मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २ रा| श्लोक ३७ ते ३८ अध्याय २ रा प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ ते ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ ते ३८ श्लोक ३९ ते ४० श्लोक ४१ ते ४२ अध्याय २ रा - श्लोक ३७ ते ३८ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३७ ते ३८ Translation - भाषांतर श्रृण्वन् गृणन्संस्मरयंश्च चिन्तयन्नामानि रूपाणि च मङ्गलानि ते । क्रियासु यस्त्वच्चरणारविन्दयोराविष्टचेता न भवाय कल्पते ॥३७॥भजनें तरती सळीं भोळीं । भजनीं तत्पर चंद्रमौळी । ब्रह्मादिकांचिये मौळीं । पादधुळी भक्तांची ॥२१॥तो भक्त म्हणसी कैसा । कोण्या योगें कर्मफांसा । तोडूनि पावला स्वप्रकाशा । श्रीपरेशा तें ऐका ॥२२॥हरिगुणांचिये श्रवणीं । समाधान पावोनिया मनीं । स्वर्गसुखाची वाळणी । करूनि कीर्तनीं रंगती ॥२३॥शुक म्हणे गा परीक्षिति । श्रवणनिष्ठा तुझ्या चित्तीं । श्रवणसुखाची विश्रांति । तें तूं मूर्त्ति नरेंद्रा ॥२४॥हरिकीर्त्तनश्रवणापुढें । अमृत कायसें बापुडें । अमरपदासहित उडे । कीर्त्तनपाडें ते न तुके ॥७२५॥शमदमादिसाधनयुक्त । श्रवणसुखासी आसक्त । हरिप्रेमें स्वानंदभरित । नित्यमुक्त पैं झाले ॥२६॥श्रवणसुखाचे विश्रांती - । पुढें मोक्षाची गणना किती । आज्ञाधारक भगवन्भूर्त्ति । ऐशी ख्याति श्रवणाची ॥२७॥हरि तेथेंचि हरिवल्लभा । ब्रह्मा आला जिचिया गर्भा । ते हरिभक्ताचिया वालभा । न वचे क्षोभा आढ्यत्वें ॥२८॥तेथ इतर वैभवें किती । जीं हरिगुणश्रवणीं साम्य होती । भक्त पावले विश्रांति । अनुग्रहिती सात्त्विका ॥२९॥हरिगुणांची नेणे चवी । तो विषयसुखामाजीं गोंवी । जैशी मानिजे निर्दैवीं । नीच पदवी उच्चत्वें ॥७३०॥यालागीं हरिसुखें निवाले । हरिगुणश्रवणें पूर्ण धाले । जैसे कल्पतरू फळले । भाग्यें ओळले सदैव ॥३१॥कीं भगवद्भाग्यें सभाग्य पूर्ण । भवभणगाचें दुःखदैन्य । फेडूनि करिती सुखसंपन्न । भगवद्रुण अनुग्रहें ॥३२॥तृषार्त्त धुंडितां मृगजळ । पावला मानस निर्मळ । आणिका बोधूनि दीनदयाळ । वारी तळमळ तृष्णेची ॥३३॥तैसा हरिगुणीं निवाला । संसारसंताप विसरला । अंतरीं कळवळा उपजला । जन बोधिला निजतोषें ॥३४॥मायाभ्रमें संसारसुख । मानूनि पूर्वीं भोगिलें दुःख । तैसें देखोनि आंधळे मूर्ख । त्यांसि स्वसुख अनुग्रही ॥७३५॥अज्ञान अंधकूपीं पडतां । पूर्ण कृपा दाटोनि चित्ता । सांगे निजसुखाची वार्त्ता । यथार्थता हरिभजन ॥३६॥जंववरी आंगीं बाळपण । तंववरी खेळींच रंगे मन । तरुण म्हणती त्या अज्ञान । वयसा ज्ञान यथार्थ ॥३७॥कायाकांचनकांताप्रेम । तारुण्यकाळीं खवळे काम । अहोरात्र भोगवी श्रम । सुखविश्राम अंतरला ॥३८॥वृत्तिक्षेत्रममता वाढे । मान्यतेचा गर्व चढे । अष्टमदें आपणापुढें । दुजें नावडे आथिलें ॥३९॥तंव प्रारब्धाची विपरीत गति । इच्छेसारिखीं फळें न होती । केले कष्ट वृथा जाती । दुःखावर्तीं मग पडे ॥७४०॥कैसें भाग्य विपरीत झालें । शत्रूचे मनोरथ पुरले । लोकीं हीनत्व अंगा आलें । ऐसा आहाळे विषादें ॥४१॥लोक सभाग्य सर्वकामीं । आम्हां क्षोभला कुलस्वामी । म्हणोनि प्रवर्त्ते अभिचारकर्मी । नाना नेमीं सक्लेश ॥४२॥तंव वार्द्धक्य खवळे अंगीं । रोम उठती सर्वांगीं । अधीर अशक्त नेमा भंगी । पावे जगीं अपकीर्ति ॥४३॥द्वेष अंतरींचा न विसरे । क्रोधें संतप्त होऊनि मरे । अंतकाळीं वैरें स्मरे । जन्मांतरें साधावया ॥४४॥ऐसे अज्ञानें बुडतां भवीं । त्यांसी भजन कांसे लावी । श्रवणकीर्तननेमें गोंवी । विश्रांति दावी स्वसुखाची ॥७४५॥स्मरणनिष्ठेचा अमृतझरा । लावूनि दावी अनुभव खरा । स्मरणें विसरवी विसरा । कदा निदसुरा न वसोंदे ॥४६॥अहोरात्र स्मरवी नाम श्रवणकीर्तनीं तेणें प्रेम । हृदयीं प्रकटे मेघश्याम ।जो निष्काम सुखसिंधु ॥४७॥अनंत अवतार अनंत रूपें । अनंतनामें गुणप्रतापें । मंगळ उमाणती मापें । शिवस्वरूपें सुसेव्यें ॥४८॥कल्याणकल्पद्रुमाचीं बीजें । कां मंगलसूर्याचीं सुतेजें । कैवल्यभद्रासनाचीं राज्यें । अमरपूज्यें प्रसवती ॥४९॥वाचेसि सप्रेम नामस्मरण । हृदयीं कोंदलें सगुण ध्यान । भजनानंदीं गुंतलें मन । संसारभान मावलळें ॥७५०॥विश्वीं कोंदला अनंत । भजनापुरता आपण्भक्त । तेणें इंद्रियां एकांत । स्वानंदभरित सर्वदा ॥५१॥ऐसें विनटतां चरणसेवे । निमाले शत्रूंचे मेळावे । संसार नाहीं ठावें । केलें आघवें हरिभजन ॥५२॥सर्वभूतीं दिसे देव । सहज वंदनीं सद्भाव । अर्चनविधीचा गौरव । अवंचकत्व परिचर्या ॥५३॥अहित वारूनि हितोपदेश । सख्यभजन हें निर्दोष । आत्मनिवेदनाचें यश । भेद निःशेष नासतां ॥५४॥ऐसा सर्वांपरी भक्त । भेदभ्रमाची विसरला मात । ज्याचें भजनाविष्ट चित्त । नित्य निर्मुक्त तो झाला ॥७५५॥कैंचा संसार पुढती तया । मोक्षा न वचे आना ठायां । मनें वाचासहित काया । अनामया समरसला ॥५६॥तो स्वयेंचि झाला सर्वगत । सबाह्य हारपलें द्वैत । नुरेची संसाराची मात । आविष्तचित्त यालागीं ॥५७॥जळ गोठोनि गार झाली । अनादिभ्रमें चक्रीं पडिली । दैवें सागरीं प्रवेशली । न वचे निवडली कल्पांतीं ॥५८॥ऐसे अनंत अवतार धरून । केलें स्वधर्मसंस्थापन । कृष्ण केवळ ब्रह्म पूर्ण तोषें सुरगण नाचती ॥५९॥ज्याचे प्राप्तीसि योगयाग । करितां साधनांनीं लाग । तो हा प्रत्यक्ष श्रीरंग । आमुचें भाग्य सफळित ॥७६०॥भजनभाग्याचें जें फळ । तो हा कृष्णजन्म केवळ । देवकीचें भाग्य सफळ श्रीगुपाळ जोपोटीं ॥६१॥दिष्ट्या हेरस्या भवतः पदो भुवो भारोऽपनीतस्तव जन्मनेशितुः । दिष्ट्याऽङ्कितां त्वत्पदकैः सुशोभनैर्द्रक्ष्याम गां द्यां च तवानुकम्पिताम् ॥३८॥तुज ईश्वराचें स्थानभूत । देवकी झाली हें परमाद्भुत । भाग्य म्हणोनि देव स्तवित । त्रिजगीं ख्यात मंगळ ॥६२॥हरिसी भूमंडळींचा भार । म्हणोनि हरिसंबोधनें सुरवर । समस्त करिती जयजयकार । स्तवनीं तत्पर होऊनि ॥६३॥तुझिया जन्ममात्रेंकरून । झालें भूभारनिरसन । भाग्यें आमुचे देखती नयन । श्रीपदचिन्ह दिवि भुवि ॥६४॥ध्वजवज्रांकुशादि चिन्हें । यवाब्जऊर्ध्वरेखालांछनें । अनंतगुणीं सुशोभनें । स्पर्श पावणें सुरमर्त्यें ॥७६५॥तुवां अनुकंपेंकरून । स्वर्ग मर्त्य उभय भुवन । रक्षिलें अशांतें देखोन । परम धन्य पैं आम्हीं ॥६६॥झणें तूं म्हणसी रमारमणा । जन्म धरूनि भूभारहरणा । केलें म्हणोनि वाखाणां । तरी मी जन्म अमरणा पावे कीं ॥६७॥मजहि संसार जीवापरी । तरी स्तवावयाची कोण थोरी । ऐसें न म्हणावें श्रीहरि । तूं निर्विकारी परब्रह्म ॥६८॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP