मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६३ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ६३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३६ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५३ अध्याय ६३ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर कुम्भाण्डः कूपकर्णश्च पेततुर्मुसलार्दितौ । दुद्रुवुस्तदनीकानि हतनाथानि सर्वतः ॥१६॥बळरामाचिये शरीरीं । बाण लागती कवणेपरी । शलभ जैसे मेरूवरी । हेमंतशिशिरीं संघटती ॥६२॥कुम्भाण्डकूणकर्णांचे शर । न गणूनियां लाङ्गलधर । मस्तकीं ओपूनि मुसळप्रहार । समरीं सत्वर लोळविले ॥६३॥संकर्षणाच्या मुसळघातें । कुम्भाण्डकूपकर्णांचे माथे । फुटूनि भडभडा वाहती रक्तें । पडिले प्रेतें होवोनियां ॥६४॥तया दोघांचें प्रचंड सैन्य । समरीं भंगलें नाथहीन । प्राणधाकें सांडूनि रण । दिगंतीं संपूर्ण पसरलें ॥१६५॥येरीकडे बाणकुमरें । साम्बा नोकूनि न्यूनोत्तरें । विंधिता झाला सहस्रशरें । चमत्कारें गर्जोनी ॥६६॥तंव तो जाम्बवतीचा बाळ । बाणीं बाण तोडूनि सकळ । रथ सारथि अश्व चपळ । मारिले तत्काळ शरघातें ॥६७॥धनुष्य तोडोनि पाडिलें क्षिति । बाणतनय केला विरथी । मग तो गदा घेऊनि हातीं । साम्बाप्रति धाविन्नला ॥६८॥येरें सवेग तीक्ष्ण शरीं । गदा छेदिली वरच्यावरी । बाणकुमर उरीं शिरीं । भेदूनि समरीं पाडियला ॥६९॥सारणावरी प्रधानकुमर । अष्टही करिती शरांचा मार । येरें छेदूनि त्यांचे शर । शिरें सत्वर उडविलीं ॥१७०॥बळरामाच्या माराभेणें । पळतां देखूनि आपुलीं सैन्यें । रथ सवेग लोटिला बाणें । क्रोधें दारुणें उठावला ॥७१॥विशीर्यमाणं स्वबलं दृष्ट्वा बाणोऽत्यमर्षणः । कृष्णमभ्यद्रवत्संख्ये रथी हित्वैव सात्यकिम् ॥१७॥कुम्भाण्ड आणि कूपकर्ण । समरीं पडिले गतप्राण । रामकृष्णीं त्रासिलें सैन्य । देखोनि बाण प्रज्वळला ॥७२॥अवगणूनिं युयुधानातें । कृष्णासम्मुख एक्या रथें । धांवता झाला क्रोधें बहुतें । तें नृपातें शुक सांगे ॥७३॥धनूंष्याकृष्य युगपद्बाणः पंचशतानि वै । एकैकस्मिञ्शरौ द्वौ द्वौ संदधे रणदुर्मदः ॥१८॥महा आवेश चढला आंगीं । नेत्रद्वारा उसळे आगी । धनुष्यें पांचशतें समरंगीं । सहस्रां हस्तीं सज्जियलीं ॥७४॥एकैक चापीं दोन दोन शर । एकसंधानीं शर सहस्र । लघुलाघवें चमत्कार । दावूनि असुर गर्जिन्नला ॥१७५॥आंगीं चढला रणदुर्मद । म्हणे कृष्णातें सावध । मजसीं करीं निर्वाण युद्ध । दावीं प्रसिद्ध आंगवण ॥७६॥मानवांमाजी प्रताप तुझा । जंव न भेटे झुंजार दुजा । स्फुरणें दाटल्या माझिया भुजा । भिडें पैजा तूं मजसीं ॥७७॥सैन्यें मारिसी फलकटें । तेणें शौर्यें न मासी कोठें । दावी परतूनियां मुखवटें । वेठें उद्भटें पुरुषार्थें ॥७८॥एक संधानें सहस्र शर । सवेग वर्षे बाणासुर । बाणीं कोंदलें अंबर । यादववीर थरारिले ॥७९॥बाण सुटती घनदाट । प्रळय विजांचे कडकडाट । समरीं पवना न फुटे वाट । हृदयस्फोट सुरासुरां ॥१८०॥देखोनि बाणासुराचा यावा । शंका उपजली यादवा । म्हणती स्मरा बळकेशवां । दैत्यलाघवा लक्षूनी ॥८१॥तिये समयीं जनार्दन । शार्ङ्गशिंजिनी टणत्कारून । निषंगांतूनि काढिला बाण । जैसा कृशान प्रळयींचा ॥८२॥तानि चिच्छेद भगवान्धनूंषि युगपद्धरिः । सारथिं रथमश्वांश्च हत्वा शंखमपूरयत् ॥१९॥प्रतिसंधानीं सहस्र शर । दैत्य वर्षे निरंतर । एकेचि संधानें श्रीधर । तोडि सत्वर ते अवघे ॥८३॥कोट्यनुकोटि दीपहारी । नाशी प्रचंड वातलहरी । कीं पर्वत पेटला तृणाङ्करीं । विझवी सुरसरी क्षणमात्रें ॥८४॥तेंवि असुराचे सायक । धनुष्येंसहित यदुनायक । सवेग छेदूनि एकें एक । दाविलें कौतुक सुरासुरां ॥१८५॥बाणरथींचे अश्व चपळ । मारिले शरघातें तत्काळ । सारथियाचें छेदिलें मौळ । भंगिला समूळ रहंवर ॥८६॥अश्वेंसहित सारथि वधिला । बाणीं रहंवर चूर्ण केला । बाणासुर विरथ झाला । कृष्णें स्फुरिला पाञ्चजन्य ॥८७॥ऐकूनि कृष्णाच्या शंखस्फुरणा । जयरवें गर्जे यादवसेना । प्राणधाकें बाणपृतना । प्रमथगणासह पळती ॥८८॥तये समयीं कैटभारि । बाणा बांधूं पाहे समरीं । विरथ निःशस्त्र सहसा न मारी । क्षात्रविचारीं परायण ॥८९॥आसुरी विद्या बाणमाता । कोटरानामीं जे विख्याता । देखूनि बाणाची अवस्था । पावली तत्वता तें ऐका ॥१९०॥तन्माता कोटरा नाम नग्ना मुक्तशिरोरुहा । पुरोऽवतस्थे कृष्णस्य पुत्रप्राणपरीप्सया ॥२०॥भयानक नग्नवेष । मुक्त लोहित मस्तकीं केश । बाण घालूनियां पृष्ठीस । आला कृष्णास ठाकुनी ॥९१॥स्वपुत्र बाणासुराचे प्राण । वांचवावयाचे इच्छेकरून । सवेग कृष्णापुढें येऊन । ठाकली नग्न कोठरा ॥९२॥नग्न शरीर मोकळें भीस । सम्मुख येतां हृषीकेश । पाहों नये नग्नवनितेस । म्हणोनि अश्व परतवी ॥९३॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP