मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २ रा| श्लोक २९ ते ३० अध्याय २ रा प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ ते ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ ते ३८ श्लोक ३९ ते ४० श्लोक ४१ ते ४२ अध्याय २ रा - श्लोक २९ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २९ ते ३० Translation - भाषांतर बिभर्षि रूपाण्यवबोध आत्मा क्षेमाय लोकस्य चराचरास्य ।सत्त्वोपपन्नानि सुखावहानि सताभभद्राणि मुहुः खलानाम् ॥२९॥अखिलांडकोटी ज्याचे उदरीं । तो तूं जगदात्मा श्रीहरि । रूपें धरिसी नाना परी । निर्विकारी निर्लेप ॥९७॥आम्हीं मायाभ्रमें परतंत्र । तूं मायानियंता स्वतंत्र । आम्ही मायागुणी गुणावतार । तूं निर्विकार निर्गुण ॥९८॥करावया विश्वमंगल । जैं तूं अवतरसी गोपाळ । तैं सज्जनां सुखकल्लोळ । होय सुकाळ स्वानंदें ॥९९॥तूं नित्यावबोध ज्ञानघन । क्षमा करणें अवतरोन । करिसी स्वधर्मसंस्थापन । परिपालन विश्वाचें ॥५००॥अनंत ब्रह्मांडें तुझे उदरीं तो तूं पुत्र कोणाचा श्रीहरि । शुद्धसत्त्वाची सामग्री । नानावतारीं नटनाट्य ॥१॥तूं अवतरसी जैं स्वलीले । तैं सज्जनां सुखसोहळे । तुझें ज्ञान मायापटळें । न झांकोळे स्वतःसिद्ध ॥२॥अनंत जन्मांचे सुकृतीं । लहाती नरदेहाची प्राप्ति । तेथ निष्काम सत्कर्में जैं हरिभक्ति । तैं विरक्ति हरिवरें ॥३॥पूर्ण विरक्ति सानुताप । तैं रजतमांचें उपडे रोप । सत्त्वशुद्धीचा उजळे दीप । होय लोप अनित्या ॥४॥नित्यस्वरूपानुसंधानें । शमदमसमाधिसाधनें । साधकीं माया निस्तरणें । तुझेनि भजनें गोविंदा ॥५०५॥त्या तुझिया सत्त्वोपपन्नावतारा । माया नातळे निर्विकारा । सूर्यें प्रार्थिल्याहि अंधारा । त्या सामोरा न ये तो ॥६॥तैसा खळासि होय अंत । म्हणोनि लंघिती ते दिगंत । तो तूं प्रत्यक अनंत । केवीं सुत देवकीचा ॥७॥तुझीं रूपें नारायणा । केवळ तोषदेंचि नव्हती सज्जनां । मोक्षदें होती ते विवंचना । मधुसूदना परियेसीं ॥८॥त्वय्यम्बुजाक्षाखिलसत्त्वधाम्नि समाधिनावेशितचेतसैके । त्वत्पादपोतेन महत्कृतेन कुर्वन्ति गोवत्संपदं भवाब्धिम् ॥३०॥ऐसा सत्त्वात्मक मूर्ति । त्या तुझ्या ठायीं प्रेमभक्ति । अनन्यभावें समरसती । पूर्णस्थिति प्रेमळ ॥९॥आर्त्त जिज्ञासु आणि अर्थार्थी । हे भक्त भजनें भेद स्वार्थी । गुंतले त्रिविधपुरुषार्थीं । अभेद चौथी ज्ञानमयी ॥५१०॥ते भक्तीसी करूनि महत्त्व । जिहीं शोधिलें शुद्ध सत्त्व । गुरुपरसादें आत्मतत्व । सांख्यानुभव पावले ॥११॥तत्त्वंपदांचें शोधन । तेंचि पिंडब्रह्मांडविवरण । करूनि जहदजहल्लक्षण । शुद्धचैतन्य निवडिलें ॥१२॥विचारें कळलें मीचि ब्रह्म । परंतु देहाध्यासाचा न फिटे भ्रम । यालागीं मनोजयाचा नेम । चित्तोपरम तो योग ॥१३॥सांख्ययोगाची दशासिद्धि । साधावया अलोट बुद्धि । वर्णाश्रम यथाविधि । चित्तशुद्धि निष्काम ॥१४॥सत्कर्माचें आचरण । करूनि कीजे कृष्णार्पण । प्रेमयुक्त अंतःकरण । भक्तिलक्षण या नांव ॥५१५॥संसारभोगाची विरक्ति । तरीच ठसावे हरिभक्ति । जंववरि संसारीं विषयासक्ति । तंववरि भक्ति ते माव ॥१६॥शुद्धि विसरूनि भ्रांत होणें । कीं भ्रांति सांडिजे सावधपणें । भ्राम्ति आणि सावधान । एके समयीं न वसती ॥१७॥जंववरि प्रपंचीं आवडी मोठी । तंववरी परमार्थीं भक्ति खोटी । देखोवेखीचिया गोष्टी । सर्व चावटी मायिक ॥१८॥मायाभ्रांतीचा संसार । दुःखप्रचुर भवसागर । तेथ विषय हे जलचर । इहीं दुसतर तरवेना ॥१९॥येती चिंतेचिया लाटा । भोंवरा तृष्णेचा ओखटा । येतां अभिमानाचिया लोटा । भरितें कांठा उचंबळे ॥५२०॥अहंतेची फूग धरी । मदाचे उल्लोळ उठती भारी । जेथ जलग्राह साही वैरी । परोपरी तळपती ॥२१॥असो दुसत्र हा भवार्णव । याचा सर्वांसि अनुभव । असोनि विरक्त न होती जीव । ऐशी माव हरीची ॥२२॥त्या तुझ्याठायीं श्रीअनंता । सांख्ययोगमार्गें चित्ता । समाधिक्रमें साठवितां । तद्रूपता पावले ॥२३॥एक तव चरणाचिये नावे । बैसले अनन्यप्रेमभावें । भजना वेगळें आघवें । त्यजिलें जीवें जड ओझें ॥२४॥भजननैका ही महंतीं । जोडूनि ठेविली आयती । मागें तरले नेणों किती । पुढें तरती अकल्प ॥५२५॥आयती संपादिली ते कैशी । नारदसनकादि महर्षीं । अनुष्ठिली ते भाविकांसी । भवतरणासी तारिका ॥२६॥काया वाचा आणि मन । यांचें सर्वही वर्त्तन । अखंड होय कृष्णार्पण । हें लक्षण तेथींचें ॥२७॥मनासी ध्यानसुखाची चवी । वाचा स्मरणें कीर्त्तनें गोंवी । काया नम्रत्वें लववावी । द्विजीं देवीं सज्जनीं ॥२८॥ऐशी आचरती रीति । पूर्वीं दाविली महंतीं । तेचि आचरोनि विरक्ति । कैवल्यप्राप्ति साधिली ॥२९॥जैसें कर्म सांसारिक । भजनही तैसेंचि म्हणती एक । ते ठकले मूर्ख हीनविवेक । ऐसें श्रीशुक बोलतो ॥५३०॥प्रपंच मिथ्या मायामय । भक्ति उत्कृष्ट तरणोपाय । महत्कृपेनें हा अभिप्राय । शुकाचार्य दर्शवी ॥३१॥श्रीपदप्रेम महत्सार । येर दुस्तर भवसाग्र । श्रीपादनौकेचा आधार । हा निर्धार पैं केला ॥३२॥आपुल्या शस्त्रें तंवचि मरे । होय निदसुरें किंवा घाबरें । शौर्य शत्रूच्या संहारें । शस्त्र निर्धारें तारक ॥३३॥अमृतें त्रीचि मरिजे । नेणोनि विषेंशीं सेविजे । विष सांडूनि अमृत पीजे । तेव्हां जीजे अमरत्वें ॥३४॥तैसें अनन्य भजनाची करूनि माव । योगक्षेमावरी हांव । तरी तें भजन नव्हे भव - । सिंधु अथाव दुस्तर ॥५३५॥कैसा भवसिंधु दुस्तर । ऐक तयाचा प्रकार । योगक्षेमाचा विचार । सविस्तर परियेसीं ॥३६॥मी माझें इतुकेंचि जळ । येणें भवसिंधु हा प्रबळ । योगक्षेमें कीजे पघळ । हाचि केवळ भजनही ॥३७॥भावें भजोनि भगवंता । क्षेम इच्छी कांतासुता । द्रव्यप्राप्ति योगचिंता । हे अनंता पुरवावी ॥३८॥मीपण देहीं करी उभें । माझेपणें कुटुंब क्षोभे । भजन कोटाळी ममतालोभें । जगा झोंबे तत्प्रेमें ॥३९॥तेणें भजनेंचि भवसागर । धांवणेकार होती चोर । औषध मारी होऊनि गर । जेंवी अविचार कुपथ्यें ॥५४०॥तैसें अविरक्त जें भजन । तेंचि भवाचें भाजन । विरक्त श्रीपदाराधन । भवमज्जन तें चुकवी ॥४१॥म्हणोनि श्रीपदप्रेमनौके । तरलीं संतवृंदे कितिएकें । त्यांसि भवजळचि नाहीं ठाऊकें । जालेंण असकें कैवल्य ॥४२॥ऐसा भवाब्धि लंघिला संतीं । सांप्रत भाविकां कोण गति । ऐशिये आशंकेची निवृत्ति । स्वयें बोलती सुरवर्य ॥४३॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP