मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें| ४१ ते ४५ रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें १ ते ३ ४ ते ६ ७ ते ९ १० ते १३ १४ ते १७ १८ ते २१ २२ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० ६१ ते ६५ ६६ ते ७० ७१ ते ७५ ७६ ते ८० ८१ ते ८५ ८६ ते ९० ९१ ते ९५ ९६ ते १०० १०१ ते १०५ १०६ ते ११० १११ ते ११५ ११६ ते १२० ११६ ते १२४ लक्षणे - ४१ ते ४५ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ लक्षणे - ४१ ते ४५ Translation - भाषांतर ४१देव त्वां घेतला मत्स्यअवतार । कासव डुकर कासयासी ॥१॥कासयासी देवें कपट करावें । खुजटची व्हावें बळीचेथें ॥२॥बळीचेथें नाना कपट करावें । मतेसी मारावे कासयासी ॥३॥कासयासी वाळी उगाची मारिला । मिथ्या शोक केला वनांतरीं ॥४॥वनांतरी शोक चोरी घरोघरीं । देव परद्वारी म्हणताती ॥५॥म्हणताती बोध्य जाला निःसंगळ । कलंकी दुरूळ दास म्हणे ॥६॥४२निरूपणीं जनीं लाभे सर्व काहिं दुजे ऐसें नाहिं पाहों जातां ॥१॥साराचेंही सर वेदां अगोचर । ते लाभे साचार निरूपणें ॥२॥दाखवीतां नये बोलिलें न जाये । त्याची कळे सोये निरूपणें ॥३॥मनासी नाकळे मीपणा नाडळे । तें गुज निवळे निरूपणें ॥४॥व्यत्पत्तीचें कोडें तर्काचें सांगडें । तें जोडें रोकडें निरुपणें ॥५॥मन हें चंचळ तें होय निश्चळ । साधनाचें फळ साद म्हणे ॥६॥४३तूं काय जालासी अगा निरंजना । आम्हां भक्तजना सांभालावें ॥१॥सांभाळावें सदा बाह्यअभ्यंतरीं । आम्हां क्षणभरी सोडूं नये ॥२॥सोडूं नको वायांगुप्त कां जालासि । देवा देखिलासी संतसंगें ॥३॥संतसंगें गुप्त होउनी पाहिलें । संगत्यागें जालें दरूशण ॥४॥दरूशण जालें तेची ते जाणती । नसोनी असती कल्पकोडी ॥५॥कल्पकोडी जाडी जाली निर्गुणाची । दास म्हणे कैची देहेबुद्धी ॥६॥४४माणसाचें ब्रह्म होतें कोणेपरी । ऐसं तूं विचारीं आलया रे ॥१॥आलया माणुस हें कोणा म्हणावें । बरें हें जाणावें शोधूनीयां ॥२॥शोधूनीयां पाहतां स्थूळाचा चाळक । सूक्ष्माचा येक मनप्राण ॥३॥मनप्राणेंविण हें कांहिं घडेना । हेंच आणा मना विवेकी हो ॥४॥विवेकी हो तुम्ही विवेक पाहावा । संसाराचा गोवा कोण करी ॥५॥कोण करीतसे सर्वहि करणी । दास निरूपणीं सावधान ॥६॥४५सावधान व्हावे विवेका पाहावें । वायोच्या स्व्भावें सर्व कांहिं ॥१॥सर्व कांहिं घदे वायोची करीतां । वायो पाहां जातां आडळेना ॥२॥आडळेना वायो आकाशीं विराला । कर्ता काय जाला अंतरीचा ॥३॥अंतरीचा सर्व विवेक पाहातां । ब्रह्मरूप आतां सहजची ॥४॥सहजची जालें विचारानें केलें । माणूस पाहीलें शोधुनीयां ॥५॥शोधुनी या जीत माणूस पाहावें । वर्म पडे ठावें दास म्हणे ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP