मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ११४१ ते ११६०

दासोपंताची पदे - पद ११४१ ते ११६०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


११४१
अगणित मृगजळ चंचळ सरिता, पाहातां काहीं चि नाहीं.
ॐघ वेग झरझर द्रवती. तरतासि तूं तेथें कायी ?
दोहिक सुख दुःख तैसें नेणोंनि बुडतासी कोरडा डोहीं.
चेॐ धरुंनि स्वप्न विसरे मायिक. गुरुप्रति शरण जाईं रेया ! ॥१॥धृ॥
चेॐ धरीं सुजाणा ! नरदेह जातसे वायां.
ऐसा संगु तुतें कैचा; पुडती वेगु करीं लवलाह्या. रेया ! ॥छ॥
शरीर, सदन, वन, जन धन भजतां जन्म चि गेले अपार.
बहु श्रीयकर सूतवनितादिक, तें काये भान जालें स्थिर ?
अपरबुद्धि वायां करिसी सोसणी; वेचलें हें ही शरीर.
दिगंबरू गुरू भज; कां, आलया ! पावसील पद पर रेया ! ॥२॥

११४२
सकळ क्षीतितळ जळमय, परि तें चातकु न भजे तयासी;
निरालंबीं परिभ्रमण करि; वरि आळवितो मेघांसी !
देह पडोल परि व्रता न ढळे ! कवणु तया उपदेशी ?
सहज गुण मज लगो कां; तेवी आळवीन दत्तासी. ॥१॥धृ॥
आत्मयां ! श्रीदत्ता ! परम दयामृत वर्षें !
सकळ ताप माझे करिकां शमन ! न निवें मीं अन्यरसें रेया ! ॥छ॥
नामस्मरण भवनाशन; परि तें तुजविण न मनें सुखाचें.
वियोगताप उपशांती करि. स्मारक होये तयाचें.
कवण कर्म माझें ? कैसें दुष्कृत ? दर्शन नव्हे चरणाचें !
दिगंबरा ! आतां कित्ती आळउ ? उदर फुटे जीवाचें रेया ! ॥२॥

११४३
नित्य श्रवण अनुचिंतन करितां, चित्ताविषयो जालासी.
गुणीं गुंपलें मन, परतिसि न धरीं, आठवें चि, जडलें रूपासी.
सकल शरीरसुख सांडूंनि, मनस धावतसे तुजपासी !
तथापि सूखकर काहीं चि न मने भेटीवांचूंनि; परियेसीं. ॥१॥धृ॥
रेया ! श्रीदत्ता ! कैं येसी ? वियोगें विकळ मन माझें !
आन योग मज दुःखेंसीं सम ! शरीर जाहालें वोझें ! ॥छ॥
स्मरण नित्य गुणकीर्तन श्रवणें तें चि पुडतो पुडती.
शुद्ध, श्यामरूप, राजीवलोचन अखंड स्फुरताहे चित्तीं.
विसरीं तो चि आठउं. प्रकटे, तैं दुःख साहाणें कित्ती ?
दिगंबरा ! चित्त न करीं कठीण ! प्रकटें करुणामूर्ती ! ॥२॥

११४४
अनुसूयेचां घरीं मीनलिया नारी ह्मणती, :- अनसूये ! अवधारीं वो !
श्रीदत्त सुंदरी आणिपां बाहेरा ! पाहोंनि तयासीं डोळे भरी वो ! ॥१॥धृ॥
बोले अनसूया अतिप्रीति माया, :- ‘ बापा ! येइं ! रे ! योगिया ! रे !
तुते आळिवया पाहाती सखीया ! कृतकृत्य धन्य होती तियासे ! ’ ॥छ॥
जाणीतली खूण मातेचें वचन; दुडुदुडु पावला धावोंन वो !
देउंनि आलिंगन वो सिंगां रिघों करिता जाहाला स्तनपान वो ! ॥२॥
कुरुवाळी माया; पाहाती सखीया; सादु घालिती दत्तात्रेया वो !
योगिजनप्रीया ! अरे ! सिद्धराया ! दिगंबरा ! आळिवया ! रे ! ॥३॥

११४५
‘ बोलु बोले, बाळा ! ’ बोलती वेल्हाळा; रूप लक्षिती दोहीं डोळां वो !
येरु सहज गूणें केसणें, नसणें, अवलोकी तयांची वदनें वो ! ॥१॥धृ॥
अवधूतुदर्शनें आनंदलीं मनें; सतियांचीं गुंपलीं चेतनें वो !
लक्षिती लक्षणें, अंगदभूषणें, रूप साजीर कोडीसवाणें वो ! ॥छ॥
येकि ह्मणती :- ‘ बाळ चित्रिचा पूतळा ! पाहावा चि वाटे वेळोवेळां वो !
अनुपम्यु कळा सुंदरु सावळा; धन्य सखी अनसूया वेल्हाळा वो ! ’ ॥२॥
पाहातां पादतळें, जैसीं रातोत्पळें मृदें, साजिरीं सकोमळें, वो !
घागरियानें वोळ शब्द करिती बाळे;
मनसें मानितां कैसें कळे ? वो ! ॥३॥
नादी वेद श्रूती स्वर उपटती; नष्ट वेद तेणें उज्वळीती वो !
असतां ऐसीं स्थीती जाणवों ये युक्ती पादद्वय वेदवेद्यव्यक्ती वो ! ॥४॥
ऐसें होतां ज्ञान हें रूप कवण लक्षितां कुंठीत जालें मन वो !
भाग्य अनुष्ठान अत्रीचें कवण ? दिगंबर सांपडलें निधान वो ! ॥५॥

११४६
नयन सुरेख पाहातां कौतुक, येक ह्मणती, गेली तानभूक वो !
फांके चिदात्मक तेज अलौकिक; शशि, सूर्य लोपती पावन वो ! ॥१॥धृ॥
अभिनव माये श्रीमुख मीं पाहे; तेणें सुखें गगनीं न मायें वो !
अवधूतु सैये ! परब्रह्म होये; चिद्धन जोडलें अनुपायें वो ! ॥छ॥
दृष्टितेजें येणें कळे अनुमानें माया तमस हरे जेणें वो !
नेणें तेजोगुणें नयन वो ! येणें रूपें ब्रह्म चि साच माने वो ! ॥२॥श
कृपाअवेक्षणें जडांचीं अज्ञानें तोडील श्रीदत्तु; सत्य जाणे वो !
दिगंबरें येणें ज्ञानामृतघनें योगीजन तरती सगुणें वो ! ॥३॥

११४७
स्वभावें श्रीदत्तु मुख पसरीतु; तेथें चि येकींचा भावो स्वस्थु वो !
स्फुरे परमार्थु; येणें तुटे स्वार्थु; देखती आभासु; ऐसा व्यक्तु वो ! ॥१॥धृ॥
श्रीदत्तु निधान अनसूये ! जाण; करी करी याची जतन वो !
ब्रह्म निरंजन सांपडले सगूण; क्षणक्षणा देयीं आलिंगन वो ! ॥छ॥
ययाचां वदनीं पाहातां साजणी ! लक्षणें देखिलीं दोनि तीनि वो !
दृढ जालें मनीं ब्रह्म हें ह्मणौनी; पुससील तरी घे श्रवणी वो ! ॥२॥
अनंतें ब्रह्मांडें दीसती प्रचंडें; तयामाजि विश्व घडे, मोडे वो !
तें रूप केवढें ? गुणी न संपडें; पुडती लक्षितां वाडें कोडें वो ! ॥३॥
तीतुलें ही भान जांहालें; अन सर्व शून्य अवघें गगन वो !
आदि अवसान अभावालागूंन न दिसे; पुडती दिसे अन वो ! ॥४॥
अभावो ही, जाणे, नीमे पूर्णपणें; त्रीपुटीचें आटलें देखणें वो !
पाहातां पाहाणें अनिवड; तेणें आनंदु जाहाला समाधानें वो ! ॥५॥
ऐसें दीसे माये ! पूससील काये ? ब्रह्म चि केवळ सत्य होये वो !
दिगंबरूं सये ! द्वैतासि न साहे. दर्शनें सायुज्य होत आहे वो ! ॥६॥

११४८
परब्रह्मसार, शुद्ध, निरंतर, व्योमासांरिखें निर्विकार, वो !
अलक्ष, अपार, शिव, परात्पर, साकार चि, परि निराकार वो ! ॥१॥धृ॥
अवधूतरूप चैतन्य स्वरूप साकार चि, परि निर्विकल्प वो !
पाहातां अमूप भासे भासरूप, दर्शन ययाचें सुखरूप वो !॥छ॥
गुणदृष्टी पाहे गुणी गुणा नये; येणेंसीं अभिन्न स्फुरे माये ! वो !
नीवडों न लाहे; कैसें करूं काये ? मनस वीरोंन जात आहे वो ! ॥२॥
प्रापंचीक भान तेणेंसीं अभिन्न; द्रष्टा, दृश्यतें चि; तें दर्शन वो !
बाळक सगूण पाहातां निर्गूण दिगंबर ब्रह्म परिपूर्ण वो ! ॥३॥

११४९
वस्त्रें अळंकार पाहातां समग्र श्रीदत्ताचे नीज सुखकर वो !
अवस्थागोचर भान होये क्षर प्रकाशे स्वरूप निरंतर वो ! ॥१॥धृ॥
सगूण चि माये ! परि व्यक्ती नये, ब्रह्म प्रकाशरूप होये ! वो !
योगी अनुपायें सेवितील पाये. तयांचा विभेदु लया जाये वो ! ॥छ॥
ब्रह्मा भेदकर; स्वरूप साकार; संगु याचा लाहाती जे नर वो !
ते ही ते समग्र ब्रह्मा भेदकर; जनी जना होतील साचार वो ! ॥२॥
अंगदभूषणें तें हीं जड लेणें; ब्रह्म प्रकाशक केलें येणें वो !
येणें अनुमानें सेवका कारणें तें चि पद देइजैल, जाणे वो ! ॥३॥
बहु सांगों काये ? सत्य जाणे, माये ! मही अगोचर याचे नोहे वो !
दिगंबरू सये ! सेवीं अनसूये ! पावशील पर अन पाये वो ! ॥४॥

११५०
दत्ताचे घरीत ते ही ते समस्त ब्रह्म प्रकाशक सुनिश्चीत वो !
मायागुणमुक्त ब्रह्म सदोदित चरीत सहीत वो ! ॥१॥धृ॥
निरंजनपाये ब्रह्म सत्य होये; धरिजे हे कवणे उपाये ? वो !
त्याचेनि अन्वयें जग ब्रह्म आहे. आतां, हें साकार ह्मणों नये, वो ! ॥छ॥
शब्दें संगयोगें चरीत प्रसंगें येणें तरइल जन अवघे वो !
श्रवणें प्रेमांगें येणें भक्तिमार्गें दिगंबरें मुक्ती लागे वो ! ॥२॥

११५१
त्रिपुटीचे योग होसी बहिरंग पाहातां दत्ताचे येक अंग वो !
स्वर्ग ते ही तारी जग दर्शनें जिंकिले सर्व मार्ग वो ! ॥१॥धृ॥
कैसें करू ? माये ! मन स्थीर नोहे; धरिजे हें कवणें उपायें ? वो !
क्षणक्षणा पाये आठवती सैये ! कमळनयनु भेटी न ये वो ! ॥छ॥
नयनीं पाहीन ! बाहीं कवळीन ! श्रीदत्तु या जीवाचें जीवन वो !
योगियाचें ध्यान; जेथें ज्ञानस्थान; दिगंबरस्वरूप निधान वो ! ॥२॥

११५२
अंतरीची खूण केली हारपोन; लाहालें बाहेरि मज ध्यान वो !
करितां स्मरण आठवे वदन; गुंपलें, नुपडे माझें मन वो ! ॥१॥धृ॥
अतिप्रीति माये ! धरीन मीं पाये; वियोगु कैसेनि मज साहे ? वो!
जीवीं जीउ सये ! अवधूतु होये; परति न करी; करूं काये ? वो ! ॥छ॥
जप अनुष्ठान ने घे माझें मन; नयनीं पाहीन मी चरण वो !
नित्य संभाषण, संगु मीं लाहीन; दिगंबरें हरिलें बोधन वो ! ॥२॥

११५३
हृदय दुभागे कवणापुढें ? सांगे श्रीदत्ता ! येईंन तूजसवें रे !
जाउ नाहीं योगें येणें; व्यर्थ भोगे सूख तेंहीं दुःख अवघें रे ! ॥१॥धृ॥
श्रमलया जीवा तुं मज विसांवा; सत्य सत्य जाण देवदेवा ! रे !
संगु न संडावा; वियोगु नें दावा; आणिक न करी देवसेवा रे ! ॥छ॥
तुझा नाहीं संगु; वरि दुःखयोगु; कृतकर्म लागलासे लागू रे !
उमजवी मार्गु; जेणें लाहे संगु; दिगंबरा ! न संवरे वेगू रे ! ॥२॥

११५४
श्रीदत्तु सावळा चैतन्यपूतळा मीं कैं कैं देखयीन डोळां ? वो !
कासे सोनेसळा, तीळक पीवळा, चंदनाची उटी, वरि माळा वो ! ॥१॥धृ॥
जीवाचें जीवन जीवें वोवाळीन; अखंड लागलें त्याचें ध्यान वो !
माझें पंचप्राण श्रीदत्त निधान; न स्मरे आणीक तेणेंवीण वो ! ॥छ॥
घुंसलें श्रवणीं तें तेज गगनीं लोपूंनिया स्फुरे दीनमणी वो !
मुकुट शिरस्थानीं चिद्रत्नाची खाणि तें तेज न स्माये त्रिभुवनी वो ॥२॥
बाहिवटें, कंकणें, मुद्रिकांचें लेणें, अंगद कानकें, विभूषणें वो !
दिगंबरें येणें कमळनयनें हरिलीं साधूंचीं निजमनें वो ! ॥३॥

११५५
श्रीदत्तु निधान माझे पंचप्राण; साधीन मीं गुप्त योगधन वो !
चंचळ हें मन बळी, अहंकरण; सकळ शरीर मी देयीन वो ! ॥१॥धृ॥
अरे ! शुद्धश्यामा ! अरे ! पूर्णकामा ! देवा ! नकळे तुझी सीमा रे !
स्वस्वरूपरामा ! त्रिगुणविरामा ! भेटि देसील कयी आह्मा ? रे ! ॥छ॥
श्रीदत्ताचें रूप चैतन्यस्वरूप, व्यक्त, सन्मय, निर्विकल्प वो !
ब्रह्म सदोदीत स्वानंदभरीत दिगंबर मूर्तिमंत वो ! ॥२॥

११५६
बोलतीसे माया :--- अरे ! योगिराया ! तुझया लागैन नित्य पाया रे !
झणें तूं आत्मया ! जासी खेळावया; तपे प्रखरु प्रतपीया रे ! ॥१॥धृ॥
तुं माझे प्राण ! श्रीदत्ता ! जीवन; न राहे तुजवीण माझें मन रे !
नित्य करितां ध्यान तुझी आठवण, गलीत जाहाले करणगण रे ! ॥छ॥
वन भयंकर निर्मळ अपार; व्याघ्र क्रीडती निरंतर रे !
सकळ कौमारवय अविचार; आलें हीं नेणा भय थोर रे ! ॥२॥
येरु ह्मणे ::--- माये ! आह्मीं करूं काये ? वासना हे उगली न राहे वो !
धरीन मीं पाये छेदीपां उपाये; वासने अधीन देह आहे वो ! ॥३॥
अनसूया बोले ::-- वासना हे गळे, ऐसें वर्म काहीं न कळे रे !
योगी वेडावले; संन्यासी श्रमले; दिगंबरा ! तुतें शरण आले रे ! ॥४॥

११५७
ऋषिपुत्र समग्र बैसले एकत्र, बोलती स्वप्रीय उत्तर रे !
येक ह्मणती सार दत्ताचें शरीर यत्नें राखिजे निरंतर रे ! ॥१॥धृ॥
श्रीदत्तु विसावा ! विश्रांतीचा ठेवा ! सखा ! स्वजनु, जीउ जीवा रे !
येणें क्षेम सर्वांआह्मां आहे. देवा ! रक्षीं ययासि शिवशीवा ! रे ! ॥छ॥
यये वनीं व्याघ्र गर्जती; निसार दिसे निर्जन भयंकर रे !
रूप सकुमार, पांघुरवा शरीर, आछादूंनि ठेवा दिगंबर रे ! ॥२॥

११५८
येकि ह्मणती ::-- ‘ यया रक्षिजेसी क्रीया नाहीं. अगम्य याची माया रे !
दृष्टि चुकउंनि जाये कवणा ठाया तो ठावो चि
नूमजे जीवा यया रे ! ॥१॥धृ॥
अरे ! गुणहीना ! कमळनयना ! अंतरे जातासि बहुगूणा रे ! ! ’
न साहावे मना वियोगवेदना; भय तुझें चि अंतःकरणा रे ! ॥छ॥
येक ह्मणती काये ? धरा याचे पायेमग कैसेनि दूरि जाये रे !
चाळवीतु आहे ? झणें गुप्तु होये ! दिगंबरा ! शब्दु न साहे रे ! ॥२॥

येक ह्मणती ::-- ‘ यातें न रखने तूमते;
हृदयीं बंधन करा चित्तें रे ! येणें अवधूतें गोविलीं बहूतें;
श्रमती यालागि नाना मतें रे ! ॥१॥धृ॥
अरे ! तुझे स्थान होतें वेद्यमान, तरि हें आयासें बहु जन रे !
न श्रम ते जाण; आतां तुज आण; दाखवीं आह्मां लागूंन रे ! ’ ॥छ॥
येक ह्मणती ::-- मौनें उगें चि राहा ध्यानें लक्षूंनि ययाचीं लक्षणें रे !
उपायें कवणें होइल यया जाणें ? करावीं जीवाचीं बंधनें रे ! ’ ॥२॥
येक वदती वचन ::-- ‘ करा आराधन; लाहा ययाचें प्रसन्नपण रे !
सांगैल स्वस्थान विश्वासेंकरूंन. न साहे उत्तर या कठीण रे ! ’ ॥३॥
बोलें दिगंबरु ::-- पाहातां विचारु नेणा, तुह्मां न कळे प्रकारु रे !
गुणाचा व्यापारु नेघतु समग्रु मीं तुह्मां चि माजि असे निरंतरू रे ! ॥४॥

११६०
तूं माझा आत्मा; तैं मीं तुझा कायी ऐसें अवधूता ! जाणोंनि हीं ?
परमानंदा ! तूं सर्वदेहीं; सत्य तें तूं वीण दुसरें नाहीं. ॥१॥धृ॥
आतां हा कर्मबंधु कवणासी देवा ? बहुकाळ मोहिलों तुवां मावा ॥छ॥
सत्याप्रति दुजें सत्य चि नाहीं. सकळ कर्म तें सत्य चि जयीं.
तें सर्व तुझेंचि जाणोंनि घेइं. दिगंबरा ! तो आह्मां संगू चि नाहीं. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP