मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १६१ ते १८०

दासोपंताची पदे - पद १६१ ते १८०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१६१
लोक बोलती तें मीं साहीन; जनाचे अपवाद साहीन. ॥०॥
अवधृतपंथें मीं जायीन; करूं नये, तें मीं करीन. ॥०॥
बोलों नये ऐसें करीन. देवोचि स्वयं होयीन. ॥१॥धृ॥
अरे मना ! अरे मना ! अरे मना ! अरे मना !
मनारे ! मनारे ! अरे ! अरे ! मनारे ! तुजवीण मनसा नाहीं दुसरे. ॥छ॥
क्रिया कर्म तें सांडीन; गुणाचे व्यापार निरसीन;
न करणें कर्म करीन; दिगंबरु मी ऐसे ध्यायीन;
आत्मा अवधूतु उमजैन; भेदूचि बळि तेथ देयीन. ॥२॥

१६२
चालि भिन्न कल्याण
विरालें चरणीं त्याचां मन हें माझें; नेणें आपुली सोये. ॥१॥
आहे श्रीगुरुविण या कांहीं ? नेणिजे स्वहित ये देहीं. ॥छ॥
देॐ दिगंबरु बैसला जीवीं. येरा रीघु ते ठाइं नोहे. ॥२॥

भिन्न
१६३
प्रीति न धरीं विण तेणें वो ! सोये माझें मनस हें; जाणा. ॥१॥
पाहिन कईं सखयाचे मीं पाये ? ॥छ॥
मन हें सगुणाविण न करी ध्यान; योगसाधन तें सोसेना;
देव दिगंबरी जडे. पुडती वेगें सखिये ! वो ! वो ! आणा. ॥२॥

१६४
कैसी भजों मीं आतां येणें वो ! सैये ! केलें मीपण हें दूरी. ॥१॥धृ॥
पाहों मी केवी दत्ता ! तूझे पाय ? ॥छ॥
करितां स्मरण मनप्रकृत्ति क्षीण राहे स्वस्थिती सुलीन.
देव दिगंबरें येणें येथून केले सकळ धर्म क्षीण. ॥२॥

भिन्न
१६५
दाखवी चरणा पंकजनयना !
योगिराया ! स्वजना तुं जीवनु जीवना,
भवभयहरणा ! येकु वेळ ये रे ! ॥१॥धृ॥
ये नीवारीं शंकरा ! दयासागरा ! बाधकु भवतापु.
तुं वांचूनि आणिका नतरे वरदा ! भ्रमजल्पु बा ! रे ! ॥छ॥
न दिसे विषयो आन तुंविण मना; भेदपापमथना !
तुं येइ बा ! सगुणा ! देव ! दिगंबरा ! वाट पाहें; ये रे ! ॥२॥

१६६
अहिरी
सराग मानस विषयीं लागट भारी.
न वळे, स्वहितपर विपरीत करीं. ॥१॥धृ॥
निवारी वरदा ! गुणमाया भेदमाया.
करुणासागरु, तरि न विचारीं क्रिया. ॥छ॥
न घलीं येथुनि समळ देवा ! हें मजवरि.
चूकले सेवक; क्षमा दिगंबरा ! करीं. ॥२॥

गौडी
१६७
मातलें हें मन विषय रस सेवनीं; वळिता तेथूंनि परतेचिना. ॥१॥धृ॥
कमळनयना ! कमळनयना ! अधिकारु दे मज चरणस्मरणा. ॥छ॥
दिगंबरा ! मन दिधलें तवचरणीं; आपुलें ह्मणौनि सांभाळिजे. ॥२॥

१६८
चित्त हें रातले तवचरणस्मरणीं; आतां तें परतोनि मागेचिना. ॥१॥धृ॥
देवदेवा ! देवदेवा ! स्वजनजनजीवना ! कृपाळुवा ! ॥छ॥
दिगंबरा ! तुतें दिधलें अवदान मानस; तें परतोन घेउंन ये. ॥२॥

१६९
चित्त हें दुश्चित अगुणगुण्रहणीं; लावितां सगुणीं लागेचिना. ॥१॥धृ॥
देवराया ! देवराया ! कैसेनि मज भेटसी ? दत्तात्रया ! ॥छ॥
अगा ! दिगंबरा ! तुझें विपरीत करणें ::- भजनसुखभजनें दूरि लोक. ॥२॥

१७०
दृढावलें गुरो ! तुमचे ध्यान, स्वजन धन परजन भासेचिना. ॥१॥धृ॥
हेंचि पुरे, देवदेवा ! मननीं मन अनुसरलें योगसेवा. ॥छ॥
दिगंबरा ! तुझें ध्यानचि साधन; चरणगुणमहिमान चोजवेना. ॥२॥

१७१
लांचावलें मन तुझांचि वदनीं;
शरीरसुख परतोनि पाहेचिना. ॥१॥धृ॥
अगा ! देवदेवा ! दत्तात्रया !
मननीं मन माळवे, तेचि क्रीया. ॥छ॥
दिगंबरा ! पुरे योगादिसाधन ! तव चरणीं मम मन मावळलें. ॥२॥

१७२
मन हें सुमन वाइलें ईश्वरीं अगुणगुण - जळधरीं दत्तात्रयीं. ॥१॥धृ॥
केवि पाहों मन आपुलें ? लवण मिने सागरीं; तेवि जालें. ॥छ॥
दिगंबरा ! तुतें मी माजि पाहातां, मन सगुण निवडितां निवडेचिना. ॥२॥

१७३
श्रवणाचें सुख नयनीं लाहीना. परमपद तवचरण दत्तात्रया ! ॥१॥धृ॥
पाहीन गा ! जन्मवरी. न पवें मग संसरण भवसागरीं ॥छ॥
दिगंबरा ! तुझें दर्शन तारक. अपर भवभयजनक तें नलगे. ॥२॥

१७४
भक्तचिंतामणी ! अम्रूतजळधरा ! विज्ञानसागरा ! दत्तात्रया ! ॥१॥धृ॥
तुझें ध्यान लागो; प्रेम लागो; नित्यसंकीर्तनीं प्रीति लागो. ॥छ॥
वरदमूर्ती ! ब्रह्मनिर्वाणदायका ! त्रीपुरनायका ! दिगंबरा ! ॥२॥

१७५
विश्वभासा ! तत्वविज्ञानदिनमणी ! भक्तचिंतामणी ! योगिराया ! ॥१॥धृ॥
तुझें ध्यान लागो; प्रेम लागो; नित्यसंकीर्तनीं प्रीति लागो. ॥छ॥
वरदमूर्ती ! ब्रह्मनिर्वाणदायका ! त्रीपुरनायका ! दिगंबरा ! ॥२॥

१७६
योगियाचें धन योगासि कारण. ब्रह्मसनातन योगिराजू. ॥१॥धृ॥
मज भेटवा वो विश्वकंदू श्रीदत्तू पूर्ण विज्ञान बोधु. ॥छ॥
आदिकर्ता, भेदताप - विध्वंसनु, सुभक्तपावनु, दिगंबरू. ॥२॥

१७७
संसारदुःस्वसागरू हा तत्वता प्रपंचु पाहतां; पारु नाहीं. ॥१॥धृ॥
कास देयीं योगिरया ! त्राहि ! त्राहि ! गुरो ! दत्तात्रया ! ॥छ॥
अगा ! कामादिके बहू बाधिती जळचरें. पाव कृपाभरें दिगंबरा ! ॥२॥

१७८
संसारु हा कृष्णसर्पु विश्वंभरा ! चढतां पाहारी झोंबीनला. ॥१॥धृ॥
अरे ! मंत्रराजा ! मंत्रमूर्ती ! पाव करुणाकरा ! पुण्यकीर्ती ! ॥छ॥
नाम तुझें तेंचि अंम्रूतप्राशन जीवासि जीवन; दिगंबरा ! ॥२॥

१७९
संसारदुःखदावानळु पेटला; माजि सांपडला वनचरू मी. ॥१॥धृ॥
आतां वोळ बा ! रे ! दत्तात्रया ! काळाग्निशमना ! देवराया !! ॥छ॥
ज्वाळमाळाकुळ मानस जाहलें, तुज वीसरलें ह्मणौनियां. ॥२॥
दिगंबरा ! तुझें नामनुस्मरण संतापनाशन भवरोगियां. ॥३॥

१८०
विषयांची वृत्ती न सुटे या मना; अतेव कामना दृढ जाली. ॥१॥धृ॥
आतां वंचलों गा ! देवराया ! वीसरलों तुतें दत्तात्रया ! ॥छ॥
अयोगता मन मातलें; नाकळे; तूज विसरलें; दिगंबरा ! ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP