मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद २१ ते ४०

दासोपंताची पदे - पद २१ ते ४०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


२१
विकळ वीकळ मन माझें उतावीळ. ॥१॥धृ॥
रूपीं गुंतलें मानस; दत्तात्रय, अवधूत,
श्रीसिद्धराजु, श्रीदेवदेव, श्रीकृष्णश्याम. ॥छ॥
चालतु डुलतु दिगंबरु पैलयेतु. ॥२॥

२२
चालतु चालतु चाली चालों विसरतु. ॥१॥धृ॥
दत्तु हृदंयी भरला, आत्मारामु, चालतां नये मींपण खाये,
भासतु आहे, मी माजि माये. ॥छ॥
प्रमादु ! प्रमादु ! दिगंबरें जाला बोधू. ॥२॥

२३
बोलतु बोलतु बोलों विसरलों मातू. ॥१॥धृ॥
दत्तीं गुंतलें मानस नुपडे माये; भूललें माये; बोलतां नये;
मौन न साहे; करूं मीं काये ? ॥छ॥
आठवें वीसरू; ऐसा भासे दिगंबरु. ॥२॥

२४
खेळतु खेळतु ऋषीपुत्रांसमवेतु. ॥१॥धृ॥
दत्तु अदृष्टु जाहाला; सकळांप्रति सलील धरीं; मायाधारी, न दीसे तरि;
पासीं नां दूरि; विषयवृत्ती, अयोगयुक्ती कुमरांप्रति, पाहाणें कित्ती ? ॥छ॥
देखिला समग्रीं दिगंबरू मायाधारी. ॥२॥

२५
दिसतु दिसतु दृष्टीआड जाला गुप्तु. ॥१॥धृ.॥
सारा गगन आडिचें, असेष सैये ! स्वरूपवृती, गुणीकभान, दृष्ट्याप्रति,
श्रीदत्तु पाहों, आत्मावो ! पाहों. अनंतु अनंतु दिगंबरु गुणगुप्तु. ॥२॥

२६
पाहतां पाहतां भूलि जाली यया चित्ता. ॥१॥धृ॥
दत्तु द्रष्टा वो ! सखिये ! पाहों मीं केवि ? माया वो दावी,
दृष्टीसि गोवी, अभावीं भावीं. ॥छ॥
देहीचा देखणा दिगंबरू जाणों खूणा. ॥२॥

२७

दोखलें नयनीं; रूप रूपिलें माये !
नदिसे लोचनीं; मातेंहृदयीं स्फूरत आहे. ॥१॥धृ॥
न यें मीं वो ! या शरीरा. आत्मया तया वेधली सुखसागरा. ॥छ॥
नावडे शरीरसुख ध्यानधारण माये !
दिगंबरु आत्मा; ययाचे पाहिन पाये. ॥२॥

२८
न दीसे देखणा गुणीं गूण हरणु माये !
आत्मां श्रीदत्तु याचें सहज देखणें आहे. ॥१॥धृ॥
गुणा गूणी भेदु खरा. आत्मया तया नाहीं निर्गुणा परा. ॥छ॥
देहाचें भान हें सार सर्व मायीक माये !
देहीं दिगंबरु आत्मा मज मीचि मीं पाहें. ॥२॥

२९
सावळा सुंदरु येतां दृष्टी देखिला माये !
अवधूतू हा; याचे धरीन दोन्ही पाये. ॥१॥धृ॥
हृदयींचा हा देखणा आत्माराम होये जाणवे खूणा ॥छ॥
वेधलें माझें वो ! मन; प्राण पांगूळ जाले.
दिगंबरीं चित्त चैतन्य तन्मय ठेलें. ॥२॥

३०
कमलनयन कृष्ण श्यामस्वरूप माये !
देखिलें नयनीं; आतां देहीं मन न राहे. ॥१॥धृ॥
न रमे वो ! चित्तगुणें. आत्मया तया रातली मीं येणें मनें. ॥छ॥
सुखाचें पारणें मातें जाहालें; सांगों मीं काये ?
दिगंबरीं रती; तेवो ! खूणा बोलतां नये. ॥२॥

३१
आनंदकंदु स्वयंबोधु भेटवा माये ! अवधूतु आत्मा; धरीन तूमचे पाये. ॥१॥धृ॥
न धरी वो ! या शरीरा. आत्मया तया भेटवा ज्ञानसागरा. ॥छ॥
भुललें माझें वो ! मन; प्राण देयीन माये !
दिगंबरू आत्मा हा हृदयीं भेटीसि नये. ॥२॥

चालि भिन्न ३२
हृदयगत कामु तद्वृत्ती हरला; योग संग्रहो भरल्लारे ! ॥१॥
देखिलारे ! तो देखिला.
योगिराजु कैसा मीं मज स्फुरला ? सत्य चिन्मयु संचल्ला रे !
विगतदेह भाव स्ववृत्ती राहिला. दिगंबरू संचल्ला रे ! ॥२॥

३३
दीजे सिद्धराजाही जीवसगुणा. जना अनिवार बंधु नाशी स्वसंगें.
पापहरस्मरणु मुनी स्तविती. आत्रेय तो अवधूतु वरद येकु.
स्वजनस्वंशोभितु जनानंदकु भवभेदि. अरे मानस हें त्या वेधिनलें. ॥छ॥१॥

३४
तत्ताथडिंकु थडिंढिढिंकु ढिंकुकु तदिगदा थोदिगदा धिमिकित्ता धिमिकि धिमिकि धिमिकितो
टडणणां गिणंणा गिणंण्णां
टडणणां गिणां गिणां
टडा गणणां गिणा गिण
तथारि थारि थारि द्धिमिकि द्धिद्धिमिकिधिमिकिटा ॥छ॥२॥

३५
सासानिधपा सनिधपा निप निप निसा ॥
निप निप निसा ॥
रिगमगरिसां मगरिसां सस्सनिपमगमपा ॥
रिसानिरिसा धनिसानिपा मपासानिपा ॥
मपानिपामागमापमागा रिगमगरिसाम् सांमांम्मगमपा ॥
सांममागारि सानिसा सां ममपामपा सस सनिधपां मगरिसाम् ॥छ॥३॥

मळाप ३६
अमळा श्यामळा सगुणवा शुधियांतें करुणाघना ॥
संपूर्णा कलाहंसा प्रबंधें स्तविनले बहुगुणनाथा ॥
दिगंबरा देवराया ॥छ॥४॥

३७
त्रिभुवनं परिपूजितु परमेशु. श्रीष्टीविस्तारिता, रविशशित्रिनेत्रु, ॥
अनुसूयात्मज, दत्तु, कृष्ण तनुदेॐ ! स्वजनगतभयकारणामरि जो ॥
सुरराजु अवधूतगुणी गोवितु ॥छ॥५॥

३८
सासागमपागमागमासा सासागमापागमागमागमापा गमापानिपानिसासा मागारिसानिसा गमपाससा सानिधापमंगारी पनिसारिरि पसासा सनिधापमंगारिसा ॥३॥छ॥

३९
दाम्दाम् तादिग्दिग् थोदिग्दिग् दिग् ढिंकुढिक्ककुक्कु झक्कक्कुनक्ककिण्णा क्कुक्कुद्दाकुंथारि थारिकुथारिकिट्टा झेंत्रझेंत्रझेकुझक्ककिण्णा ॥४॥॥छ॥

४०
तेन्नातेन्नातेनातेन्नातेनातेनातेन्नतेन्नातेन्नतेन्नातेन्ना ॥५॥छ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP