मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें| ५६ ते ६० रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें १ ते ३ ४ ते ६ ७ ते ९ १० ते १३ १४ ते १७ १८ ते २१ २२ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० ६१ ते ६५ ६६ ते ७० ७१ ते ७५ ७६ ते ८० ८१ ते ८५ ८६ ते ९० ९१ ते ९५ ९६ ते १०० १०१ ते १०५ १०६ ते ११० १११ ते ११५ ११६ ते १२० ११६ ते १२४ लक्षणे - ५६ ते ६० समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ लक्षणे - ५६ ते ६० Translation - भाषांतर ५६माजा देहे तुज देखतां पडावा । आवडी हे जीवा फार आहे ॥१॥फार होती परी पुरली पाहातां । चारी देहे आतां हारपले ॥२॥हारपले माझे सत्य चारी देहे । आतां निःसंदेहे देहातीत ॥३॥देहातीत जाले देहा देखतांची । चिंतीलें आतांसी सिद्ध जालें ॥४॥सिद्ध जालें माझें मनीचें कल्पीलें । दास म्हणे आले प्रत्ययासी ॥५॥५७उतावेळ चित्त भेटीचें आरत । पुरवीं मनोरथ मायबापा ॥१॥रात्रंदिवस जीव लागलास झासा । उच्चाट मानसा वाटतसे ॥२॥पराधीन जीणें काये करूं रामा । नेईं निजधामा माहियेरा ॥३॥तुजवीण रामा मज कोण आहे । विचारूनी पाहे मायबाप ॥४॥रामी रामदास बहु निर्बुजला । मीतूपणा ठेला बोळउनी ॥५॥५८राघवाचें घरीं सदा निरूपण । श्रवण मनन निजध्यास ॥१॥निजध्यासें सत्य प्रचीत बाणली । साक्षात्कारें जाली सायुज्यता ॥२॥स्वायुज्यता मुक्ती विवेकें पाहावी । अंतरीं राहावी विचारणा ॥३॥विचारणा सारासार थोर आहे । अनुभवें पाहें साधका रें ॥४॥साधका रें साध्य तूंची तूं आहेसी । रामी रामदासीं समाधान ॥५॥५९ज्ञाता ज्ञान ज्ञेये ध्याता ध्यान ध्येये । बोधें साध्य होये साधक तो ॥१॥साधकु तो वस्तु होउनी राहिला । दृश्य द्रष्टा गेला हारपोनी ॥२॥हारपोनी गेलें कार्य तें कारण । ठाकलें मरण येणें जाणें ॥३॥येणें जाणें गेलें निरूपणासरिसें । ब्रह्म निजध्यास ब्रह्मरूप ॥४॥ब्रह्म रूपातीत अच्युत अनंत । दास म्हणे संतसंग धरा ॥५॥६०राजा सांडूनीया प्रजांचा सेवक । त्यासी कोणी येक रागिजेल ॥१॥रागेजेना कोण्ही राव वोळगतां । तैसें भगवंता वोळगावें ॥२॥वोळगावें भावें देवा निर्गुणा । भजतां गुणासी नाश आहे ॥३॥नाश आहे गुणा पाहावें निर्गुणा । योगियांच्या खुणा वोळखाव्या ॥४॥वोळखतां खूण श्रवण मननें । आत्मनिवेदनें दास म्हणे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP