मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६३ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ६३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३६ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५३ अध्याय ६३ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - अपश्यतां चानिरुद्धं तद्बंधूनां च भारत । चत्वारो वार्षिका मासा व्यतियुरनुशोचताम् ॥१॥चित्रलेखेनें अनिरुद्ध नेला । प्रभाते सदनीं गलबला झाला । रामकृष्णादि प्रद्युम्नाला । वृत्तान्त कथिला किङ्करीं ॥७॥रति रुक्मिणी रुक्मवती । रोहिणी देवकीसह रेवती । रोचनेच्या सदना येती । वृत्तान्त पुसती तयेतें ॥८॥येरी म्हणे त्रिदिनव्रत । व्रतस्थ होते कीर्तननिरत । म्हणोनि मजला हें अबिदित । नव्हता एकान्तसुखशयनीं ॥९॥किङ्कर म्हणती सभास्थानीं । अर्धरात्री क्रमिली श्रवणीं । कीर्तन संपतां मंचकासनीं । स्वेच्छा शयनीं पहुडलिया ॥१०॥निद्रित झाले सेवक सर्व । प्रभाते वर्तलें अपूर्व । मंचकासहित रोचनाधव । नेला लाघव करूनियां ॥११॥कोणें नेला ऐसें न कळे । पिहित द्वारें असतां सकळें । हें ऐकतां यादवकुळें । झालीं व्याकुळें सर्वत्र ॥१२॥न देखतां अनिरुद्धातें । समस्त बंधुवर्गाचीं चित्तें । झालीं अत्यंत शोकभरितें । शुद्धि कोणातें तर्केना ॥१३॥प्रसूतिकाळीं प्रद्युम्नासी । शंबरें नेलें वधावयासी । दैवें रक्षिलें तेथ त्यासी । हेही तैसीच गोष्टी गमे ॥१४॥ऐसें अनेक तर्क करिती । एक दैवज्ञा पूसती । देवदेव्हारें धुंडिती । घालूनि विनती आरतिया ॥१५॥रोचनेचा शोक भारी । भोंवत्या आश्वासिती नारी । गद प्रद्युम्न राम मुरारी । बाष्पें नेत्रीं ढाळिती ॥१६॥देवकी रोहिणी रेवती । रुक्मिणीसहित रुक्मवती । परमाक्रोशें आक्रंदती । आंगें टाकिती धरणीये ॥१७॥नेणती सगुण हे रोचना । कांतेंवीण दीनवदना । कैसी कंठील अहर्गणा । म्हणोनि ललना विलपती ॥१८॥तिये समयीं उद्धवाक्रूर । समस्तांतें देती धीर । म्हणती सावध स्थिर स्थिर । दीर्घ विचार करा म्हणती ॥१९॥तेव्हां रायें उग्रसेनें । अनिरुद्धाचे गवेपणे । चार प्रेरूनि वनोपवनें । द्वीपें भुवनें शोधविलीं ॥२०॥ब्राह्मण घातले अनुष्ठानीं । एक व्रतस्थ बैसले मौनी । एक हरिहरदेवतायतनीं । नियमेंकरूनि राहिले ॥२१॥एक अश्वत्था प्रदक्षिणा । एक तुळसीवृंदावना । एक ते सूर्यनारायणा । अर्घ्यदानें तोषविती ॥२२॥अनिरुद्धाचा विसर न पडे । दुःखें यादव झाले वेडे । रुक्मवती सदैव रडे । रोचनेकडे पाहूनी ॥२३॥एक म्हणती अमरभुवनीं । अनिरुद्ध नेला निर्जरगणीं । पार्याताची मानूनि हानि । वज्रपाणि क्षोभला ॥२४॥ऐसे अनेक तर्क करिती । दुःखें सदैव आक्रंदती । यावद्वर्षाकाळसमाप्ति । क्रमिल्या राती सशोक ॥२५॥चार्ही मास वर्षाकाळीं । बंधुवर्गांची मंडळी । अनिरुद्धाच्या शोकानळीं । दुःखें समूळीं आहाळतसे ॥२६॥जेव्हां बाणें नागपाशीं । अनिरुद्ध बांधूनि रणभूमीसी । पाडिला त्याचे अवस्थेसी । देखूनि देवर्षि कळवळिला ॥२७॥सवेग पातला द्वारकापुरा । वार्ता कथिली द्वारकेश्वरा । अनिरुद्ध नेला बाणनगरा । उषा सुन्दरा पर्णावया ॥२८॥उषेसी भवानीचा वर । स्वप्नीं तुजसीं रमेल नर । तोचि होईल तव भर्तार । केला निर्धार वरदानें ॥२९॥शुक्लमाधवीं द्वादशीनिशीं । स्वप्नीं उषाअनिरुद्धेंसी । योग झाला मग तयासी । शोणितपुरासी तिहीं नेलें ॥३०॥तेथें उषेचें पाणिग्रहण । केलें गान्धर्वविधानेंकरून । यावत्काळ वनितारत्न - । भोगीं वेधून राहिला ॥३१॥बाणासुरासी हा वृत्तान्त । विदित होतां झाला तप्त । सवें घेऊनि प्रचंड दैत्य । अनिरुद्धातें धरूं गेला ॥३२॥येरें परिघप्रहारातळीं । झोडिली शत्रुवर्गाची फळी । प्रचंड दैत्य मारिले बळी । केली रवंदळी रणाङ्गणीं ॥३३॥रथही बाणाचा भंगिला । अन्यरथीं तो वळघला । तेणें नागपाशीं बांधिला । निरोधें रक्षिला अनिरुद्ध ॥३४॥भगवंतासी पूर्वींच विदित । तथापि वर्ते अज्ञवत । साधावया अवतारकृत्य । करावया दैत्यमदभंग ॥३५॥नारदात्तदुपाकर्ण्य वार्तां बद्धस्य कर्म च । प्रययुः शोणितपुरं वृष्णयः कृष्णदैवताः ॥२॥नारदमुखें सकळामाजीं । आपण ऐकता झाला सहजीं । अनिरुद्धाची शुद्धि आजी । लागली म्हणोनि प्रकाशी ॥३६॥सभास्थानीं उग्रसेन । कृष्ण प्रद्युम्न संकर्षण । अनिरुद्धउषापाणिग्रहण । युद्ध दारुण दैत्येंसीं ॥३७॥अनिरुद्धातें नागपाशीं । बाणें बांधिलें रणभूमीसी । यादवीं गोष्टी ऐकूनि ऐसी । परम आवेशीं उठावले ॥३८॥कृष्णचि ज्यांची उपासना । कृष्णावीण न भजती आना । कृष्ण दैवत यादवगणां । श्रीकृष्णाज्ञा त्यां होतां ॥३९॥ठोकिल्या प्रस्थानकुंजरभेरी । सन्नद्ध झाले ते शस्त्रास्त्रीं । प्रळययुद्धाची सामग्री । सेना आसुरी भंगावया ॥४०॥लघुतर यादवांचा अंकित । पाहूं न शके त्या कृतान्त । तेथ प्रत्यक्ष मन्मथसुत । बांधिती दैत्य हें नवल ॥४१॥आजी विध्वंसूं शोणितपुर । समरीं मारूं बाणासुर । आडवा येईल जरी शङ्कर । तरी त्या निष्ठुर करूं शिक्षा ॥४२॥परमदुर्मद यादवसैन्य । रात्रंदिवस इच्छिती रण । त्यांसी हे वार्ता होतां श्रवण । क्षोभें दारुण उठावले ॥४३॥प्रतापें शोणितपुराप्रति । यादव जाते झाले किती । वीरांसहित सेनागणती । ऐक निश्चिती कुरुवर्या ॥४४॥प्रद्युम्नो युयुधानश्च गदः सांबोऽथ सारणः । नंदोपनंदभद्राच्या रामकृष्णानुवर्तिनः ॥३॥अक्षौहिणीभिर्द्वादशभिः समेतां सर्वतोदिशम् । रुरुधुर्बाणनगरं समंतात्सात्वतर्षभाः ॥४॥विष्णुपुराणीं पराशर । राम कृष्ण प्रद्युम्नवीर । गेले गरुडीं होवोनि स्वार । नाहीं विस्तार बहु वदला ॥४५॥येथें श्रीमद्भागवतीं । प्रबळ सेनेसीं श्रीपति । गेला शोणितपुराप्रति । वदला सुमति शुकयोगी ॥४६॥ज्येष्ठ कृष्णाचा नंदन । जो कां मकरध्वज प्रद्युम्न । आणि प्रतापी युयुधान । सात्यकि अभिधान जयाचें ॥४७॥तृतीय धाकुटा श्रीकृष्णबंधु । केवळ धनुर्विदेचा सिंधु । जेणें भंगिला जरासंधु । रुक्मिणीहरणसमरंगीं ॥४८॥चौथा जाम्बवतीचा तनय । साम्बनामा वृष्णिवर्य । ज्याचें अमोघ वीर्घ शौर्य । समरीं प्रळयपावक जो ॥४९॥सारणनामा पांचवा वीर । यदुयूथपांमाजी शूर । ज्यासीं सुभट न धरी धीर । प्रळयरुद्रसमतेचा ॥५०॥नंद उपनंद हे दोघे । सव्यदक्षिणपार्श्वभागें । चालती रामकृष्णांसंगें । आज्ञाप्रसंगें वर्तती ॥५१॥भद्रातनय भद्रवीर । श्रीकृष्णाचा औरस कुमर । प्रतापतेजस्वी भास्कर । अपर भृगुवर समरंगीं ॥५२॥एवं यादवसेनाधर । वृष्णि अंधक भोज कुकुर । सांगतां सर्वांचा विस्तार । ग्रंथ फार वाढेल ॥५३॥आद्यशब्दें हे समस्त । जाणती श्रोते विपश्चित । रामकृष्णीं परमविनीत । आज्ञानुवर्ती सर्वस्वें ॥५४॥एवं द्वादश अक्षौहिणी । सन्नद्ध बद्ध चतुरंगिणी । सवें घेऊनि रामकृष्णीं । द्वारकेहूनि निघाले ॥५५॥वाद्यें वाजती भयंकरें । म्हणती जयांतें रणतुरें । सिंहनादाचेनि गजरें । भरलें शारें कृतान्ता ॥५६॥ऐसे वीर प्रतापजेठी । पातले शोणितपुरानिकटीं । बाणनगरा देऊनि घरटी । बैसले हठी बळसिंधु ॥५७॥रोधूनि सर्वही दिग्विभाग । पुरग्रहणार्थ करिती लाग । बाहेर निघावयातें मार्ग । नागरवर्ग न लाहती ॥५८॥ऐसे प्रतापी सात्वतश्रेष्ठ । झाले शोणितपुरीं प्रविष्ट । नगरनागरां देती कष्ट । तेंही स्पष्ट अवधारा ॥५९॥म्हणाल मानुषी यादवसेना । केंवि पातली बाणभुवना । ऐसा संशय भासेल मना । यदर्थीं वचना अवधारा ॥६०॥द्वारका निर्मिली कवणेपरी । कैसी मथुरा नेली रात्रीं । ज्यातें सुधर्मा ओपिली अमरीं । तो काय न करी श्रीकृष्ण ॥६१॥वोळगे तिष्ठती अमरगण । त्यातें विमानीं यादवसैन्य । वाहूनि नेतां प्रयास कोण । न कीजे प्रश्न येविषयीं ॥६२॥सपक्ष तुरंग जुंतिले रथीं । सपक्ष अश्वीं वीरपंक्ति । मनोवेगें गगनपथीं । जाऊनि रोधिती बाणपुरा ॥६३॥नगर रोधूनि चहूंकडे । यादव प्रतापी बैसले गाढे । युद्ध करिती कोण्या पाडें । तें निवाडें परिसा हो ॥६४॥भज्यमानपुरोद्यानप्राकाराट्टालगोपुरम् । प्रेक्षमाणो रुषाविष्टस्तुल्यसैन्योऽभिनिर्ययौ ॥५॥नगराभोंवतीं वनोपवनें । विध्वंसिलीं यादवसैन्यें । उत्तुंगदुर्गें केलीं भग्नें । पुरगोपुरें ढांसळिलीं ॥६५॥अट्टाळिया उच्चतर । पाडिल्या करूनि यंत्रप्रहार । कंपायमान केलें नगर । देखोनि असुर क्षोभला ॥६६॥जैसें प्रतापी यादवदळ । तत्तुल्य दैत्यसैन्य प्रबळ । घेऊनि निघाला बळीचा बाळ । प्रळयानळपडिपाडें ॥६७॥तये समयीं शिखंडकेतु । अकस्मात झाला पतितु । बाण खोंचला हृदयाआंतु । पार्वतीकान्त स्मरे मनीं ॥६८॥माझा अभिमान गौरीरमणा । यथार्थ करीं निजवरदाना । प्रार्थिलासि म्यां पुररक्षणा । तें या क्षणाकारणें ॥६९॥केतु भंगोनि पडतां क्षिती । बाण हृदयीं ऐसें चिंती । अंतर जाणोनि गौरीपति । रक्षणार्थीं प्रवर्तला ॥७०॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP