मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २ रा| श्लोक ११ ते १५ अध्याय २ रा प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ ते ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ ते ३८ श्लोक ३९ ते ४० श्लोक ४१ ते ४२ अध्याय २ रा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर नामधेयानि कुर्वन्ति स्थानानि च नरा भुवि । दुर्गेति भद्रकालीति विजया वैष्णवीति च ॥११॥मृत्युलोकीं भजनपर । तुझे ठायीं होती नर । नाना स्थानांचा विचार । नामोच्चार तो ऐकें ॥२१॥दुर्गमापासूनि सोडविती । म्हणोनि दुर्गा ऐसें तुज म्हणती । भद्र म्हणजे कल्याणदात्री । भद्रकाली या नामें ॥२२॥अधर्माचा पराजय । करूनि धर्माचा करिसी विजय । यालागीं विजया नामधेय । लोकत्रयविख्याता ॥२३॥माझिये आज्ञेच्या लाघवीं । बर्त्तसी म्हणोनि तूं वैष्णवी । कुमुदा चंडिका कृष्णा माधवी । इत्यादि नांवीं वर्णिती ॥२४॥कुमुदा चण्डिका कृष्णा माधवी कन्यकेति च । माया नारायणीशानी शारदेत्यम्बिकेति च ॥१२॥कुमुदा नामें संजीवनी । चंडिका चंडमुंडमर्दिनी । कृष्णा विश्वमोहिनी । वासंतिनी माधवी ॥१२५॥कन्यका नामें अस्पृष्टकामा । माया वर्धिनी भवद्रुमा । नारायणाची ऐश्वर्यवामा । जगद्विश्रामा नारायणी ॥२६॥ईशनसामर्थ्यातें धरिती । म्हणोनि ईशानी हें म्हणती । शरदुत्सवाची अधिष्ठात्री । यालागीं म्हणती शारदा ॥२७॥धारण पोषण अभिशिक्षण । करिसी विश्वाचें पालन । यालागीं अंबिका अभिधान । करिती जन तुजलागीं ॥२८॥ऐशी चौदा नामरत्नीं । स्वयें भगवंतें गौरवूनि । प्रतिष्ठिली नानास्थानीं । श्रीभवानी जगदंबा ॥२९॥चतुर्दश नामें भगवद्दत्त । प्रातःकाळीं स्मरती नित्य । ते पावती अभिवांच्छित । हा गुह्यार्थ एथींचा ॥१३०॥गर्भसंकर्षणात्तं वै प्राहुः संकर्षण भुवि । रामेति लोकरमणाद्बलं बलवदुच्छ्रयात् ॥१३॥आणीक वदे श्रीभगवान । सम्यक् गर्भाचें कर्षण । करिसी म्हणोनि संकर्षण । म्हणती जन गुणनाम ॥३१॥लोकां रमवील स्वस्वरूपीं । म्हणोनि राम हें नाम विश्व कल्पी । बलोत्कर्षें महाप्रतापी । विश्वव्यापी बल नाम ॥३२॥श्रीशुक उवाच - संदिष्टैवं भगवता तथेत्योमिति तद्वचः । प्रतिगृह्य परिक्रम्य गां गता तत्तथाऽकरोत् ॥१४॥एवं पूर्वोक्त प्रकारीं । आज्ञापिता श्रीमुरारी । ते वरदाज्ञा अत्यादरीं । अंगीकारी जगदंबा ॥३३॥भगवंतें सम्यक् प्रकारें करून । स्वमुखें केलें आज्ञापन । तें स्वस्वामीचें वचन । केलें मान्य अत्यादरें ॥३४॥आम्रेडित म्हणजे द्विरुक्ति । तथेति आणि ओमिति । ऐशी अत्यादरें आदिशक्ति । तोषे चित्तीं प्रभुवाक्यें ॥१३५॥आज्ञा घेऊनि आदिमाया । लागली स्वामीचिया पायां । प्रदक्षिणा करूनिया । नियोगकार्या चालिली ॥३६॥कित्येक म्हणती पाखंडी । वरदायक कलौ चंडी । परी आज्ञेवेगळी तिचेनि काडी । नोहे वांकुडी पृथक्त्वें ॥३७॥जैसे याचक बराडी । सेवका स्वामीचिये प्रौढी । ग्रासा एकास्तव बडबडी । तैशी चंडी सकामा ॥३८॥झाडें करिती पूर्ण काम । तरी काय ईश्वर कल्पद्रुम । पाषाण चिंतामणीचें नाम । तो परब्रह्म म्हणावा ॥३९॥ज्यावरि प्रभूचा अनुग्रहो । तेथ इत्यादि वस्तुसमूहो । करिती सेवेचा लवलाहो । धरूनि देहो आणिमादि ॥१४०॥म्हणोनि अमर्थ जगदात्मा । तो तरी एकचि परमात्मा । महत्त्व देऊनि अनेक नामा । प्रतापमहिमा प्रकटवी ॥४१॥भगवद्गीतेचे सप्तमाध्यायीं । स्वमुखें बोलिला शेषशायी । कीं जो जो भजेल जे जे देहीं । ते ते ठायीं मी प्रकटें ॥४२॥यो यो यां यां तनुं भक्तः । या दों श्लोकीं रमाभर्ता । म्हणे जो जो भक्त जे जे देवता । श्रद्धयान्विता आराधी ॥४३॥ते देवतामूर्तीच्या ठायीं त्याची । अचलश्रद्धा मीच रचीं । मग ते श्रद्धेनें भजतां मीची । करीं कामाची पूर्णता ॥४४॥ऐसें कळोनि भ्रांत होती । अहंताभ्रमें भेदं कल्पिती । ते ते प्राणी दुःखी होती । नागवती अभिमानें ॥१४५॥पंचायतन पंचभूतें । जडें त्रिगुणात्मकें दैवतें । परमात्म्याचें चैतन्य तेथें । हें एकात्मते जाणावें ॥४६॥सर्वव्यापी श्रीभगवान । तोचि झाला पंचायतन । ऐसें जयाचें अभेद भजन । सुखसंपन्न तो होय ॥४७॥समुद्राचे तरंग अनेक । हें बोधे तें ज्ञान सम्यक । तरंगा एकाचे सिंधु अनेक । हा अविवेक ज्ञानाचा ॥४८॥लेंकुरासाठीं मांडिती सटी । परब्रह्म जन्मलें इचे पोटीं । ऐशीं अज्ञानें उफराटीं । कामें करंटीं नागविलीं ॥४९॥एथ परमात्मा विश्वव्यापी । नाना देवता तत्संकल्पीं । होती जाती कल्पोकल्पीं । वृथा विकल्पी जल्पती ॥१५०॥असो पाखंडीयाची गोठी । मग ते अघटितघटनापटी । प्रभूची आज्ञा वंदूनि मुकुटीं । भूतळवटीं पातली ॥५१॥जैसें आज्ञापिलें नाथें । तैसें तैसें तेथ तेथें । सर्व प्रभूच्या सामर्थ्यें । ती तदर्थें संपादी ॥५२॥कुसुळी जैसें चोरूनि लोणी । लोकांचें आपुल्या सदना आणी । देवकीगर्भसंकर्षणीं । हेचि करणि दाखविली ॥५३॥गर्भे प्रणीते देवक्या रोहिणीं योगनिद्रया । अहो विस्रंसितो गर्भ इति पौरा विचुक्रुशुः ॥१५॥देवकीगर्भातें योगनिद्रा । नेऊनि घालितां रोहिणीउदरा । प्रवाद उठिला माजीं नगरा । लोकद्वारा तो ऐका ॥५४॥सुहृद सदय ज्या नरनारी । शोक करिती मथुरापुरीं । सातवा गर्भ देवकीउदरीं । कोणे परीं जिराला ॥१५५॥दैवीसंपत्ति देवकी । अहंकंस हा अविवेकी । बाळें मारितां झाली दुःखी । धाकें धडकी बैसली ॥५६॥कंस केवळ प्रलयकाळ । झणीं मारील सातवा बाळ । येणें भयें उतावीळ । गर्भगोळ टाकिला ॥५७॥देवकीचा गर्भपात । झाला म्हणोनि नगरीं मात । कर्णोपकर्णी हा वृत्तांत । कंसा विदित जाहला ॥५८॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP