मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २ रा| प्रारंभ अध्याय २ रा प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ ते ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ ते ३८ श्लोक ३९ ते ४० श्लोक ४१ ते ४२ अध्याय २ रा - प्रारंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा प्रारंभ Translation - भाषांतर श्रीमत्कृष्णात्मने नमः ॥ गोविंदकृपेचा कल्पतरु । गोविंद सच्चित्सुखागारु । अगाधबोधसद्गुणरत्नाकरु । वरद सद्गुरु तो माझा ॥१॥गोविंद योगियांचें ध्यान । गोविंद विरक्तांचे धन । गोविंद सच्चित्सुखांचे जीवन । चैतन्यघन विग्रही ॥२॥गोविंद गुणांची विश्रांति । गोविंद अनुभवाची शांति । गोविंद स्वानंदाची तृप्ति । सत्संविती गोविंद ॥३॥गोविंद मायेचा नियंता । गोविंद एकात्मतेचा भर्ता । गोविंद परेहूनि परता । गोविंद तत्त्वता गुरुगम्य ॥४॥गोविंद पुराणपुरुषोत्तम । गोविंद सनकादिकांचा काम । गोविंदगुणीं ग्रथितां व्योम - । सुमनें होतीं अपुरती ॥५॥गोविंदसत्तायोगबळें । माया ब्रह्मांडाचे पाळे । निर्मूनि अघटित घटना खेळे । तिसी नाकळे गोविंद ॥६॥अखिल ऐश्वर्याचा ठाव । गोविंदनामाचें गौरव । त्याचा जेथें प्रादुर्भाव । तें वैभव अनिर्वाच्य ॥७॥सामान्य भूपति आपुलें नाम । धातुपाषाणीं आपणां साम्य । लिहूनि मानितां यथाकाम । राज्यसंभ्रम व्यवहारे ॥८॥तेथें स्वमुखेंही सांगतां राजा । संशयापन्न राहे प्रजा । तन्नाममुद्रांकपत्रका ज्या । पादपूजा अर्पिति ॥९॥जडासि नामभूषण ऐसें । देऊनि वर्तविजे विशेषें । माझ्या स्वामीनें मजही तैसें । नामनिर्देशें पैं केलें ॥१०॥गोविंद माझा दयार्णव । तेणें जडीं हें नांव । घालूनि बोलवी अपूर्व । कविगौरव देउनी ॥११॥मी जडमूढ अज्ञान । तेथें स्वनाम अधिष्ठून । श्रीमद्भागवतव्याख्यान । करवी पूर्ण स्वसत्ता ॥१२॥नसतां व्युत्पत्तीचें बळ । नसतां शरीर अविकळ । अनुकूळ नसतां देशकाल । नसतां निश्चळ सुखवसति ॥१३॥फिरत फिरतां रानीं वनीं । गोविंद भरला ध्यानीं मनीं । तेणें स्वतंत्र करूनि वाणी । बळेंचि स्वगुणीं गोंविली ॥१४॥जैसें प्रवाहीं बांधोनि वळण । श्रीमंत स्वेच्छें नेती जीवन । तैसें गोविंदें माझें मन । केलें उन्मन निजसत्ता ॥१५॥आतां येणें मुखें सेवा । करणें न करणें ठेला हेवा । जें जें आवडे तुम्हांसि देवा । तें तें बोलवा कौतुकें ॥१६॥इतुकेंच ऐकूनि म्हणति गुरु । आतां पुरे हा विस्तारु । आरब्ध कथा सविस्तरु । तो विचारा अवधारीं ॥१७॥शुकें कथियेलें एकसप्तकें । तें परिसिलें परीक्षिति एकें । तें एथ श्रोतयांच्या विवेकें । स्वेच्छा पिके तें करीं ॥१८॥कळिकाळवणव्यामाझारीं । कृष्णकथापीयूषसरी । वर्षोनि रक्षी नानापरी । श्रीमुरारि निजगुणें ॥१९॥तेंचि हरिगुणलीलामृत । त्याचें निर्मथूनि नवनीत । जें कां श्रीमद्भागवत । रसाळ त्यांत हरिजन्म ॥२०॥त्या हरीची गर्भस्तुति । ब्रह्मादि देव येऊनि करिती । तिये कथेचि व्युत्पत्ति । आत्मस्थिति वाखाणी ॥२१॥तेथ बद्धांजलि नम्र शिरें । चरण लक्षूनि अंतरें । इये आज्ञेची प्रसादोत्तरें । प्रेमादरें स्वीकेलीं ॥२२॥तरी जी विश्वात्मकें देवें इथें अवधान द्यावें । माझें प्रेम वाढवावें । आज्ञापिलें अधिकारीं ॥२३॥पाणी देऊनि पीक घेणें । वेतन देऊनि राबवणें । तैसें अवधानें पुष्ट करणें । प्रेम देऊनि ममांतर ॥२४॥आतां ऐका जी कथामुकल । जयामाजीं कथा सकल । जैसा सांठवला परिमल । नीलोत्पलकलिकेंत ॥२५॥कंसें पीडितां यादवकुल । करुणें कळवळूनि गोपाल । मारावया कंस खल । उतावीळ जाहला ॥२६॥देवकीचे गर्भीं हरि । स्तविला ब्रह्मादि निर्जरीं । आश्वासिली देवकी नारी । हे कथा पुरी द्वितीयाध्यायीं ॥२७॥कंसें निग्रहिला निजपिता । आणि यादवां समस्तां । तेणें आपुलिया पक्षपाता । महादैत्यां मिळविलें ॥२८॥तें शुकमुखीचें निरूपण । मुळींचे श्लोक साडेतीन । बहु न वाढवीं कथन । कृष्णाभिगमन लक्षूनि ॥२९॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP