मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २ रा| श्लोक २८ अध्याय २ रा प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ ते ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ ते ३८ श्लोक ३९ ते ४० श्लोक ४१ ते ४२ अध्याय २ रा - श्लोक २८ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २८ Translation - भाषांतर त्वमेक एवास्य सतः प्रसूतिस्त्वं सन्निधानं त्वमनुग्रहश्च । त्वन्मायया संवृतचेतसस्त्वां पश्यन्ति नाना न विपश्चितो ये ॥२८॥ऐसा भवतरु हा शाश्वत । याची प्रसूति तूं अनंत । अनुग्राहक तूंचि एथ । अंतीं सांठवत तुजमाजीं ॥५१॥शाश्वत कैसा जरी हा म्हणसी । तरी लटका नीळिमा आकाशीं । परंतु आकाशाचे सरसीं । शाश्वत होऊनि राहिला ॥५२॥समुद्रीं आकाशाची छाया । लटकी परंतु न वचे लया । जंववरी सिंधु तंववरी तया । दोहींचेंही आस्तिक्य ॥५३॥जैसे सुवर्णाचे झाले नग । तेथ सुवर्णचि अभंग । तैसें स्वस्वरूपीं मिथ्या जग । परी तें अव्यंग सद्रूप ॥५४॥लटका नामरूपाचा आळ । प्रपंच कल्पना केवळ । सत्य एक तूं गोपाळ । न शिवे मळ द्वैताचा ॥४५५॥एवं प्रपंचासि मूळ । तूं सन्मात्र केवळ । जैसा जागताच देखे टवाल । स्वप्नजाळ ज्यापरी ॥५६॥कारण सन्मात्र जेव्हां होय । तेव्हां कार्यही सन्मय । याचे उत्पात्तीचा ठाय । तूं अव्यय प्रसूति ॥५७॥तूंचि अनुग्रह याचा । अर्थ ऐसा या पदांचा । जो आळमात्र प्रपंचाचा । तूंचि तैसा स्थितिकाळीं ॥५८॥स्वप्नीं देखे अनेकता । ते तो एकलाचि देखता । स्वभावासि वश होतां । नानाकारता अनुभवी ॥५९॥सृष्टि नाना रंगीं रंजित । परी देखतां रंगातीत । उपनेत्रस्थानीं शास्त्रजनित । ज्ञान समस्त आविद्यक ॥४६०॥अंधासि घातले उपनेत्र । परी तो न देखे अणुमात्र । तैसें चित्प्रकाशेंवीण स्वतंत्र । भवचरित्र केंवि उमटे ॥६१॥जैसा नाना यातीचे दगड । तैसे उपनेत्रही अचेत जड । परंतु असतां प्रकाश करिती वाडः । म्हणोनि चाड तयांची ॥६२॥जैशीं आणिक पार्थिवें जडें । ओढविलीं या नेत्राआडें । दृष्टि रोधूनि गडद पडे । तैसें कुडे शाब्दिक ॥६३॥वेदांमाजीं उपनिषद्भाग । केवळ वेदांचें उत्तमांग । तेंहि शाब्दचि परी उपेग । उपनेत्रांगासारिखा ॥६४॥जड अष्ट्धा बाह्यकारी । जीवरूपा तिये अंतरीं । दोन्ही मिळोनि चराचरीं । आगंतुकेंशीं रूढवण ॥४६५॥जीवरूपातें विपरीत ज्ञान । कल्पनेसि अधिष्ठान । देहावच्छिन्न चैतन्य । जीवाभिधान तयासी ॥६६॥ पंचभूतात्मक जड। अन्नरसें ओतला पिंड । अन्नाशनें पोसे वाढ दृश्य सदृढ ते अष्टधा ॥६७॥आतां आगंतुकीचें लक्षण । पिंड जन्मतां सचेतन । तैं नेणे बाह्य व्यवहार जाण । नेणे भान आगंतुक ॥६८॥पुढें मोहाचें शिकवणें । करिती आत्पत्वें शहाणें । माझें तुझें घेणें देणें । बैसे ठाणें शत्रूचें ॥६९॥कामक्रोधशोकमोह । दंभलोभांचा समुदाव । मूळ वास्तव झालें वाव । पडे प्रवाह दुःखाचा ॥४७०॥स्त्रीपुत्रधनादिकांचा लोभ । येणेंचि भवदुःखाचा क्षोभ । वाढवी विषयांचें वालभ । परी हें अशुभ न वाटेची ॥७१॥जैसा कार्पास शुद्ध शुभ्र । तद्विकार तें श्वेतवस्त्र । आगंतुक रंग चित्रविचित्र । तैशी संसारपरिभाषा ॥७२॥परोक्षज्ञान म्हणती ज्यासी । इंद्रियद्वारा ये अभ्यासीं । अष्टमदें अभिमानासी । देहबुद्धीसी वाढावी ॥७३॥बाह्य शिकोनि आणिलें ज्ञान । तेणें भवद्रुमाचें छेदन । करूं म्हणती जे सज्ञान । ते व्युत्पन्न स्वप्नींचे ॥७४॥मन बुद्धि चित्त अहंकार । इहीं इंद्रियव्यापारचतुर । तिहीं अभ्यासिला संसार । तो परपार केवीं दावी ॥४७५॥सकळ शास्त्रांचा अभ्यास । नाना साधनांचा सोस । तो अवघाचि होय फोस । भवद्रुमास वर्धक ॥७६॥एथ आशंका धराल ऐशी । तरी कां भजावें शास्त्रज्ञासी । शास्त्र धरिलें तिहीं कुशीं । म्हणूनि त्यासी पूज्यता ॥७७॥पुषें गुंफूनि तृणांकुरीं । तो तुरा तुरंबिजे श्रीमंतनरीं । कां तंतु ओवितां रत्नहरीं । भूषणापरी मानिती ॥७८॥तैशीं वेदशास्त्रांचीं भाजनें । ईश्वरें निर्मिली द्विजरत्नें । म्हणोनि त्यांचिया पूजनें । रिद्धिसिद्धि साधती ॥७९॥पूजकांचे पुरती काम । आणि शास्त्रज्ञांचा न फिटे भ्रम । जैसें दीपातळवटीचें तम । दीपोत्तम निरसीना ॥४८०॥म्हणोनि आगंतुक ज्ञानें । कैसेनि भवाब्धि निस्तरणें । मुक्त म्हणतां बद्ध होणें । येणें गुणें शास्त्रज्ञीं ॥८१॥एवं कल्पनेची गोंवी । त्रिविध अविद्याचि आघवी । एक चिन्मात्रचि हें मिरवी । रूपीं नांवीं नाथिला ॥८२॥कनकबीजाची भुली । ते अचेतनीं वायां गेली । सचेतनामुखीं घातली । नाचों लागली विकारें ॥८३॥तैसें मायाजाळ तुवां अनंतें । अवलोकिल्या साचार वर्ते । त्वदनुग्रह याचि अर्थें । बोलिजे तो जगदीशा ॥८४॥आतां याचें सन्निधान । तो तूं एकचि श्रीबह्गवान । जागतियामाजीं स्वप्न । लया जाय ज्यापरी ॥४८५॥स्वरूपोन्मुख स्फुरण मुरे । तेव्हां भवाभास हा कोठोनि उरे । दृष्टि झांकितां विश्वाकारें । हारपिजे ज्यापरी ॥८६॥कां ध्याननिष्ठ उपासक । होऊनिया अंतर्मुख । पूजाविस्तार काल्पनिक । करी सम्यक् उत्साह ॥८७॥पुन्हा विसजीं जेव्हां ध्यान । तैं देवपरिवार उपकरण । त्या सर्वांची साठवण । उरे आपण एकला ॥८८॥सम्यक् म्हणजे बरव्या परी । नितरां म्हणजे विशेषाकारी । धीयते म्हणजे तुजमाझारीं । सांठवण पैं याची ॥८९॥एथ म्हणएसे तूं मुरारि । तुम्हीं ब्रह्मादि हरहरीं । सृष्टिस्थितिलयांची परी । निजाधिकारीं चाळिजे ॥४९०॥ऐसें न म्हणावें जगत्पति । तुझिये मायेची ही व्याप्ति । प्रसवूनि गुणत्रयाच्या मूर्ति । नाना विभूती रूढविल्या ॥९१॥मायाआवरण पडिलें चित्ता । ते सत्य मानिती अनेकता । तुझी अद्वैत एकात्मता । तयां भ्रांता उमजेना ॥९२॥तुझेनि भजनें अभेदभक्त । पूर्णज्ञानी विपश्चित । मायामोहें नव्हती भ्रांत । मायातीत तव प्रेमें ॥९३॥शुक म्हणे गा परीक्षिति । भजनेंचि मायेची निवृत्ति । व्यासें कथिली महाभारतीं । तें तूं सुमति परियेसीं ॥९४॥‘ मामेव ये प्रपद्यंते । मायामेतां तरंति ते ’ । ऐसेंचि अर्जुना भगवद्गीते । श्रीअनंतें बोधिलें ॥४९५॥देव म्हणती जी गोपाळा । म्हणसी देवकीचिया मज बाळा । कां पां स्तवितां वेळोवेळां । तरी घननीळा हें न म्हणा ॥९६॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP