मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६३ वा| श्लोक ४६ ते ५३ अध्याय ६३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३६ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५३ अध्याय ६३ वा - श्लोक ४६ ते ५३ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ५३ Translation - भाषांतर श्रीभगवानुवाच - यदात्थ भगवंस्त्वन्नः करवाम प्रियं तव । भवतो यद्व्यवसितं तन्मे साध्वनुमोदितम् ॥४६॥भो भगवन्ता उमापति । त्वां जें प्रार्थिलें आम्हांप्रति । तें तव प्रिय सुनिश्चिती । आम्हां सर्वार्थीं करणीय ॥२४॥त्वां जें निश्चयें प्रतिपादिलें । आणि आम्हांतें अनुमोदिलें । तें सर्वार्थीं साधु भलें । मान्य केलें पैं आम्हीं ॥४२५॥बाणासुराच्या रक्षणोद्देशें । आम्हां स्तविलें त्वां संतोषें । तें म्यां मान्य केलें असे । समरावेशें या न मारीं ॥२६॥आणिकही एक्या गुणें । बाणासुरा म्यां वांचवणें । तेंही कथितों तुजकारणें । सावध श्रवणें अवधारीं ॥२७॥अवध्योऽयं ममाप्येष वैरोचनिसुतोऽसुरः । प्राल्हादाय वरो दत्तो न वध्यो मे तवान्वयः ॥४७॥हा मारावया योग्य नव्हे । काय म्हणोनि पुससी जरी हें । तरी वैरोचनि जो असुरवर्य । त्याचा तनय औरस हा ॥२८॥आणि प्रह्रादासि म्यां दिधला वर । तुझे वंशींचा न मारीं असुर । तस्मात् अवध्य बाणासुर । मजपासूनि हा निर्धारें ॥२९॥तुझिया स्तवनें तोषलों भारी । तव प्रार्थना अङ्गीकारीं । विशेष हा मद्भक्तान्वयधारी । न मारीं समरीं मी यातें ॥४३०॥जरी तूं म्हणसी तरी कां पहिलें । याचें सैन्य संहारिलें । बाणबाहूंचें खंडन केलें । तेंही वहिलें अवधारीं ॥३१॥दर्पोपशमनायास्य प्रवृक्णा बाहवो मया । सूदितं च बलं भूरि यच्च भारायितं भुवः ॥४८॥सहस्र शाखांचा पादप । दैत्यें मानूनि धरिला दर्प । तया दर्पाचें स्वरूप । अल्प स्वल्प तुज कथितों ॥३२॥पूर्वीं अनन्यभावें शरण । होवोनि भजतां तुझे चरण । तैं त्वां होवोनि सुप्रसन्न । मागें वरदान म्हणीतलें ॥३३॥येणं शोणितपुररक्षणा । तुज याचिलें गौरीरमणा । पुढती प्रसन्न करूनि जाणा । समराङ्गणा प्रार्थिलें ॥३४॥सहस्रबाहुबळप्रताप । तेणें दैत्या चढला दर्प । म्हणे त्रिजग समरीं मसीं अल्प । तुज साटोप धरीं म्हणे ॥४३५॥सहस्र भुजांचें कंडूशमन । करावया समर्थ नाहीं आन । तुज शिवातें म्हणे बाण । समराङ्गण करीं मजसीं ॥३६॥ऐकोनि याच्या सदर्प बोला । त्वांही क्षोभोनि वर दीधला । उषा वरील जैं दाद्ला । तैं मिळेल तुजला प्रतियोद्धा ॥३७॥तया दर्पाचें उपशमन । सत्य करावया तव वरदान । बाणबाहूंचें कृंतन । चक्रेंकरून म्यां केलें ॥३८॥आणि भूमीसी भाररूप । बाणचमूचा प्रचंड दर्प । तो म्यां सज्जूनि शार्ङ्गचाप । ससाक्षेप संहरिला ॥३९॥आतां ऐकोनि तव प्रार्थना । म्यां जीवदान दिधलें बाणा । चारी बाहु रक्षिले जाणा । अजर तव गणामाजी असो ॥४४०॥चत्वारोऽस्य भुजाः शिष्टा भविष्यंत्यजरामराः । पार्षदमुख्यो भवतो नकुतश्चिद्भयोऽसुरः ॥४९॥अवशिष्ट रक्षिले चारी कर । ते या होतील अजरामर । तव पार्पदांमाजी वर । निर्भय असुर मम वरें ॥४१॥तुझ्या पार्षदांमाजी मुख्य । वरिष्ठ होवोनि भोगील सुख । माझा अनुग्रह हा निष्टंक । ऐकोनि त्र्यम्बक तोषला ॥४२॥श्रीकृष्णाचा होतां वर । चक्रें रक्षिले चारी कर । शिवें आणूनि बाणासुर । ठेववी शिर हरिचरणीं ॥४३॥कृष्णे हस्त ठेवूनियां माथां । झाला स्वमुखें अभय देता । बाणें सांडूनि जीवभयव्यथा । भजला तत्त्वता तें ऐक ॥४४॥इति लब्ध्वाऽभयं कृष्णं प्रणम्य शिरसाऽसुरः । प्राद्युम्निं रथमारोप्य सवध्वा समुपानयत् ॥५०॥अभय लाहूनि ऐसिये परी । श्रीकृष्णातें वंदूनि शिरीं । प्रवेशोनिया शोणितपुरीं । सोडी झदकरी अनिरुद्धा ॥४४५॥देऊनि अभ्यंग सोद्वर्तन । उषा नोवरी कन्यारत्न । वसनाभरणीं गौरवून । रथारोहण करवी त्यां ॥४६॥बोहरें वाहोनि दिव्य रथीं । सवेग आणिलीं कृष्णाप्रति । बळकृष्णांतें करी विनंती । कीजे वसती दीन एक ॥४७॥रामकृष्ण म्हणती तया । तुजवरी पूर्ण शिवाची दया । यालागीं ओपिलें पूर्ण अभया । स्नेह हृदयामाजी धरीं ॥४८॥सेना पडली समराङ्गणीं । त्यांची पुरगर्भी विलपणी । उत्साह न वटे अंतःकरणीं । आग्रह पूजनीं न करावा ॥४९॥समरीं यादव झाले क्षती । अमृतापाङ्गें त्यां श्रीपति । अक्षत करूनि वाहे रथीं । द्वारके जाती तें ऐका ॥४५०॥हरिवंशीं बाणासुर । सोडिल्या शंकरें देवोनि वर । केला प्रमथगणीं किंकर । शोणितपुर त्यागूनी ॥५१॥कुम्भाण्ड प्रधानें घेऊनि अभय । श्रीकृष्णेंसीं केला स्नेह । कृष्णें शोणितपुरींचा राय । शक्रप्राय तो केला ॥५२॥उषाविवाह कुम्भाण्डकें । मन्मथपुत्रेंसीं कौतुकें । करूनि वधूवरें द्वारके । यादवेंसीं बोळविलीं ॥५३॥अक्षौहिण्या परिवृतं सुवासः समलंकृतम् । सपत्नीकं पुरस्कृत्य ययौ रुद्रानुमोदितः ॥५१॥द्वादश अक्षौहिणी सेना । वोहरें सहित दिव्य स्यंदना । वेष्टूनि चालिले द्वारकाभुवना । विजयगर्जना करूनियां ॥५४॥मंडित अनर्घ्य वसनाभरणीं । कुंकुमतिलक माळा सुमनीं । सवें सालंकृत उषा पत्नी । पुरस्कारूनियां अनिरुद्धा ॥४५५॥दर्प भंगिला बाणाचा । वीर वर्णिती प्रताप वाचा । गजर केला गजभेरींचा । भार कृष्णाचा निघाला ॥५६॥द्वारकापुरा निघते समयीं । शंकराज्ञा शेषशायी । घेतां शंकर कवळूनि हृदयीं । रहस्य कांहीं त्या वदला ॥५७॥बाण मद्वरें झाला मत्त । समरा प्रार्थी मज उद्धट । तें हें माझें अभिप्रेत । पूर्ण समस्त त्वां केलें ॥५८॥श्रीकृष्ण म्हणे मजलागूनी । बहुत घडली उद्धट करणीं । पराभविलें समराङ्ग्णीं । पिनाकपाणि तें क्षमिजे ॥५९॥शिव म्हणे मम मनोगर । तैसें तुवां केलें उचित । अनुमोदूनि इत्थंभूत । यादव समस्त बोळविले ॥४६०॥विचित्र वाजती मंगळ तुरें । सुरवर वर्षती सुमनभारें । वीर गर्जती जयजयकारें । सहित वोहरें विराजती ॥६१॥अमर वंदूनि हरिहरांसी । ऋषि महर्षि देवर्षि । जाते झाले स्वस्थानासी । हरिविजयासी वर्णित ते ॥६२॥हरिवंशादि ग्रंथान्तरीं । धेनु बाणाच्या वरुणाघरीं । तदर्थ वरुणेंसिं भिडे हरि । हे शुकवैखरी येथ नसे ॥६३॥असो ऐसें शोणितपुरीं । शंकरप्रमुख जिंकूनि समरीं । अनिरुद्धेंसी बाणकुमरी । द्वारकानगरीं प्रवेशले ॥६४॥पुधें आहुकनृपाजळी । वार्तिका वार्ता कथिली समूळीं । वोहरें सहित राम वनमाळी । प्रतापशाळी पातले ॥४६५॥रायें ऐकूनि हे वार्ता । सहस्रें सहस्र प्रेरूनि दूतां । नगरी झाला शृंगारविता । पुढें सात्वता पाठविलें ॥६६॥मंगळ तुरांचिया नगरीं । कैसे प्रवेशले गजरीं । रामकृष्ण यादवभारीं । तें अवधारीं कुरुवर्या ॥६७॥स्वराजधानीं समलंकृतां ध्वजैः सतोरणेंरुधितमार्गचत्वराम् ।विवेश शंखानकदुंदुभिस्वनैरभ्युद्यतः पौरसुहृद्द्विजातिभिः ॥५२॥नृपाची आज्ञा पडतां श्रवणीं । द्वारकेमाजी समस्त जनीं । आपुलालिये सदनोसदनीं । अलंकरणीं त्वरा केली ॥६८॥चित्र विचित्र तगटी ध्वज । रत्नखचित कलश सुतेज । मंदिरें दिसती तेजःपुंज । तोरणीं स्रज सुमनांचे ॥६९॥मार्गचत्वर पण्यवीथि । चंदनकुंकुमें प्रोक्षिल्या निगुती । पूर्ण कलश सदीपपंक्ति । विराजती सर्वत्र ॥४७०॥सालंकृत नारीनर । शोभती जैसे अप्सरा अमर । सज्जूनि हयरथकुंजरभार । आले नागर सामोरे ॥७१॥आप्त सुहृद पौरवर्ग । वैदिक शास्त्रज्ञ द्विज अनेग । पुढें पाहूनियां श्रीरंग । करिती प्रसंग स्तवनाचा ॥७२॥एक ओहरां प्रशंसिती । कित्येक रामकृष्णांतें स्तविती । कित्येक हरियश उज्वळ गाती । विप्र पधती शान्तिसूक्तें ॥७३॥गजदुंदुभि वाजती गजरें । काहळा मृदंग मंगळ तुरें । आनकगोमुखकंबुस्वरें । पूर्व द्वारें प्रवेशलें ॥७४॥आपुली राजधानी द्वारका । सालंकृता सकौतुका । रामकृष्ण यादवकटका । सहित स्वपुरीं प्रवेशले ॥४७५॥वोहरें मिरवूनि हाटवटीं । आले नृपासनानिकटीं । उषा अनिरुद्ध पाहतां दृष्टी । तोषला पोटीं उग्रसेन ॥७६॥दोघां घेऊनि मांडियेवरी । वसनाभरणें अलंकारी । हस्त उतरोनि मुखावरी । म्हणे हरगौरीसम नांदा ॥७७॥रामकृष्णपद्युम्नमुखीं । राया वंदूनि निज मस्तकीं । उठूनि वसुदेवदेवकादिकें । स्नेहविशेषीं आलिंगिलें ॥७८॥नम्रमौळें करूनि अपरां । आज्ञा मागूनियां नृपवरा । मग येऊनि निजमंदिरा । माता समग्रा हरि वंदी ॥७९॥रामकृष्णादिकांच्या जननी । अनिरुद्ध उषा देखोनि नयनीं । आनंदभरित अंतःकरणीं । आशीर्वचनीं गौरविती ॥४८०॥नातुनातसुनेचें मुख । पाहूनि रुक्मिणी मानी सुख । रेवतीहृदयीं न माय हरिख । तोषती अनेक हरिजाया ॥८१॥रतिरुक्मवती नंदनस्नुषा । देखोनि पावल्या परम तोषा । रोचनासदनीं गृहप्रवेशा । आले विदुषांसमवेत ॥८२॥करूनि लक्ष्मीपूजनासी । कनकमुद्रा ब्राह्मणांसी । भूरि वांटूनि हृषीकेशी । अहेर सुहृदांसी समर्पी ॥८३॥रोचना रति रुक्मवती । भाणवसातें निरोविती । म्हणती वृद्धाचाररीति । यथानिगुती तूं चाळीं ॥८४॥आपुले कंठींचीं कंठाभरणें । रत्नजडितें करकंकणें । समषेनि उषेकारणें । क्षीरप्राशनें करविती ॥४८५॥आतां असो हा वृद्धाचार । कथितां ग्रंथ वाढेल फार । करूनि दिव्यान्नप्रकार । भोजनें नागर तोषविले ॥८६॥कैसें केलें उषाहरण । हरिहरांचें समराङ्गण । राया त्वां जें पुशिलें पूर्ण । तें संपूर्ण निरूपिलें ॥८७॥याचें श्रवणपठन करितां । दृष्टादृष्ट फळें हातां । तें तूं परिसें कौरवनाथा । मी तत्वता तुज कथितों ॥८८॥य एवं कृष्णविजयं शंकरेण च संयुगम् । संस्मरेत्प्रातरुत्थाय न तस्य स्थात्पराजयः ॥५३॥सोयरीक दैत्या देवा । समराङ्ग शिवकेशवां । अघटित परीचा हा आघवा । स्मरे सद्भावें इतिहास ॥८९॥बाणबाहूंचें खंडन । जृंभणास्त्रें उमारमण । जिंकूनि निर्जर जनार्दन । झाला आख्यान तें जें हें ॥४९०॥प्रभाते श्रवणपठन करिती । अथवा हृदयीं जे स्मरती । ते नर सर्वदा विजय वरिती । पराजयविपत्ति त्यां न शिवे ॥९१॥राया पावन हरीचे गुण । पुण्यश्लोक करिती श्रवण । ते सर्वदा विजयवान । कलिमलखंडन करूनियां ॥९२॥हरियश उज्ज्वल त्रिजगामाजी । गंगा जन्मली हरिपदकंजीं । भगवन्मूर्ति हॄत्पंकजीं । त्रिविधा आजि समरसतां ॥९३॥श्रीमद्भागवतीं ऐसी अठरा । सहस्र विस्तारेंसीं । दशमस्कंधीं नृपापाशीं । कथाविशेषीं शुक वदला ॥९४॥यावरी पुढिले अध्यायीं । नृगोद्धरण शेषशायी । करील ते कथा सर्वही । श्रवणालयीं सांठविजे ॥४९५॥मखसुकृतें अमरत्व लाहती । शेखीं मरोनि मर्त्य होती । एक अमरत्वा वांछिती । एवं संसृति अवघींच ॥९६॥एकनाथ प्रतिष्ठानीं । मर्त्या अमर्त्या अमृतदानी । चिदानंदें वास्तवपणीं । स्वानंदभुवनीं विराजती ॥९७॥गोविन्दान्वयबोधात्मक । प्रपंचवस्तूसी अपृथक । वेदान्तवाक्याचा परिपाक । भरी चिद्रस दयार्णवीं ॥९८॥तें हें हरिवरदा व्याख्यान । श्रोते श्रवणीं करिती पान । अमृतत्वीं समरसोन । ब्रह्म परिपूर्ण ते होती ॥४९९॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्क्म्धे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां शंकरप्रमुखसमरवर्णनबाणबाहुखंडनानिरुद्धोषासहद्वारकानयनं नाम त्रिषष्टितमोऽध्यायः ॥६३॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५३॥ ओवी - संख्या ॥५५२॥ ( त्रेसष्ठावा अध्याय मिळून ओवीसंख्या ३०१५४ ) त्रेसष्ठावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP