मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६३ वा| श्लोक ३१ ते ३६ अध्याय ६३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३६ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५३ अध्याय ६३ वा - श्लोक ३१ ते ३६ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३६ Translation - भाषांतर ततो बाहुसहस्रेण नानायुधधरोऽसुरः । मुमोच परमक्रुद्धो बाणांश्चक्रायुधे नृप ॥३१॥सहस्र बाहूंचीं पृथग्विधें । रथीं घालूनि दिव्यायुधें । पांच शत धनुष्यें मौर्वीबद्धें । वाहूनि क्रोधें उठावला ॥६॥एकेच समयीं सहस्र शर । चक्रधरावरी बाणासुर । विंधिता झाला परम क्रूर । म्हणे सधीर हो समरीं ॥७॥दैत्य मायाप्रयोगास्त्रें । कृष्णावरी टाकिती निकरें । तितुकीं छेदिलीं कमलामित्रें । कोण्या प्रकारें तें ऐका ॥८॥तस्यास्यतोऽस्त्राण्यसकृचक्रेण क्षुरनेमिना । चिच्छेद भगवान्बाहूञ्शाखा इव वनस्पतेः ॥३२॥अनेक अस्त्रें अनेक शस्त्रें । बाणें प्रेरितां आसुरी मंत्रें । एकेच समयीं कमलामित्रें । छेदिलीं चक्रें अतितीक्ष्णें ॥९॥क्षुरनेमि सहस्रार । प्रळयकाळींचा जेंवि भास्कर । श्रीकृष्णाचे आज्ञानुसार । समरीं तत्पर रसरसिक ॥३१०॥तया सुदर्शनचक्रा हरि । आज्ञा करूनि प्रेरी समरीं । अस्त्रें छेदूनि वरीच्या वरी । बाणशरीरीं संघटलें ॥११॥सहस्र शस्त्रें परजूनि बाण । करूं पाहे निवारण । पावकीं पडतां जैसें तृण । गेलीं जळोन तेंवि शस्त्रें ॥१२॥गरागरां देवोनि भंवती भंवरी । बाणबाहूंचें खंडन करी । भंवते पनळ गळती रुधिरीं । असुर अंतरीं चाकाटला ॥१३॥चक्रा निवारण न चले कांहीं । बाहु तुटोनि पडती मही । दुजा कैपक्षी समरीं नाहीं । तैं आठवी हृदयीं शिवचरणां ॥१४॥वनस्पतीच्या जैशा शाखा । छेदितां महीवरी पडती देखा । बाणबाहूंचा तोचि लेखा । पडली मुखा दांतखिळी ॥३१५॥आंगीं भयाची धडकी भरली । रणमदाची उठी उतरली । वीरश्रियेची अहंता गेली । पडली भुली शस्त्रास्त्रां ॥१६॥तये समयीं शंकरगौरी । स्मरता झाला अभ्यंतरीं । म्हणे माझी मज वैखरी । ऐसिये परी फळा आली ॥१७॥बाणें अंतरीं करितां स्मरण । भक्तकारुण्यें कळवळून । द्रवलें शिवाचें अंतःकरण । तें प्रकरण अवधारा ॥१८॥बाहुषु च्छिद्यमानेषु बाणस्य भगवान्भवः । भक्तानुकंप्युपव्रज्य चक्रायुधमभाषत ॥३३॥चक्र खंडित असतां पाणि । शंकरें जाणोनि अंतःकरणीं । भक्तकारुण्यें कळवळूनी । मूर्छना वारूनि उठावला ॥१९॥सावध होवोनि पाहे निरुतें । तंव सुदर्शन भंवे बाणाभंवतें । बाणबाहूंचीं खंडित शतें । जाणोनि चित्तें कळवळिला ॥३२०॥जृंभणास्त्राची मूर्छना गेली । भक्तकारुण्यें कृपा उदेली । सवेग येवोनि कृष्णा जवळी । स्तुति आदरिली ते ऐका ॥२१॥भक्तानुकंपी पार्वतीरमण । चक्रायुधाप्रति येऊन । भक्तरक्षणार्थ मृदुभाषण । स्वमुखें स्तवन आदरिलें ॥२२॥श्रीरुद्र उवाच - त्वं हि ब्रह्म परं ज्योतिर्गूढं ब्रह्मणि वाड्मये । यं पश्यंत्यमलात्मान आकाशमिव केवलम् ॥३४॥भो भो स्वामी चक्रायुधा । नेणोनि तुझिया वास्तव बोधा । बाण समरीं पावला युद्धा । ऐश्वर्य प्रबुद्धा हें न वटे ॥२३॥कां पां चित्र हें नव्हे म्हणसी । तरी ऐकावें इयेविशीं । तुझें गूढत्व शब्दब्रह्मासी । म्हणोनि वेदासी मौनमुद्रा ॥२४॥नामरूपवाच्यमान । वाङ्मयब्रह्मीं तच्छंसन । तूं अनाम अरूप अवाच्य पूर्ण । ब्रह्मनिर्गुण अविषय ॥३२५॥नाम रूप करणविषय । ध्येय चिंत्य मनोविषय । तूं अचिंत्य अप्रमेय । ब्रह्म वाङ्मय न प्रकटी ॥२६॥ज्ञानगम्य जें जें झालें । नेति मुखें तें निगमीं त्यजिलें । अगम्य अगोचर ब्रह्म उरलें । गूढ राहिलें निगमींही ॥२७॥अगोचर कैसें म्हणसी जरी । तरी परंज्योति या श्रुतिनिर्धारीं । ज्योतिषांतेंही प्रकाशकारी । स्वप्रकाश स्वतः सिद्ध ॥२८॥सूर्यप्रमुखें ज्योतिर्मयें । तूतें प्रकाशूं शकती काये । तवाङ्गप्रभेच्या अन्वयें । ज्यांची सोय जग जाणें ॥२९॥यालागीं परंज्योतिपदें । वाङ्मय ब्रह्म तूंतें वदे । तरी कैं भजती योगिवृंदें । प्रतीति नांदे त्यां कैसी ॥३३०॥ब्रह्मप्रतीतिगोचर नाहीं । तरी नास्तिक्य सर्वां ठायीं । ऐसें न म्हणें शेषशायी । हेतु तद्विषयीं अवधारीं ॥३१॥विशुद्धमानस जे अमलात्मे । ज्यातें पाहती अमळप्रेमें । केवळ आकाशाचिये प्रतिमे । अभ्यासनियमें अनुभविती ॥३२॥एवं निर्गुणस्वरूप ज्ञान असो । सर्वांसी अगम्यमान । विराटविग्रह लीलेकरून । धरिला सगुण तो न कळे ॥३३॥सगुण असोनि कां पां न कळे । तरी ऐकावें अंबुदनीळें । उदुंबरवृक्षासि अनेक फळें । जंतु मोकळे फळगर्भीं ॥३४॥उदुंबरफळांत अंतर्वतीं । मशकां गोचर तत्प्रतीति । अनेक फळगर्भीची ज्ञप्ति । ते त्यांप्रति अगोचर ॥३३५॥एवं महदल्पकपर्यायें । विराटरूप श्लोकद्वयें । वाखाणूनि स्तविता होये । तें कुरुरायें परिसावें ॥३६॥नाभिर्नभोऽग्निर्मुखमंबु रेतो द्यौः शीर्षमाशाः श्रुतिरंघ्रिरुर्वी । चंद्रो मनो यस्य दृगर्क आत्मा अहं समुद्रो जठरं भुजेन्द्रः ॥३५॥रामानि यस्यौषधयोंऽबुवाहाः केशा विरिंचो धिषणा विसर्गः ।प्रजापतिर्हृदयं यस्य धर्मः स वै भवान्पुरुषो लोककल्पः ॥३६॥शिव म्हणे तव सगुण रूप । महत् म्हणिजे समष्टिकल्प । त्यांमाजी आम्ही व्यष्टि अल्प । मशकरूप उदुंबरीं ॥३७॥अखिल ब्रह्माण्डमय समष्टि । त्यामाजी जीव अल्प व्यष्टि । जीवां केंवि तुझी गोष्टी । अवगमे दृष्टी साकल्यें ॥३८॥समष्टिस्वरूप म्हणसी कैसें । वेदें विवरण केलें जैसें । तेंचि तुझिया कृपावशें । स्तवनमिषें निरोपितों ॥३९॥तुझा नाभि म्हणिजे गगन । वैश्वानर तुझें वदन । तुझें रेत तें जीवन । बीज संपूर्ण त्रिजगाचें ॥३४०॥सुरलोक तें उत्तमाङ्ग । तुझे श्रवण ते दिग्विभाग । चरण केवळ हा भूभाग । नेत्र भग सोम मन ॥४१॥आत्मा म्हणिजे अहंकार । तो प्रत्यक्ष मी शङ्कर । बाहु तुझे सर्व इंद्र । लोकेश्वर पृथक्त्वें ॥४२॥समुद्र जठर ओषधि रोम । मेघ ते मस्तकींचे केशोद्गम । चिरंचि तव बुद्धीचें नाम । विसर्गाराम प्रजापति ॥४३॥अपान मलोत्सर्ग निरृति । तुझें हृदय धर्ममूर्ति । एवं ब्रह्माण्ड अवयवव्यक्ति । लोकप्रतीति लोकात्मा ॥४४॥आत्मा म्हणिजे तें शरीर । एवं अवघें सचराचर । व्यष्टि जीवलोकाकार । समष्टि समग्र तूं एक ॥३४५॥जरी तूं म्हणसी परमेश्वरा । प्रादेशमात्र मम शरीरा । माजी पवाड चराचरा । केंवि हे गिरा बोलतसां ॥४६॥प्रादेशमात्र शरीर सान । त्याची नाभि म्हणतां गगन । दिशा श्रोत्र सूर्य नयन । चंद्रमा मन केंवि घडे ॥४७॥तरी ऐकें गा अकुंठधामा । तुझी अच्युत स्वरूपगरिमा । स्वधर्मसेतुरक्षणकामा । पुरुषोत्तमा अवतरसी ॥४८॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP