मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६३ वा| श्लोक ६ ते ९ अध्याय ६३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३६ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५३ अध्याय ६३ वा - श्लोक ६ ते ९ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते ९ Translation - भाषांतर बाणार्थे भगवान्रुद्रः सपुत्रैः प्रमथैर्वृतः । आरुह्य नंदिवृषभं युयुधे रामकृष्णयोः ॥६॥बाण रक्षावयाकारणें । षड्गुणैश्वर्यपरिपूर्णें । पुत्रेंसहित पार्वतीरमणें । केलें धावणें ते काळीं ॥७१॥सकळ सृष्टीतें रडविता । म्हणोनि रुद्र हे नामप्रथा । वृषभीं वळघूनियां त्वरिता । प्रमथें सहित पातला ॥७२॥बाण घालूनि पाठीसीं । स्वयें प्रवर्तला युद्धासी । परजूनियां शस्त्रास्त्रांसी । रामकृष्णेंसी संघटला ॥७३॥ युद्ध मांडिलें परमाद्भुत । सपुत्र शंकर सहित प्रमथ । यादववीर प्रतापवंत । कोण कोणातें पडखळिती ॥७४॥परस्परें ते वीरवरगणीं । सावध होवोनि परिसा कर्णी । श्लोकद्वयें बादरायनि । घाली श्रवणीं भूपाचे ॥७५॥आसीत्सुतुमुलं युद्धमद्भुतं रोमहर्षणम् । कृष्णशंकरयो राजन्प्रद्युम्नगुहयोरपि ॥७॥कुंभांडकूपकर्णाभ्यां बलेन सह संयुगः । सांबस्य बाणपुत्रेण बाणेन सह सात्यकेः ॥८॥तारकसमरासमान तुमुल । सुतराम म्हणिजे अवंचकशील । परमाद्भुत युद्ध प्रबळ । झालें विशाळ समरंगीं ॥७६॥ जें ऐकतां अद्यापिवरी । सकंप रोमांच येती शरीरीं । समरांगणीं शङ्करहरि । भिडती निकरीं परस्परें ॥७७॥यादवसैन्य शंकर मारी । देखूनि श्रीकृष्ण त्या पाचारी । प्रद्युम्न लोटला षण्मुखावरी । कठोरप्रहारीं हाणिताती ॥७८॥प्रमथपुंगव कूपकर्ण । कुम्भाण्ड बाणाचा प्रधान । त्या दोघांहीं संकर्षण । समरांगणीं पडखळिला ॥७९॥झुंजार बाणासुराचा पुत्र । त्यावरी लोटला साम्ब वीर । जो कां जाम्बवतीचा कुमर । समरीं अपर प्रळयाग्नि ॥८०॥शङ्कर आला समराङ्गणा । युद्धीं हांकिलें रामकृष्णां । वीर दाविती आंगवणा । आवेश बाणा न सांवरे ॥८१॥ प्रचंडावेशें बाणासुर । ठोकूनि आला यादवभार । त्यावरी लोटला सात्यकिवीर । कार्मुकीं शर सज्जूनी ॥८२॥ऐसे अनेक प्रमथगण । त्यांवरी यादव रणप्रवीण । लोटले त्यांचें द्वंद्वशा कथन । लिहितां भुवन अल्प गमे ॥८३॥यालागीं द्वंद्वशा कथिले वीर । तयांवरूनि जाणिजे अपर । कासया कीजे बहु विस्तार । श्रोते चतुर समजती ॥८४॥हरिहरांचें दारुण युद्ध । परंतु धर्मासि जें अविरुद्ध । तें पहावया निर्जरवृंद । आला विशद तो ऐका ॥८५॥ब्रह्मादयः सुराधीशा मुनयः सिद्धचारणाः । गंधर्वाप्सरसो यक्षा विमानैर्द्रष्टुमागमन् ॥९॥हंसविमानीं चतुर्मुख । आदिकरूनि सनकादिक । ब्रह्मनिष्ठ नारदप्रमुख । आले कौतुक पहावया ॥८६॥देवयानीं पुरंदर । सवें वेष्टित अमरभार । पहावया हरिहरसमर । आले सत्वर बाणपुरा ॥८७॥द्वादश आदित्यांचा गण । विश्वेदेव सिद्ध चारण । वसु साध्य सुपर्वाण । आले मुनिजन तपोनिधि ॥८८॥मुख्य सप्त महर्षिप्रवर । अपर अठ्यायशीं सहस्र । विमानयानीं ऋषींचा भार । पातले समग्र बाणपुरा ॥८९॥तैसेचि समस्त लोकपाळ । यक्ष गंधर्व अप्सरामेळ । हरिहराचें युद्ध तुमुल । आले केवळ विलोकना ॥९०॥असो विस्तार सांगों किती । गगनीं दाटल्या विमानपंक्ति । हरिहर भिडती कवणे रीती । तें तूं भूपति अवधारीं ॥९१॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP