां परलोक ॥४॥परलोकीं पुण्यशीळ होती धन्य । रामदासी मान्य हरिभक्ती ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP