मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ८८१ ते ९००

दासोपंताची पदे - पद ८८१ ते ९००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


८८१
माता करी उदासीन; तरी बाळ जीते कैसेन ?
तैसें मज देवा ! सत्य, जाण तुझी आण सर्वथा. ॥१॥धृ॥
हृदय कैं बा ! जाणसी ? सांगों कवणापाशीं माझें ? ॥छ॥
रुदनवंता संबोखणें उचीत जनीं तें चि कारणें.
तैसीं कांहीं बोल पां वचने, निवइन जेणें दिगंबरा ! ॥२॥

८८२
मातें सांडूंनिया वनीं माझी जातसे जननी;
आळवीताहें करुणावचनी; अशूभ नयनी जळ चाले. ॥१॥धृ॥
तुझें बालक बोबडें पाहें मागें पुढें;
तोंड करी वांकुडें; तुजविण जाले वेडें.
हळु हळु चाले पुढें कर्म हें केवढें ?
मुळिचें आणि फेंगडें जावें कवणीकडें ? ॥छ॥
शब्द पडतां चि श्रवणी कैसी परतली हांसोनीं ?
दिगंबरा ! घे उचलूंनि; वदन वदनीं मेळवी. ॥२॥

८८३
वियोगदुःखाचे बाण मजवरि करितासि संधान.
अवधूता ! सत्य जाण, माझे प्राण जातील. ॥१॥धृ॥
आतां काये वो ! आड करणें ? विसरु नये मनें. तुझीं आठवती भूषणें
बाहीं बाहिवटे कंकणें, करीटकुंडळ जटीत लेणं.
कैसीं अमृतवचनें ? विसरु न पडे देवा ! मनें. ॥छ॥
आपणासीं समानता कां करितासि ? अवधूता !
तुजसीं आह्मां पृथकू सत्ता नाहीं सर्वथा दिगंबरा ! ॥२॥

८८४
वियोगदुःखमहार्णवीं देवा ! पडलों अधवीं.
गति कुंठली; प्राणा नुरवी; स्मरण जीवीं करीतुसें. ॥१॥धृ॥
आतां पाव गा ! अवधूता ! तुं माता, तुं पीता,
आदिगुरू संत्राता, श्रीदत्ता ! श्रीदत्ता !
मायागुणवीमुक्ता ! अपार जाली वेथा.
कामादि जळचरें प्रखरें क्रोधावेषगुणविखारें
दिगंबरा ! मीं संसारें येणें मगरें भेदिला. ॥२॥

८८५
समर्थाची अंतौरी अरूप जाली जर्‍हीं,
तर्‍हीं परावा दृष्टी करी, तरि संसारीं का जीणें ? ॥१॥धृ॥
तैसें तुज जालें दातारा ! भुललों मीं संसारा;
लागलों व्यभिचारा, सांडुंनि तुज भर्तारा. कां न धरिसी विचारा ? ॥छ॥
समर्थपणाचें चिन्ह हें चि येक सुलक्षण ::-
आपुलें तें सांभाळावें दिगंबरा ! सत्य, जाण. ॥२॥

८८६
सर्वाभास ! निराभासा ! सर्वत्र सर्वदा उदासा !
सर्वसाक्षी ! संपूर्णपुरुषा ! रे ! आणिकाची न करी आशा रे !
अंतकाळीं पाव महेशा रे ! बापा ! ॥१॥धृ॥
न मगें मीं आणिक काहीं; स्वस्थानाप्रति मज नेयीं रे ! बापा ! ॥छ॥
संपूर्णानंदसागरा ! स्वस्वरूपदानी उदारा !
श्रीलीलाविश्वंभरा ! रे ! तुजविण दिगंबरा !
अर्थु न मगें मी दूसरा रे ! बापा ! ॥२॥

८८७
अनंतगुणनिधाना ! गुणगोप्तया ! सनातना ! रे !
योगिराया ! आनंदघना ! रे !
गुणवर्जिता ! निर्गुणा ! पूर्णपुरुषा ! पुरातना ! रेया ! ॥१॥धृ॥
दत्ता ! तुजवीण नेणें. मन रंगलें तुझेनि स्मरणे रेया ! ॥छ॥
करुणापीयूषजळधरा ! पूर्णविज्ञानसागरा !
अवधूत ! विश्वंभरा ! रे ! आत्मया ! दिगंबरा !
तुं परब्रह्म अवतारा रेया ! ॥२॥

८८८
कल्याणगुणभाजना ! अनंतलक्षणसंर्णा !
कृष्णश्यामां ! कमळनयना ! रे ! देवदेवा ! दीनोद्धरणा !
आत्रेया ! गुणनीधाना ! रेया ! ॥१॥धृ॥
दत्ता ! तूं चिद्घन परब्रह्म शिव संपूर्ण रेया ! ॥छ॥
स्वमायया नित्य, गुप्त, मायायुक्त, विमुक्त.
दिगंबरा ! श्रीअवधूता ! रे ! तुजवांचूंनि नाहीं त्राता.
कइ पावसी करुणावंता ? रेया ! ॥२॥

८८९
ज्ञानविज्ञानदिनमणी ! स्वभक्तजनचिंतामणी !
कइ देखैन तुते नयनीं ? रे ! चिंतिताहे ध्यानींमनीं रे !
आत्मा तूं मीं चि ह्मणौनि रेया ! ॥१॥
झणें अंतर धरीसी; अवधूता ! मीं परदेशी रे ! बापा ! ॥छ॥
तुजसी स्वतंत्रपण, समान गुणदर्शन,
आत्मत्वें तें मज मरण, रे ! दिगंबरा !
सत्य जाण. आह्मी समर्पिलें मीपण रेया ! ॥२॥

८९०
सत्यात्मतत्व तुं तत्वता.  नव्हे देवा ! हें अन्यथा.
तरि सत्येंसीं भेदें भजतां रे !
आंगा आली असंतता. मग आह्मीं कवण अवधूता ? रेया ! ॥१॥धृ॥
भजनें भेदु निमाला; ऐसा नवलाॐ येथें घडला रेया ! ॥छ॥
तुं सत्यतत्व सनातन; सत्यात्मत्वें करितां भजन,
सत्य सत्येंसीं सहज अभिन्न रे !
दिगंबरा ! ऐसें जाण ::- भक्तु नेणे भजनाची खूण रेया ! ॥२॥

८९१
असता आंगीं मिथ्यात्व संता संता कें भिन्नत्व ?
आतां भक्तासि के पृथक्त्व ? रे !
ऐसें केवळ अद्वयत्व न ये भजतां परम शिवत्व रेया ! ॥१॥धृ॥
कैसें दासत्व करणें ? रे ! भेदु न दिसे तुझेनि गुणें रे ! देवा ! ॥छ॥
सर्वात्मयां ! सत्यरूपा ! द्वैतात्मशून्यस्वरूपा ! दिगंबरा ! निर्विकल्पा ! रे !
भक्तु साहेना निर्लेपा; यालागि उघडा चि पाहा पां रेया ! ॥२॥

८९२
स्वजातीय, विजातीय, स्वगत, भेदविगताद्वय, अखंडित,
भान तेणेंसी पृथग संतरे. अवघें चि शिव सदोदीत,
तेथ कवण देव आणि भक्त ? रेया ! ॥१॥धृ॥
जना ! सत्य विचारीं. व्यवहारु वृथा न करीं रेया ! ॥छ॥
अवस्था गुणीं आछादलें निर्मळ स्वरूप आपुलें
पाहें सद्गुरूचेनि बोलें रे !
मग सत्य तें सहज चि कळे; दिगंबरतत्व निवळे रेया ! ॥२॥

८९३
भ्रमूं चि उपजलीयां पाठी मग काये काये न पडे दृष्टी ?
तेवि प्रपंचु अवस्थे पोटीं रे !
वा ! उगाचि होतासि कष्टी ! बंधमोक्ष हे माईक गोष्ठी रेया ! ॥१॥धृ॥
जना स्वस्थिती राहीं गुण सांडूंनि निजे नीज पाहीं रेया ! ॥छ॥
दृश्याचेनि परिज्ञानें जाणोंनि द्रष्टत्व ही सांडणें;
सिद्ध स्वरूप तें अनुभवणें रे !
विण दिगंबरवचनें जवळी चि परि जन नेणें रेया ! ॥२॥

८९४
बाळपणीं मीं अज्ञानु अवगुणु मानी गुणू.
वयें तितुला चि जालों क्षीणु. तया पाठीं जालों तरुणू. ॥१॥धृ॥
देवा संसारु कें सुखाचा ? जया नाहीं तो दैवांचा. ॥छ॥
धनस्वजनयौवनजाया गेलें तारुण्य येहीं वांया.
आधिव्याधिममतामाया तइ न चले चि साधनक्रिया. ॥२॥
पापसंग्रहो करितां ऐसा अतिक्रमली तारुण्यवयसा.
पुढें वार्धक्य आलें कळसा; नाहीं देहाचा भरवसा रेया ! ॥३॥
क्षीणपणें गेली जरा; अवधारीं दिगंबरा.
नरदेहाचा मातेरा जाला जी ! विश्वंभरा ! ॥४॥

८९५
अन्नमयत्वें नश्वर, मळमूत्राचें भांडार,
पापजनक, अपवित्र, पापरूपाचें मंदीर, ॥१॥धृ॥
रे ! याचा अभिमानु धरिसी काह्या ? हें सहज चि जायील वांया रे ! ॥छ॥
आदरें संरक्षण कित्ती ? अवसानीं होईल माती !
कीट अथवा श्वानें खाती ! भाग्य असैल तरि विभूति रे ! ॥२॥
देवां पितरां येणें वैर, आणि लौकिकीं मरमर.
देह मोटें अनर्थकर, कामक्रोधाचें भांडार. ॥३॥
माझें ह्मणतां शंका नाहीं; मी ह्मणतासि तेथें कायी ?
दिगंबरु हृदयीं ध्यायीं; देह सोडूंनि वेगळा होयीं. ॥४॥

८९६
देह धरूंनि काइसें ध्यान, देह धरूंनि ? ब्रह्मज्ञान,
योग, सेवा, अनुष्ठान, निरसनें याचेनि. जाण. ॥१॥धृ॥
ऐसें देह अपवित्र; अवगूण येत अपार. ॥छ॥
कामु जाला याचेनि अंगें; क्रोधु तो ही तया चि मागें;
मद, मत्सर, दंभ अवघे स्थूळ शरीचेनि संगें. ॥२॥
वीण पापें न संभवे; वीण पापें न रक्षवे;
रक्षिलें हें पापा प्रसवे; देह नाशैल; तें न नशवें. ॥३॥
देहवंतां काइसें पर ? जाणिवेचें डंब अपार !
काय करील पां ! सत्छास्त्र दिगंबरें वीण समग्र ? ॥४॥

८९७
प्रपंचाकारनिराकारा ! प्रपंचगुणसाकारा
आत्मयां ! निर्विकारा ! अवधूता ! विश्वंभरा ! ॥१॥धृ॥
तूं जीवन जीवाचें, गुप्त धन त्यागशिलांचें, ॥छ॥
योगपंथिची सिदोरी, नाम सर्वस्व सामग्री.
दिगंबरा ! अवधारीं, यत्नें राखों कवणे परी ? ॥२॥

८९८
कर्मवासनया बांधला; कामक्रोधा अधीनु झाला;
दाही ठायीं विभागिला; ऐसा अपराधु काये म्यां केला ? ॥१॥धृ॥
आतां करिसील तें तूं बरवें. तुतें कवणें जी ! नीरवावें ? ॥छ॥
अविद्या कवणें केली ? आह्मां माया का लाविली ?
आह्मी कैसे होतों मुळीं ? दिगंबरा ! हे गति जाली ? ॥२॥

८९९
कर्मे माझेन मीं गुंतला; काम कल्पनया पीटला;
संसारीं आला गेला; बहु काळ भिन्न पडीला. ॥१॥धृ॥
बापा वीसरु पडिला काये ? साच लटिकें येऊंनि पाहे. ॥छ॥
गुण माझे ते मज वैरी; साहावे कवणे परी ?
दिगंबरा ! ये संसारीं नाहीं संतोषु परोपरी. ॥२॥

९००
वय चंचळ वाहे सरिता, क्षणा येका पडैन रीता.
आंगी वाजेऐल मरणावस्था, तरि काये करूं ? अवधूता ! ॥१॥धृ॥
आतां झडकरी भेटी यावें; पुढें न दिसे कांहीं बरवें. ॥छ॥
दोषत्रय नित्य वैरी; ममतेचा आघातु भारी;
तयीं मतीसि होईल हारी; दिगंबरा न वचें दूरी. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP