मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६३ वा| श्लोक १० ते १५ अध्याय ६३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३६ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५३ अध्याय ६३ वा - श्लोक १० ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १० ते १५ Translation - भाषांतर शङ्करानुचराञ्शौरिर्भूतप्रमथगुह्यकान् । डाकिनीर्यातुधानांश्च वेतालान्सविनायकान् ॥१०॥प्रेतमातृपिशाचांश्च कूष्मांडान्ब्रह्मराक्षसान् । द्रावयामास तीक्ष्णाग्रैः शरैः शार्ङ्गधनुश्च्युतैः ॥११॥शङ्कराचे जे अनुचर । निकटवर्ती प्रतापी शूर । तिहीं त्रासिले यादवभार । भिडती क्रूर प्रतापें ॥९२॥भूतें परसोनि मोकळीं भिसें । वीरां झोंबती अट्टहासें । संचार करूनि लाविती पिसें । मग त्यां नुमजे आपपर ॥९३॥प्रमथ क्रूर कुठारपाणि । एक त्रिशूळें खोंचिती रणीं । एक खट्वाङ्गें फोडिती मूर्ध्नी । एक ते दशनीं विदारिती ॥९४॥एक नखें फाडिती पोटें । एक नयनीं रोविती बोटें । मारूं जातां न दिसती कोठें । पिशाच कपटें भांडती ॥९५॥शाकिनी डाकिनी यातुधानी । नग्न धांवती समराङ्गणीं । उन्मत्त नाचती रुधिरपानी । पिशिताशनी भयंकरा ॥९६॥महामारिका कोटरा ज्येष्ठा । करिती भयंकर कुत्सित चेष्टा । संचार करूनि देती कष्टा । बळें अनिष्टा भेटविती ॥९७॥वेताळ कंकाळ पिंगाक्ष पिंग । उन्मत महिषासुर । मातंग । समरांगणीं करिती धिंग । कुष्मा्ण्डवर्ग भ्रान्तिकर ॥९८॥प्रचंड विघ्न विनायक । परम अघोर प्रेतनायक । ब्रह्मराक्षस क्रव्यादप्रमुख । वीरां सम्मुख घोळसिती ॥९९॥नरगजाश्वीं संचार करिती । त्यांची हारपे समरस्मृति । अस्ताव्यस्त धांवताती । बळें मारिती निज सैन्या ॥१००॥आपुले आपणांमाजी वीर । एकमेकां मारिती प्रहार । आंगीं भूतांचा संचार । तेणें आपपर विसरले ॥१॥हाहाकार समरांगणीं । यादव त्रासिले पिशाचगणीं । हें देखोनि शार्ङ्गपाणि । अमोघ बाणीं वृष्टि करी ॥२॥शार्ङनिर्मुक्त सुटतां शर । रणीं खोंचले पिशाचभार । भूतप्रेतप्रमथनिकर । पळती समर साडूनी ॥३॥शाकिनीडाकिनीगुह्यकांतें । शार्ङ्गनिर्मुक्त बाणघातें । त्रासितां पळती गगनपथें । फिरूनि मागुते न पाहती ॥४॥यातुधानी रुधिराशना । वेताळ कंकाळ पिंगाक्षगणा । लागतां शार्ङ्गनिर्मुक्त बाणा । पळती प्राणा घेऊनी ॥१०५॥विनायक जे विघ्नपति । ब्रह्मराक्षस कुष्माण्डजाति । मातरा कोटरा ज्येष्ठा रेवती । पळती दिगंतीं प्राणभयें ॥६॥प्रळयमेघांची वांकडी । बाणवृष्टि तत्पडिपाडीं । पिशाचसेना झोडिली प्रौढी । रणीं धांदडीं नाचविलीं ॥७॥शार्ङ्गशिजिनीटणत्कार । करितां उठती नामोच्चार । शार्ङ्गनिर्मुक्त शरांचा मार । मंत्रोच्चारपूर्वक पैं ॥८॥पिशाच पळती मंत्रश्रवणें । प्रथम खोंचले प्रचंड बाणें । समरीं न धरिती आंगवणे । जेंवि कां तृणें महावातें ॥९॥पिशाच पळाले सांडूनि रण । कित्येकांचे घेतले प्राण । प्रमथ समरीं न धरिती त्राण । पातले शरण शर्वातें ॥११०॥भो भो स्वामी भूतान्तका । त्रिपुरभंजका श्रीत्र्यंबका । साहों न शकों जी सायकां । अभयदायका संरक्षीं ॥११॥पळोनि गेली पिशाचसेना । प्रमथ भाकिती ऐसी करुणा । ऐकूनि क्षोभला कैलासराणा । अस्त्रसंधाना आदरिलें ॥१२॥आंगीं भरला प्रचंड कोप । सवेग सज्जूनि पिनाकचाप । अस्त्रविद्येचा खटाटोप । दावी प्रताप समरंगीं ॥१३॥पृथग्विश्वानि प्रायुंक्त पिनाक्यस्त्राणि शार्ङ्गिणे । प्रत्यस्त्रैः शमयामास शार्ङ्गपाणिरविस्मितः ॥१२॥पिनाक सज्जूनियां पिनाकी । पृथक्पृथक् अस्त्रें निकीं । शार्ङ्गपाणीतें लक्षूनि टाकी । समरीं हाकी भीमरवें ॥१४॥कठोर डामर उड्डामर । साबर अभिचार अघोर । प्रयोगमंत्र जपूनि क्रूर । प्रेरी सत्वर अस्त्रांतें ॥११५॥तया अस्त्रांचे प्रतिकार । सांदीपनिदत्तमंत्र । गुरुपद स्मरूनि शार्ङ्गधर । अस्त्रीं प्रत्यस्त्र प्रयोगी ॥१६॥शंकर करकरां खाऊनि दांत । निकरें अस्त्रांतें प्रेरित । हास्यवदनें रमाकान्त । करी त्यां उपहत प्रत्यस्त्रें ॥१७॥कुरुवर भूसुरामरदुमा । याचकस्वेच्छापूर्णकामा । अस्त्रां प्रत्यस्त्रांचिया नामा । भूपललामा अवधारीं ॥१८॥ब्रह्मास्त्रस्य च ब्रह्मास्त्रं वायव्यस्य च पार्वतम् । आग्नेयस्य च पार्जन्यं नैजं पाशुपतस्य च ॥१३॥ब्रह्मास्त्रविद्या जपूनि मंत्रीं । शंकर योजी पीताम्बरीं । बगळामुखीं मंत्रोच्चारीं । शक्ति अंबरीं प्रज्वळली ॥१९॥अनिवार ब्रह्मास्त्राचा भार । भरलें प्रळयातळें अंबर । त्रिजगीं झाला हाहाकार । देखूनि श्रीधर काय करी ॥१२०॥ ब्रह्मास्त्राचिया निवारणा । करूं न शकती अस्त्रें नाना । हें जाणोनि वैकुंठराणा । अपर ब्रह्मास्त्रा प्रयोजी ॥२१॥गायत्रीचें जें कां शिर । अमोघ अव्याहत ब्रह्मास्त्र । उपसंहरी व्याहृतिनिकर । जपोनी श्रीधर शर सोडी ॥२२॥ब्रह्मास्त्राचें निवारण । करितां ब्रह्मास्त्रें जनार्दन । हें देखोनि गौरीरमण । म्हणे दारुण प्रतियोद्धा ॥२३॥प्रभंजनास्त्र जपोनि पुढती । कृष्ण विंधी जवें पशुपति । तंव मारुतीं केली ख्याति । सैन्य आवर्तीं पाडिलें ॥२४॥तृणावर्ताची जैसी घरटी । तैसीं सैन्यें गरगराटीं । फिरती आणि गगनपोटीं । वीर जगजेठी उडताती ॥१२५॥अश्व कुंजर रथ पताका । प्रचंड पवनें उधळती देखा । पायदळाचा कवण लेखा । नोहे आवांका अतिरथियां ॥२६॥पवनास्त्रमारें त्रासिलें सैन्य । ऐसें देखोनि जनार्दन । पर्वतास्त्र जपूनि पूर्ण । करी खंडन अनिळाचें ॥२७॥पर्वतास्त्राचेनि सामर्थ्यें । पवन लोपला जेथींचा तेथें । यूथपीं सैन्यें इत्थंभूतें । केलीं स्वस्थें सांवरूनी ॥२८॥हें देखोनि शूळपाणि । प्रळयानळास्त्र लाविलें गुणीं । ज्वाळा दाटल्या गगनीं धरणीं । जळती प्राणी उभेउभे ॥२९॥स्वस्थ शिबिरें पताका जळती । कुंजर पोळले सैरा पळती । अश्व आहळुनि वावळती । वीर कोसळती करपूनी ॥१३०॥हाहाकार यादवदळीं । देखूनि प्रतापी श्रीवनमाळी । जीमूतस्त्रातें अस्त्रशाळी । योजूनि विधुळी अनळास्त्रा ॥३१॥मुसळधारीं वर्षती मेघ । भ्म्गला पावकास्त्रनिदाघ । खळबळां वाहती प्रचंड ओघ । तेणें भर्ग चाकाटला ॥३२॥म्हणे हा नोहे मनुजकोटि । अमोघ योद्धा त्रिजगजेठी । यावरी न चले कोणी काठी । म्हणोनि हठी प्रज्वळिला ॥३३॥पाशुपतास्त्रें प्रळयकाळीं । क्षोभें ब्रह्माण्ड अवघें जाळी । तें प्रेरूनि करीन होळी । म्हणोनि शूळी अस्त्र जपे ॥३४॥नयनीं धडकती प्रचंड ज्वाळा । जिह्वा पंचवक्त्रीं विशाळा । पाशुपतास्त्रविद्या प्रबळा । प्रेरिता झाला सक्रोधें ॥१३५॥पाशुपतास्त्रनिवारण । करितें अपर अस्त्र कोण । ऐसें विवरूनियां श्रीकृष्ण । निजास्त्र पूर्ण प्रयोजी ॥३६॥निजास्त्र म्हणिजे वैष्णवास्त्र । नारायण हा नामोच्चार । प्रयोगपुरस्सर सोडितां शर । पाशुपतास्त्र भंगलें ॥३७॥अपर अस्त्र जंव विवरी हर । तंव तो प्रतापी शार्ङ्गधर । काय केला चमत्कार । तोही सादर अवधारा ॥३८॥मोहयित्वा तु गिरिशं जृंभणास्त्रेण जृंभितम् । बाणस्य पृतनां शौरिर्जघानासिगदेषुभिः ॥१४॥कृष्ण विवरी अभ्यंतरीं । तमःप्रचुर हा त्रिपुरारि । जृंभणास्त्रें यातें समरीं । निजनिर्धारीं जिंकावें ॥३९॥मग स्मरूनि सांदिपनी । तामसी विद्या जपूनि वदनीं । जृंभणास्त्र लावूनि गुणीं । शूळपाणि भेदियला ॥१४०॥तामसी विद्येचें सामर्थ्य निवाड । मोहित करूनि चंद्रचड । केला जृंभणास्त्रा वरपड । येती कडकड आंगमोदे ॥४१॥पांचही मुखें पसरूनि नेटें । जांभया येती कडकडाटें । दाही हस्तांचीं जुंबाडें । मागें पुढें आळीपिळी ॥४२॥डोळे झांकती गपगपां । डुकल्या देतसे टपटपां । समरस्मृति पावली लोपा । मोहप्रतापा वश झाला ॥४३॥गळालीं नेणें हातींचीं शस्त्रें । नुमजे आपणा भेदिलें अस्त्रें । तें देखूनि यादवेश्वरें । त्यजिलें निदसुरे शंभूतें ॥४४॥शंकरें आंवरिला श्रीहरि । जाणोनि बाणसेनेच्या वीरीं । यादवांवरी केली मारी । प्रमथीं अपरीं येरीकडे ॥१४५॥जृंभणास्त्रें शङ्करातें । मोहित करूनि रुक्मिणीकान्तें । शार्ङ्गनिर्मुक्त बाणघातें । बाणसेनेतें त्रासिलें ॥४६॥प्रळयकाळींचे जैसे घन । तैसे सणसणा येती बाण । कोणा नोहेचि आंगवण । शरनिवारण करावया ॥४७॥गरुड लोटूनि सेनेवरी । कित्येक मारिले गदाप्रहारीं । कित्येकांचीं खङ्गधारीं । शिरें अंबरीं उडविलीं ॥४८॥कुंभस्थळीं आपुंखशर । भेदितां भंगले कुञ्जरभार । लागतां दृढतर प्रहार । झाले रहंवर शत चूर्ण ॥४९॥खगेंद्राचिये झडपेसवें । पायदळें पडलीं होवोनि निर्जीवें । एवं बाणसैन्य आघवें । भंगिलें केशवें क्षणमात्र ॥१५०॥स्कंदः प्रद्युम्नबाणौघैरर्द्यमानः समंततः । असृग्निमुंचन्गात्रेभ्यः शिखिनापात्रमद्रणात् ॥१५॥तंव येरीकडे तारकारि । समरीं प्रद्युम्ना पाचारी । साहें म्हणोनि शक्तिप्रहारीं । हृदयावरी ताडिला ॥५१॥हें देखोनि प्रद्युम्नवीर । रसाळकार्मुकीं लावोनि शर । येतां भंगिला शक्तिप्रहार । षण्मुखें तोमर उचलिला ॥५२॥धनुर्विद्येचा सागर । रुक्मिणीतनय परम शूर । तेणें विंधूनीं पंच शर । केला जर्जर शिवतनय ॥५३॥बानें तोमर उडविला गगनीं । सायकें भेदिला मयूर मूर्घ्नि । क्रौंचदारण अमोघ बाणीं । समराङणीं त्रासियला ॥५४॥अंगुष्ठापासोनि मस्तकवरी । बाण भेदले स्कंदशरीरीं । बाणक्षतांच्या रुधिरधारीं । समरधरित्री रंगविली ॥१५५॥सव्यदक्षिण येती बाण । बाणीं पूर्ण भरलें गगन । पुढें मागें तळीं वरून । भेदितां स्मरण हारपलें ॥५६॥झालें सर्वांगीं बाणक्षतें । त्यांपासोनि रुधिर भोंवतें । समराङ्गणीं झालें स्रवतें । प्राशिती भूतें संतुष्टें ॥५७॥मूर्ध्नि पोळला बाणप्रहारें । तेणें मयूरा घायवारें । षण्मुखा घेवोनि पाठिमोरें । रणापासोनि पळाला ॥५८॥षण्मुखातें देखोनि पळतां । भंगल्या प्रमथगणाच्या चळथा । कायसी भूतप्रेतांची कथा । पावले व्यथा यूथपति ॥५९॥रणीं भंगला शक्तिधर । जृंभणास्त्रें विकळ शङ्कर । बाणसेनेसी केला मार । जयजयकार यदुभारी ॥१६०॥तंव ते कुम्भाण्डकूपकर्ण । पाचारूनि संकर्षण । दाविते झाले आंगवण । अपार बाण वर्षूनी ॥६१॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP