मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६३ वा| आरंभ अध्याय ६३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३६ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५३ अध्याय ६३ वा - आरंभ अध्याय ६३ वा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णपरमात्मने नमः । जय जगदीशा जगन्मया । अगम्य अगोचर अद्वया । अभेदबोधें समरसतया । सुलभ सदया सदूपा ॥१॥तवपदभजनप्रसादलब्ध । आज्ञेवरोनि दशमस्कंध । बासष्टी अध्यायपर्यंत विशद । कृत हरिवरदाव्याख्यान ॥२॥तेथ अनिरुद्धें भोगिली उपा । तेणें बाण चढला द्वेषा । समरीं घालूनि नागपाशा । यादववत्सा बांधिलें ॥३॥यावरी त्रिषष्टितमाध्यायीं । शोणितपुरा शेषशायी । जाईल सोडवणे लवलाही । युद्ध ते ठायीं होईल ॥४॥तेथ शंकरा जाणिजेल हरि । बाणबाहूंचें खंडन समरीं । करूनि अनिरुद्ध सह नोवरी । द्वारकापुरीं प्रवेशती ॥५॥इतुकी कथा ये अध्यायीं । परिक्षितीचे श्रवणालयीं । शुकें कथिली ते मुनिसमुदायीं । शौनकसत्रीं सूत वदे ॥६॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP