मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २ रा| श्लोक ४१ ते ४२ अध्याय २ रा प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ ते ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ ते ३८ श्लोक ३९ ते ४० श्लोक ४१ ते ४२ अध्याय २ रा - श्लोक ४१ ते ४२ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४२ Translation - भाषांतर दिष्ट्याऽम्ब ते कुक्षिगतः परः पुमानंशेन साक्षाद्भगवान्भवाय नः । मा भूद्भयं भोजपतेर्मुमूर्षोर्गोप्ता यदूनां भविता तवात्मजः ॥४१॥सुरवर म्हणती जगन्माते । ब्रह्मांडविभवे कल्याणसरिते । हृदयकोशीं श्रीअनंतें । विद्यमानत्व स्वीकेलें ॥९९॥अनंतब्रह्मांडघटनापटी । तिसी न करवे ज्याची गोठी । म्हणोनि परपुरुष हे चावटी । ब्रह्मांडघटीं वाजिली ॥९००॥ऐसा प्राकृतीसि जो पर । तो परपुरुष परमेश्वर । मायाअंशेंशीं ईश्वर । झाला स्थिर तव कुक्षीं ॥१॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो हा साक्षात् श्रीभगवान । आमुच्या जन्माचें कारण । जयवर्धन परमात्मा ॥२॥इतुकें सांगावया हेंचि सार । तूं कंसभयाचा वाहसी घोर । त्याचा पडो आतां विसर । जाणोनि ईश्वर निजकुक्षीं ॥३॥माझें कुक्षीस गर्भगोळ । कंस प्रबुद्ध केवळ खळ । ऐसें न म्हणे हा गोपाळ । दैत्यां काळ जन्मतो ॥४॥मरणोन्मुख आतां कंस । म्हणोनि झाला बुद्धिभ्रंश । वृद्धावज्ञा बाळां नाश । केला अपयशसंग्रह ॥९०५॥कंसा क्षय आमुचा जय । एथूनि लोकत्रयासि अभय । यादवरक्षणाचें ज्या कार्य । तो यदुवर्य तव कुक्षीं ॥६॥परमभाग्यें तूं सभाग्यवंत । गर्भा आला श्रीभगवंत । तेणें देवकी आनंदभरित । शुक सांगत रायासी ॥७॥श्रीशुक उ० - इत्यभिष्ट्य पुरुषं यद्रूपमनिदं यथा । ब्रह्मेशानी पुरोधाय देवाः प्रत्तिययुर्दिक्म् ॥४२॥जें अमुकें ऐसें न ये व्यक्ति । सर्वातीत सर्वव्याप्ति । सर्वप्रत्यग्भूतप्रतीति । तें केलें स्तुतीमाजींवडें ॥८॥अणूहून सूक्ष्म सान । तेथही सूर्याचे पावती नयन । त्यासही जेथ आंधळेपण । स्वरूप जाण तें स्तविलें ॥९॥रसना रसज्ञ ज्याचेनि योगें । परी त्यासी चाखों नेणे निजांगें । आंत बाहेर पुढें मागें । असोनि नलगे ते गोडी ॥९१०॥वाचा देखिलें ऐकिलें बके । ज्याचेनि जीवनें वदनीं फांके । ते त्या सहसा वदों न शके । कीं तें न टके वाचेतें ॥११॥श्रवण नादवंत सदा । नादें ते ऐकती बाह्य नादा । ते नेणती परमानंदा । असतां शब्दा सबाह्य ॥१२॥त्वगिंद्रियीं स्फुरे पवन । ज्याचेनि संवेदनें स्पर्शज्ञ । परी तें जेणें सल्लग्न । असोनि जाण सांचला ॥१३॥चक्षु प्रकाशाचें शर । घेऊनि नीलशाचा आधार । अभ्यासमार्गें योगेश्वर । परात्परतर टाकिती ॥१४॥त्या चक्षूसि नाहीं ठावें । रक्त श्वेत कृष्ण हिरवें । ओतप्रोत पपंचभावें । कोणासवें उमसेना ॥९१५॥प्राण गंधाचें ग्राहक । सर्वां मंडण म्हणवी नाक । त्यासि घ्रेयत्वविवेक । नोहे निष्टंक वस्तूचा ॥१६॥मन कल्पूनि ब्रह्मांडकोटि । परी वस्तूची न करी गोष्टी । बहु शहाणी करूनि दिठी । तेही पैठि नोहेची ॥१७॥मनोरथाचें अनुसंधान । करूनि चित्त चतुर पूर्ण । सव्यापारें अस्तमान । त्यासही जाण ते ठायीं ॥१८॥नानापदीं पदाभिमानें । अहंकाराचें अवतरणें । स्वयें असूनि विमुखपणें । ज्याचें जिणें वस्तूशीं ॥१९॥अंतःकरण विश्वाभास । विसरोनि स्मृति होय ओस । विपरीतज्ञाना करी ग्रास । तेथें वस्तूसि आस्तिक्य ॥९२०॥शून्यपणें सर्व विसरे । वस्तू मानूनि आपण स्फुरे । नये नेणवे नानाविकारें । एवंप्रकारें अनिदं जें ॥२१॥ऐसें स्वरूप निर्विकार । स्तवनीं स्तवूनि सुरवर । ब्रह्मा शंभु पुरस्सर । जाती सुरवर स्वधामा ॥२२॥कन्या माहेरीं सुरवाडे । कां जळगार सागरीं पडे । तैसे स्वकारणीं होऊनि वेडे । विधिहर कोडें झणें रहाती ॥२३॥पुढें करूनि विधिहरांसी । अमर गेले निजपुरासी । वैयासकी भूवरासी । कथा ऐशी निवेदी ॥२४॥आतां एथूनि सावधान । श्रीकृष्णाचें जन्मकथन । कथामृतासि भोक्ते श्रवण । होत सज्जन श्रोत्यांचे ॥९२५॥एथूनि श्रीकृष्णजन्मकाळ । श्रोतयां सुखाचा सुकाळ । लोकत्रयीं शुभ मंगळ । पुण्यशीळ परिसोत ॥२६॥वसुदेवदेवकी सनाथ । करूनि गोकुळीं श्रीकृष्णनाथ । क्रीडा करीत तेचि एथ । कथा कृतार्थ जग करू ॥२७॥दत्तब्रह्मांडभांडोदरीं । जनार्दनाख्यक्षीरसागरीं । श्वेतद्वीपएकाकारीं । चिदानंदगिरि रत्नांचा ॥२८॥तेथ स्वानंदभुवनीं सत्यसंकल्पी । गोविंदसद्गुरु वृषाकपि । कृपापादोद्भवा ओपी । प्रेमत्रिपथा दयार्णवा ॥२९॥तये संगमीं सुस्नात । श्रवणक्षेत्रीं श्रोते होत । भावें श्रीमद्भागवत । मूर्तिमंत परमात्मा ॥९३०॥तो पूजोनि मानसोपचारीं । निर्माल्यटीका हे अंगीकारीं । हरिवरद त्यातें वरी । मोक्षलक्ष्मी उभयत्र ॥३१॥इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दार्णवानुचरविरचितायां ब्रह्मस्तुतिर्नाम द्वितीयोऽध्यायः ॥२॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४२॥ ओवीसंख्या ॥९३१॥ एवं संख्या ॥९७३॥ ( दोन अध्याय मिळून ओवीसंख्या १९६१ )दुसरा अध्याय समाप्त N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP