मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २ रा| श्लोक ३६ अध्याय २ रा प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ ते ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ ते ३८ श्लोक ३९ ते ४० श्लोक ४१ ते ४२ अध्याय २ रा - श्लोक ३६ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ Translation - भाषांतर न नामरूपे गुणजन्मकर्मभिर्निरूपितव्ये तव तस्य साक्षिणः । मनोवचोभ्यामनुमेयवर्त्मनो देव क्रियायां प्रतियत्न्यथापि हि ॥३६॥न टके वाचेचिया जल्पा । न पुरे मनाचिया संकल्पा । तुझा मार्ग विश्वरूपा । सगुण सोपा न म्हणवे ॥९२॥अनुमानबोधें मनही जाणे । वाचा वाखाणी अनुमानें । तेही निर्गुण परंतु सगुणें । हीं निरूपणीं न टकती ॥९३॥ब्रह्मया समान हो आयुष्य । शेषाहूनि मुखें विशेष पृथक् वदनीं लक्ष लक्ष । स्फूर्त्तिप्रकाश शारदेचे ॥९४॥ऐसे जन्म अनंतकोटि । धरूनि नामरूपसिंधुपरतटीं । तुझिया पावेल हे गोष्टी । कोणा ओष्ठीं नुपजेची ॥६९५॥अनंतगुणीं नामें गौण । अनेक जन्में परिच्छिन्न । कर्मयोगें नामवर्ण । म्हणती विचक्षण यौगिक ॥९६॥योगसत्तावळें दृढ । तीं तीं नामें म्हणिजती रूढ । तैशींच रूपें प्रकटगूढ । जीं अवघड गणनेतें ॥९७॥ऐशीं गुणजन्मकर्में अनंत । इहीं नामरूपांचा अंत । न लगे न लगे हा वृत्तांत । देव समस्त बोलती ॥९८॥ऐसें गुणजन्मकर्में करून । नामरूपांचें अपारपण । यांचें करावया निरूपण । कोणा आंगवण असेना ॥९९॥सहित समुद्राची खोली । सकळ नभाची पायली । सीग देऊनि भरियेली । अणूरेणूही मोकळा ॥७००॥तितुक्या अणूरेणूंचें माप । लक्षोलक्ष पूजेकरितां अल्प । परी तुझीं नामरूपें अमूप । अनंतकल्प न गणती ॥१॥एवं भजनासीच सगुण योग्य । न सरे जाणिवेचा प्रसंग । मनोवाचेचा नाहीं लाग । धरिलें जग एकांशें ॥२॥ तरंग नेणे सिंधुमाना । लिक्षा साकल्यें नेणे गगना । पृथ्वीचिया घनवटपणा । रजःकणा नेणवे ॥३॥तैसा मनादिकांचा जो साक्षी । मनादि स्वप्रकाशें प्रकाशी । दृश्यें जडें हीं त्यातें कैशीं । जाणावयासी शकतील ॥४॥उपनेत्र नेत्रां प्रकाशक । शस्त्र हस्ताचें धारक । काष्ठ अग्नीचें दाहक । हा विवेक अघटित ॥७०५॥ऐसा मनोवाचेसि अगोचर । तेथ कैं प्राप्तीचा विचार । यदर्थीं बोलती सुरवर । तो प्रकार अवधारा ॥६॥चंद्रकांतीं द्रवे जेवन । सूर्यकांतीं हुताशन । नातरी लोह जैसें अचेतन । पवे चळण चुंबकें ॥७॥हो कां अधिक बहुतांगुणीं । परीस किंवा चिंतामणि । चंद्रिकास्पर्शें द्रवे पाणी । हे तो करणी त्या न ये ॥८॥तैसें होत कां सुरवर । अथवा व्युत्पत्तिसागर । नसतां सप्रेमभजनादर । साक्षात्कार न पवती ॥९॥सप्रेम भक्तीचा जिव्हाळा । तेचि चंद्रकांताची शिळा । तेथ चिन्मात्रचित्कळा । घनसांवळा प्रकाशे ॥७१०॥चंद्रबिंब प्रकटे व्योमीं । सोमशिळा प्रकट भूमी । द्रवे दोहींच्या संगमीं । साम्य सोमीं जीवन ॥११॥एथ अगोचर परमात्मा । अगोचरचि भजनप्रेमा । तरी कें साक्षात्कारी यया नामा । भक्तोत्तमा पात्रता ॥१२॥ये आशंकेचें निरसन । हे देव ऐसें संबोधन । जें तूं बहुधा द्योतमान । म्हणती सुरगण या हेतु ॥१३॥चंद्र पूर्ण पूर्णिमेसी । पूर्वे प्रकटोनि चरमदिशीं । जात जातां धवळी निशी । असाम्य तुजसीं उपमे तो ॥१४॥तूं संपूर्ण सर्वकाळ गमागमारहित अचळ । सन्मुख होतां सप्रेमळ । अमळीं अमळ आविर्भवसी ॥७१५॥त्या प्रेमाची जाति कैशी । ठावी आहे उपासकांसी । काया वाचा मनें धनेशीं । जे अनन्यतेशीं तुज शरण ॥१६॥गगनींहूनि सुटे पाणी । तें अवंचकत्वें अप्रे धरणी । तैसे सद्भक्त सकळ करणी । तुझ्या चरणीं अर्पिती ॥१७॥तोचि अर्पणप्रकार । उपासनक्रियासार । जेथ तुझा साक्षात्का । भक्तनिकर पावती ॥१८॥अगोचर जो वाचामना । तो तूं गोचर होसी भजना । भक्तीवीण साधनें नाना । मोक्षदाना नेदिती ॥१९॥तस्मात् मोक्षाचें कारण । तुझें सद्भावें सप्रेम भजन । हें प्रतिपादूनि उपसंहरण । करिती सुरगण भजनाचें ॥७२०॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP