मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें| ५१ ते ५५ रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें १ ते ३ ४ ते ६ ७ ते ९ १० ते १३ १४ ते १७ १८ ते २१ २२ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० ६१ ते ६५ ६६ ते ७० ७१ ते ७५ ७६ ते ८० ८१ ते ८५ ८६ ते ९० ९१ ते ९५ ९६ ते १०० १०१ ते १०५ १०६ ते ११० १११ ते ११५ ११६ ते १२० ११६ ते १२४ लक्षणे - ५१ ते ५५ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ लक्षणे - ५१ ते ५५ Translation - भाषांतर ५१माझा स्वामी आहे संकल्पापरता । शब्दीं कैसी आतां स्तुती करूं ॥१॥स्तुतीं करूं जातां अंतरला दुरी । मीतूंपणा उरी उरों नेंदी ॥२॥उरों नेंदी उरी स्वामीसेवकपण । येकाकी आपणा ऐसें केलें ॥३॥केलें संघटण कापुरें अग्नीसी । तैसी भिन्नत्वासी उरी नाहीं ॥४॥उरी नायिं कदा रामी रामदासा । स्वयें होय ऐसा तोची धन्य ॥५॥५२जेथें तेथें देव नाहीं रिता ठाव । ऐसा माझा भाव अंतरीचा ॥१॥अंतरीचा देव अंतरीं जोडला । विकल्प मोडला येकसरा ॥२॥येकसरा लाभ जाला अकस्मात । ब्रह्म सदोदीत सर्वां ठायीं ॥३॥सर्वां ठाईं ब्रह्म पंचभूत भ्रम । साधुसंगें वर्म कळों आलें ॥४॥कळों आलें वर्म आत्मनिवेदनें । ज्ञानें समाधान रामदासीं ॥५॥५३संसारीचें दुःख बहुसाल होतें । तें जालें परतें विचारानें ॥१॥विचारानें सर्व संग वोरंगला । रामरंग जाल असंभाव्य ॥२॥असंभाव्य सुख मर्यादेवेगळें । विचाराच्या बळें तुंबळलें ॥३॥तुंबळलें सर्व चंचळ निश्चळ । द्वैत तळमळ तेथें नाहिं ॥४॥तेतें नाहिं दैन्य वस्तु सर्वमान्य । तयासी अनन्य देवदास ॥५॥५४माया हे असार वस्तु आहे सार । कळें विचार साधुसंगें ॥१॥साधुसंगें संग भंगे साधकांचा । सिद्ध साधकाचा होत आहे ॥२॥होतसे साधक बरें विवरतां । विवेकें थिरतां परब्रह्मीं ॥३॥परब्रह्मीं माया पाहातां दिसेना । येर निरसेना कांहीं केल्यां ॥४॥कांहिं केल्यां तरी कांहिं होत नाहिं । आत्मज्ञानें पाहिं दास म्हणे ॥५॥५५माझीया देहाचें सांडणें करीन । तुज वोवाळीन चारी देहे ॥१॥चारी देहे त्यांची व्यर्थ थानमानें । कुर्वंडी करणें देवराया ॥२॥देवराया जीवें प्राणें वोवाळीन । हृदईं धरीन रात्रंदिवस ॥३॥रात्रंदिवस मज देवाची संगती । तेची मज गती सर्वकाळ ॥४॥सर्वकाळ माझा सार्थक जाहला । देव सांपडला भक्तपणें ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP