मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६३ वा| श्लोक ३७ ते ४० अध्याय ६३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३६ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५३ अध्याय ६३ वा - श्लोक ३७ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३७ ते ४० Translation - भाषांतर तवावतारोऽयमकुंठधामन्धर्मस्य गुप्त्यै जगतो भवाय ।वयं तु सर्वे भवतानुभाविता विभावयामो भुवनानि सप्त ॥३७॥जगाचिया कल्याणार्थ । रक्षावया धर्मपथ । तुझा अवतार हो येथ । हें यथार्थ मी जाणें ॥४९॥जगत्कल्याण इतुकेंचि न म्हणें । आमुच्या अनुग्रहाही कारणें । सगुण विग्रह तुझें धरणें । आणि पाळणें लोकपाळां ॥३५०॥आम्हां लोकपाळां पाळिलें तुम्हीं । सप्त भुवनांतें पालूं आम्ही । येथ आशंका न करीं स्वामी । पृथक पाळक म्हणवोनियां ॥५१॥जरी तूं म्हणसी जनार्दना । पलयमाना समस्त भुवना । समर्थ लोकपाळ तुम्ही पाळणा । तरी मज कां म्हणाल ब्रह्मा ऐसें ॥५२॥सजातीय विजातीय स्वगत । ब्रह्मीं भेद हे असंभावित । ऐसें म्हणसी तरी हे मात । ऐकें यथार्थ जगदीशा ॥५३॥त्वमेक आद्यः पुरुषोऽद्वितीयस्तुर्यः स्वदृग्धेतुरहेतुरीशः । प्रतीयसेऽथापि यथाविकारं स्वमायया सर्व्गुणप्रसिद्ध्यै ॥३८॥सजातीयरहित तूं एक । कैसा म्हणसी तरी आइक । केवळ पुराण आदिपुरुष । तोही विशेष अवधारीं ॥५४॥उप्तत्ति स्थिति आणि संहार । अवस्थात्रयवंत पुरुषमात्र । त्यांहूनि आद्य तूं स्वतंत्र । केवळ सन्मात्र सदोदित ॥३५५॥प्रकृतिभूत पुरुष म्हणणें । तो तूं तुरीय साक्षी जाणें । न वेंठसी प्रवृत्तिभरणें । याकारणें विशुद्ध तूं ॥५६॥तोही विशुद्द कैसा म्हणसी । तरी स्वप्रकाशक ज्ञानराशि । जो प्रसवे स्वप्रतिबिंबासी । उपाधियोगेंसी जीवपुरुषां ॥५७॥अग्निपासून विस्फुलिंग । उपाधियोगें उठती अनेग । तेंवि आत्मस्वरूपीं मायायोग । होतां प्रसंग जीवदशे ॥५८॥मायायोगें आत्मस्वरूपीं । अनेक जीव व्यष्टिरूपी । सजातीयादिभेदविकल्पीं । पुण्यपापीं निबद्ध ॥५९॥तूं केवळ अद्वितीय । भेदरहित अप्रमेय । सजातीय विजातीय । भेद अन्वय तुज नाहीं ॥३६०॥भेद नाहीं कां पां म्हणसी । तूं सर्वांचा हेतु होसी । स्वयें अहेतु निर्विशेषीं । तुज कायसी भेदकुटी ॥६१॥तूं जरी म्हणसी प्रतिशरीरीं । जीवभेद कवणेपरी । प्रतीतिगोचर होती तरी । तें अवधारीं जगदीशा ॥६२॥इंधन व्यापूनि हुताशन । दहन पचन प्रकाशन । करी तैसाचि तूंही जाण । प्रकटिसी गुण स्वप्रकाशें ॥६३॥जीवावच्छिन्न चैतन्यमात्र । स्वप्रत्ययें कवळिसी गात्र । तैं करणज्ञानें विषयपात्र । होसी स्वतंत्र असतांही ॥६४॥एवं विषयप्रकाशना । जीवभेद अवगसी नाना । येथ तूं म्हणसी भवनिमग्ना । सांसारिकसम मीही ॥३६५॥ऐसें सहसा न म्हणें हरि । दृष्टान्तरूपें मम वैखरी । वदते तेंही श्रवण करीं । असंसारी बोधावया ॥६६॥यथैव सूर्यः पिहितश्छायया स्वया छायां च रूपाणि च संचकास्ति । एवं गुणेनापिहितो गुणांस्त्वमात्मप्रदीपो गुणिनश्च भूमन् ॥३९॥मेरूरूप जे सूर्यच्छाया । सूर्याप्रति आच्छादूनियां । अपरदृष्टीच्या ज्ञानविषया । लोपक ऐसी भासतसे ॥६७॥तथापि मेघच्छायेकरून । सूर्या नोहे तिरोधान । कैसें म्हणसी तें लक्षण । सावधान अवधारीं ॥६८॥सूर्य स्वच्छायाच्छादित झाला । तर्ही प्रकाशी त्या मेघाला । तदंतरितपदार्थाला । स्वआस्तिक्यें प्रकाशी ॥६९॥सूर्य निःशेष नाहींच होता । तरी कें मेघां दावूं शकता । घटमठादिपदार्थां बहुतां । प्रकाशकता मग कैंची ॥३७०॥तूंही स्वगुणें याचि प्रकारें । जीवात्मदेहात्माहंकारें । छादित अतज्ज्ञ मानिती खरें । परि त्यां न स्फुरें तव तेज ॥७१॥आच्छादिलें हें जाणती । त्या जाणण्याची प्रकाशशक्ति । पृथक्त्वादि गुणप्रवृत्ति । प्रकाशती तव तेजें ॥७२॥स्वप्नामाजी कोण्ही मेला । तो मरणाचा प्रकाशक झाला । तेंवि तूं सन्मात्र स्वकार्याला । आवृत गमसी अनावृत ॥७३॥कोण्ही उन्मत द्रव्य सेवी । तो भुलला उपाधिभावीं । परि मी भुललों हे स्वजीवीं । प्रतीति ठावी कीं ना त्या ॥७४॥एवं उपाधिअंतर्गत । स्वप्रकाशें सदोदित । आत्मसन्मात्र तूं संतत । तुज कें लिप्त संसार ॥३७५॥सर्व साक्षी सर्वातीत । असंग अद्वय अनासक्त । त्या तुज संसाराची मात । कोनें किमर्थ वदिजेल ॥७६॥भूमन् भो भो अपरिच्छिन्ना । तुझा आश्रय मायागुणा । माया भुलवी गौणजना । तुझिया आश्रयें करूनियां ॥७७॥तवाश्रयें त्रिजग मोही । गुणावृत जीवा संसारडोहीं । बुडवितो तुज संसार नाहीं । म्हणणें कांहीं लागतसे ॥७८॥तवाश्रयें माया भुलवी जना । द्योतूनि गुणात्मकाभिमाना । कैसी ते तूं जनार्दना । सावधान अवधारीं ॥७९॥यन्मायामोहितधियः पुत्रदारगृहादिषु । उन्मज्जंति निमज्जंति प्रसक्ता वृजिनार्णवे ॥४०॥ज्या तव मायेच्या मोहें । मोहितबुद्धि झालें देहें । पुत्रदारधनादिगेहें । दुःखसागरीं बुडताती ॥३८०॥आपण देहमात्र झाले । धनसुतवनितागृहें मोहिले । तदासक्तीस्तव बुडाले । दुःखसागरीं गुणबद्ध ॥८१॥वृजिनार्णव हा परम गहन । यामाजी लोकत्रय निमग्न । उफळताति तळीं बुडून । पुन्हा उफळूनि बुडताती ॥८२॥म्हणाल उफळणें बुडणें कैसें । तरी शुद्धसत्वात्मकर्मवशें । देवयोनि पाविजेत असे । उन्मज्जन तें ऊर्ध्वगति ॥८३॥पुन्हां पुण्यक्षयाचे अंतीं । निमज्जन ते अधोगति । तिर्यग्योनीमाजी वसती । ते मज्जती अंधतमीं ॥८४॥वायुपुराणींची संमति । विषर्ययश्च भवति । ब्रह्मत्वस्थावरत्वयोरिति । अधोर्ध्वगति परस्परें ॥३८५॥ब्रह्मप्राप्ति पावला पूर्ण । म्हणतां पावे आरूढ पतन । कर्मक्षयान्तीं ऊर्ध्वगमन । तिर्यग्जंतु पैं लाहती ॥८६॥कर्मक्षयान्तीं तिर्यग्जंतु । निःशेष ऊर्ध्वग ब्रह्मीभूत । ब्रह्मनिष्ठही विषयासक्त । आरूढ पतित होताती ॥८७॥एवं तव मायामोहित । दुःखार्णवामाजी पतित । उन्मज्जत निमज्जत । तें हें समस्त निरूपिलें ॥८८॥एवं समष्टिव्यष्टिकल्प । जीवेश्वरांचें व्यवस्थारूप । निरूपूनियां अल्पस्वल्प । अभक्त निष्पाप निंदीतसे ॥८९॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP