मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे| पद ७८१ ते ८०० महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे पद १ ते २० पद २१ ते ४० पद ४१ ते ६० पद ६१ ते ८० पद ८१ ते १०० पद १०१ ते १२० पद १२१ ते १४० पद १४१ ते १६० पद १६१ ते १८० पद १८१ ते २०० पद २०१ ते २२० पद २२१ ते २४० पद २४१ ते २६० पद २६१ ते २८० पद २८१ ते ३०० पद ३०१ ते ३२० पद ३२१ ते ३४० पद ३४१ ते ३६० पद ३६१ ते ३८० पद ३८१ ते ४०० पद ४०१ ते ४२० पद ४२१ ते ४४० पद ४४१ ते ४६० पद ४६१ ते ४८० पद ४८१ ते ५०० पद ५०१ ते ५२० पद ५२१ ते ५४० पद ५४१ ते ५६० पद ५६१ ते ५८० पद ५८१ ते ६०० पद ६०१ ते ६२० पद ६२१ ते ६४० पद ६४१ ते ६६० पद ६६१ ते ६८० पद ६८१ ते ७०० पद ७०१ ते ७२० पद ७२१ ते ७४० पद ७४१ ते ७६० पद ७६१ ते ७८० पद ७८१ ते ८०० पद ८०१ ते ८२० पद ८२१ ते ८४० पद ८४१ ते ८६० पद ८६१ ते ८८० पद ८८१ ते ९०० पद ९०१ ते ९२० पद ९२१ ते ९४० पद ९४१ ते ९६० पद ९६१ ते ९८० पद ९८१ ते १००० पद १००१ ते १०२० पद १०२१ ते १०४० पद १०४१ ते १०६० पद १०६१ ते १०८० पद १०८१ ते ११०० पद ११०१ ते ११२० पद ११२१ ते ११४० पद ११४१ ते ११६० पद ११६१ ते ११८० पद ११८१ ते १२०० पद १२०१ ते १२२० पद १२२१ ते १२४० पद १२४१ ते १२६० पद १२६१ ते १२८० पद १२८१ ते १३०० पद १३०१ ते १३२० पद १३२१ ते १३४० पद १३४१ ते १३६० पद १३६१ ते १३८० पद १३८१ ते १४०० पद १४०१ ते १४२० पद १४२१ ते १४४० पद १४४१ ते १४६० पद १४६१ ते १४८० पद १४८१ ते १५०० पद १५०१ ते १५२० पद १५२१ ते १५४० पद १५४१ ते १५६० पद १५६१ ते १५८० पद १५८१ ते १६०० पद १६०१ ते १६०५ दासोपंताची पदे - पद ७८१ ते ८०० दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥ Tags : dasopantmarathiदासोपंतपदमराठी पद ७८१ ते ८०० Translation - भाषांतर ७८१हा वो ! गुणांचें भाजन माये ! योगियांचें धन;दोषांचें दहन हा योगिराज. ॥१॥धृ॥माये ! धरीन वो ! अंतरीं; न विसंबे क्षणुभरी;हृदया सेजारी करीन सेज. ॥छ॥हा देवांचा ही देॐ; निजमायेचा अभाॐ;आनंदाचा ठाॐ श्रीदिगंबरु. ॥२॥७८२लीलाविश्वंभरा ! अरे ! विज्ञानसागरा ! सद्गुरो ! दातारा ! करुणामूर्ति ! ॥१॥धृ॥येइं येइं रे ! झडकरूनी; तुझा विषयो माझा मनीं;प्रीति अंतःकरणीं ते मावे ना. ॥छ॥स्वमायया गुणगुप्ता ! अरे ! मायाविवर्जिता ! परमानंदभरिता ! श्रीदिगंबरा ! ॥२॥७८३हा वो ! सावळा, सुंदरू, स्वभक्तकल्पतरू,योगियातें गुरू, माये ! देवदेॐ. ॥१॥धृ॥म्यां देखिला वो ! नयनीं; माये ! भरला अंतःकरणीं;गुणगण याचा गुणीं तल्लीन जाले. ॥छ॥मन नेणें; परती गुंतलें आसक्ती; भेदाची अस्फूर्ति ते दिगंबरीं. ॥२॥७८४सुरतरुचिंतामणी जरि वरि पडती येउनी;तर्हीं परि मीं त्याहुंनीं न धरीं माये ! ॥१॥धृ॥मज न करावें सिकवण; माझें वेधलें हें मन;संगें मीं जायीन तया चि मागे. ॥छ॥मोक्षाचें मज नाहीं; गुणकृत येर तें काई ?दिगंबराचा पाई मज भेटि करा. ॥२॥७८५न साहे गुणतर्कु; म्यां सांडिला विवेकु;काइसा हा लौकिकु ? तो दूरि करा. ॥१॥धृ॥काये कैं कैं वो ! कैं डोळां मीं पाहीन ? श्यामळा !सुरनरगणपाळा ! श्रीअवधूता ! ॥छ॥निर्गूण वो ! गुणवंत माये ! ब्रह्म सदोदीत,दिगंबर अव्यक्त व्यक्तीसि आलें. ॥२॥७८५ अप्राणाचा वो प्राणु माये ! पंकजलोचनू;कैं माये सगूणूं मीं देखयीन ? ॥१॥धृ॥मज भरला वो ! अंतरीं माये ! जीवाचा जिव्हारीं.तैसा कैं बाहेरी पाहिन माये ! ॥छ॥जनधनयौवनकाया मीं नाश्रयीं हे माया. दिगंबरेंविण वायां सर्व ही माये ! ॥२॥७८६बहु दिन जाले भेटी; भेटि न दिसे वो ! लल्लाटीं;वियोगदुःख पोटीं भरितें आलें. ॥१॥धृ॥माये ! जळधरू वो ! नयनी;बहु द्रवताति जीवन; शोके आक्रंदन गर्जन तेथें. ॥छ॥आजि दर्शनाचा भासू; तो विजूंचा प्रकाशू;सुखाचा विनाशू प्रळयो माये ! ॥२॥वोसरु वोसरला; माये ! न दिसे जीवनकला;दिगंबरेंवीण जाला दुःखासि योगु. ॥३॥७८७चरतर चंचल मन माये ! नाश्रयी कारणा;परमार्थ हीन प्रलाप करी. ॥१॥धृ॥येणें नाशिलें श्रमहरण गुण रहीत योगधन;वनजनसदनधन धरूनि ठेलें. ॥छ॥गुणकरणें चळबळिती; तेणें तगबग होत आथी;दिगंबरेवीण स्थिति मी केवि पावे ? ॥२॥७८७ अयेणें जाणें मज नाहीं गे ! मन कुंठलें परति नाहीं;या जीवासि परx नाहीं. ॥छ॥पुडती भेटणें केउतें ? कवळिन दोहीं बाहीं;रूप आळंगीन दोहीं बाहीं. ॥१॥धृ॥केव्हां देखइन ? माये ! वो ! धरीन मीं दोन्हीं पायें ? कवळीन दोन्हीं पायें ? ॥छ॥कमळनयनु भेटवा. वियोगु मनीं न साहे.हृदयीं भेदु न साहे. ॥छ॥येणें जीवें काज नाहीं वो ! हितें विहितें ही चाडु नाहीं.साधनयोगें चाड नाहीं. दिगंबरें वीण सखिये !मीं नेणें परमार्थ देहीं. पुरुषार्थु न मनी काहीं. ॥३॥७८८विण जळें तळमळी वो ! मीनु पडला महिमंडळीं.हा मत्स्य ये भूमंडळीं. तैसी गति मज सखिये ! मीं वियोगें व्याकुळ जाली. अवधूतेविण वायां गेली. ॥१॥धृ॥केधवां जायीन तेथें वो ! माझी माये अवधूतु जेथं;सखा श्रीदत्तु जेथें; आळंगीन निजहृदयीं.सुख होईल तेणें मनातें. विश्रांति लाहीन चित्ते.पाडस चूकलें वनीं वो ! कोठें गेली कुरंगिणी ?तें कें गेली हरीणी ? दिगंबरें मज तद्वतसांडिलें भवनिर्वाणीं. प्राणासि होतसे हानी. ॥२॥७८९भवनदी बुडताहें वो ! गति पांगुळली येथ माये ! बहु भागलीयें. करूं काये ? अवधूता ! कयी पावसी ?आणिकाचा हातु न साहे. मज पराची कास न साहे. ॥१॥धृ॥आतां दृढ करूं काये वो ! माझें हृदय दुभागताहें.अंतरभू फूटताहे. श्रीदत्तु नयनीं न दिसे.आश करूनि वाटुली पाहे; नयनीं वाटुली पाहे. ॥छ॥दीर्घस्वरें आळवीन वो ! श्रीदत्ता ! ये ह्मणउंन;अवधूता ये ह्मणउंन. दिगंबरा तुजवांचूनी येथसोडवी न कवण; वरि पडतां हे निर्वाण. ॥२॥७९०॥ चाली भिन्न. ॥ चंद्रावळीची ॥कृष्ण ! श्यामा ! कमळनयना ! निर्गूणगुणा ! योगयुक्तचित्तभूषणा !परब्रह्म ! आनंदघना ! पूर्णवेदना ! तुझा नित्य विषयो मना. ॥१॥धृ॥येइं, येइं, येईं स्वस्थाना, हृदयस्थाना, योगिराया ! तमोहरणा ॥छ॥कार्त्तवीर्य ! वरदमूर्ती ! कमलापती ! गुणत्रयगळीतमती !दिगंबरा ! स्वरूपज्योती ! अगम्यगती ! तुझा ठायीं विरामो वृत्ती. ॥२॥७९१भवभ्रमश्रमदहना ! प्रवृत्तिक्षीणा ! अनंतगुणभाजना ! सुवर्णावर्णा ! देखयीन कयीं सगुणा ? ॥१॥धृ॥येइं, येइं, अब्जलोचना. पासूनि चरणा भीन न करी स्वजना. ॥छ॥योगिराया ! अत्रिवरदा ! संपूर्णपदा ! गुरो ! नीरसीं प्रमादा.दिगंबरा ! सहजसिद्धा ! चित्सुखप्रदा ! दूरि करीं भेदा त्रिविधा. ॥२॥७९२आंगीं चंदन चर्चिलें; शोभीत जालें.भाळीं सुरंग पीवळें; वस्त्र सुवर्णा आगळें;प्रावरण केलें. धूपें शरीर धूपिलें. ॥१॥धृ॥ऐसा कैं मी देखैन ? निवैल मन. कुंडलीं शोभती श्रवण. ॥छ॥किरीटु अतिशये शोभला सूमनमाळा. दत्तु डोळसु सावळा सुभक्तसंगें मीरवला.आनंदु केला. दिगंबरें स्वजनु तारियेला. ॥२॥७९३चरणकमळजळमळमोचन ! प्रवृत्ति हरण ! घेइंन प्रेमवर्धन. सकळनिश्चलशिळकरण गण ऐसी होइंन. करीन मीं हृदयीं ध्यान. ॥१॥धृ॥दत्ताचें मुख आठविन. वेधलें मन.तेणेंवीण न स्मरे आन. ॥छ॥सदन, स्वजन, धन, धनद, माये ! करूं मीं काये ? मायामय स्थीर न राहे.हातूंनि सूटला सैये ! मग मागुता नये.परमोपायें दीगंबरु आजि प्रतिभासला आहे. ॥२॥७९४सद्गुरूचा संगु दैवे जोडला, वो ! दैवें जोडलाबहुतां जन्माची हे भेटि वो ! येथें अंतर पडतां पडैन कवणें कपाटीं ? वो ! सहसा ठायासि न ये. मग मीं कें पाहों या दृष्टी ? वो ! मन चंचळ भारी; करिताहे परम कष्टी वो ! ॥१॥धृ॥अवो ! अवो ! सुंदरे ! अवो ! सुंदरे वो ! अवो ! सुंदरे ! वो ! उपदेशु करि कां काहीं वो ! चित्त दुश्चित माझें उमजा प्रति न ये काहीं वो ! ॥छ॥काम क्रोध वैरी वैर साधिती, वो ! वैर साधिती वो ! आशा, ममता, तृष्णा भारी वो ! यांचे आघात मोठे.कैसे पाहों कवणे परी वो ! हीता विसंच पडतां न दिसे निमिष ही भरी वो ! झणें अंतर माये ! पडैल ये दिगंबरीं वो ! ॥२॥७९५मायेबापु माझें कूळ समर्थ, वो ! कूळ समर्थ वो !दीधली यें दूर देशीं वो ! पडती परती नाहीं. कठिणता ऐसी कैसी वो ! दुःखें हृदय फूटे ! सांगों मीं कवणापासी वो ? पंथु पाहात ठेली.त्याची खंति वाटे जीवासी वो ! ॥१॥धृ॥अवो ! अवो ! सुंदरे ! अवो ! सुंदरे ! वो ! अवो ! सुंदरे ! वो ! अवो ! सुंदरे ! वो ! जाणवी माये ! ते मातु वो ! प्राण जातील वायां ! करीन मीं आत्मघातु वो ! ॥छ॥कामक्रोध मातें मुळीं बैसले वो ! मुळीं बैसले वो ! दंभ दर्प वैर करिती वो !मदमत्सर दूजें पडला जीउ अतिभ्रांती वो ! यत्नु न चले चि कांहीं योगातें लाविली ख्याती वो ! वेगी झडकरि जायीं. जाणवी दिगंबराप्रति वो ! ॥२॥७९६दत्ते धेनूचें मीं वत्स धाकुलें वो ! वत्स धाकुलें वो ! मागुताहें येकु पान्हा वो ! कैसी देउं निघाली ?लागो नेदी मज थाना वो ! कैसें लल्लाट माझें ! बोलु मी ठेउ कवणा ? वो ! मीं पोटिचें बाळ.आहे नाहीं कळेना वो ! ॥१॥धृ॥अवो ! अवो ! सुंदरे ! अवो ! सुंदरे ! वो ! अवो ! सुंदरे ! वो ! अवो ! सुंदरे ! वो ! हृदय उल्लताहे माझें वो ! दुःख कवणासि सांगों ? आहारु दूजा नेणिजे वो ! ॥छ॥नव मास पोटी होतियें कैसी वो ! होतियें कैसी वो ! तुझेनि स्वरसें धाली वो ! जन्मु कां मज दिधला ? उपेक्षा कासया कैली ? वो ! आतां येथूंनि तर्हीं जेथिची तेथें मज घाली वो !दिगंबरे ! माये ! भारी होती आश केली वो ! ७९७दिगंबराचें मीं बाळ धाकुलें वो ! बाळ धाकुलें वो.मांडियेवरि ठावो मागें वो ! मातें लोटूनि घाली; कवणा पाहो पुढें मागें वो ! नयनीं आंसुवें गळती. तूटि पडली कवणें अंगें ? वो ! दूजा ठाॐ चि नाहीं. लागो मी कवणा मागें वो ! ॥१॥धृ॥अवो ! अवो ! सुंदरें ! अवो ! सुंदरें ! वो ! अवो ! सुंदरें ! वो ! अवो ! सुंदरें ! वो !ऐसें जीणें काये करूं ? वो ! आतां मरण चि भलें ! मोडला माझा आधारु वो ! ॥छ॥हडतिया दृष्टी पाये पाहीन वो ! पाये पाहीन वो ! कैसी पाहों याचें वदन वो ! येणें नीरास केली.आतां मग जाती प्राण वो ! देवें जाणोंनि ऐसेंदिधलें मज आलिंगन वो ! तेणें सर्वांग धालें दिगंबरें अमृतपान वो ! ॥२॥७९८शुद्ध श्याम रूप देखिलें शिवणा वो ! देखिलें देखिला शिवणा वो !तो चि वेधु धरिला मनें वो ! कैस्या आठवती भूजा कटकांगद भूषणें वो ! वस्त्रें सुवर्णवर्णें; सूटलीं तीं उपमानें वो ! पीत चंदन भाळीं.उटितें श्वेत चंदनें वो ! ॥१॥धृ॥अवो ! अवो ! सुंदरे ! अवो सुंदरे वो ! अवो सुंदरे वो ! अवो सुंदरे वो ! उसंतु न दिसे मना वो ! चित्त आसक्त जालें.पाहीन कमळनयना वो ! ॥छ॥किरटिकुडलांचें तेज फांकलें वो ! तेज फांकलें वो ! तें जीणें चंद्रसूर्यासी वो ! मुखीं तांबोळु बरवे;दृष्टांतु न दिसे तयासी वो ! चरणीं विश्वासिगति; धन्य अनुसूयेची कूंसि वो !दिगंबरु परब्रह्म होतें तीचा गर्भवासीं वो ! ॥२॥७९९दृष्टादृष्ट दृष्टी पुष्टि न मनीं वो ! पुष्टि न मनीं वो ! कष्टी मीं जालीयें भारी वो ! येणें संसारपंथेंस्वहीत तें पडलें दूरी वो ! बोलु कवणासि ठेउं ?मनस हें मज माझें वैरी वो ! जालें भ्रमीत गुणी.स्थिर नव्हे कव्हणियें परी वो ! ॥१॥धृ॥अवो ! अवो ! सुंदरे ! भूलली मी अविचारीं वो ! भेटी श्रीदत्तु आणी; निवारील माझें भुररें वो ! ॥छ॥देह गेह स्नेह हेय सकळ वो ! हे हेय सकळ वो ! दुःख जनक हें भान वो ! याची प्रतीति नलगे.समाधी पडैल सिरिं वो ! हींत नाशैल माये ! अनुबंधा लाहेल मन वो ! मातें काहीं चि नलगे दिगंबरें येकें वीण वो ! ॥२॥८००नित्यानित्यवस्तुसिद्धवेदन वो ! सिद्धा वेदन वो ! सद्गुरूवांचूनि नाहीं वो !ग्रंथ बहुसाल वायां पाहोंनियां काज कायी वो ! तेणें श्रमू चि वाढे; अहंकारु उपजे देहीं वो ! तरि तें पाल्हाळ सर्व संडावें अक्षुब्धें डोहीं वो ! ॥१॥धृ॥अवो ! अवो ! सुंदरे ! गुरुचरणीं हें मन भरे वो ! मज ऐसें चि करि कां ? नावडे जीवा दुसरें वो ! ॥छ॥यज्ञदानपव्रत वैदीक वो ! व्रत वैदीक वो ! मोक्षासि नव्हे कारण वो !फलें आपुलेनि फळे तें चि तें कर्मबंधन वो ! संत जाणती; साधू सेवीती श्रीगुरुचरण वो ! तरि मी सांडूंनि सर्व दिगंबरातें पाहीन वो ! ॥२॥ N/A References : N/A Last Updated : November 17, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP