मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ७०१ ते ७२०

दासोपंताची पदे - पद ७०१ ते ७२०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


७०१
दत्तात्रेया ! देवा ! मंगळमूर्त्ती ! मंत्रस्वामी ! वर्ण सुवर्ण ज्योती ! ॥१॥धृ॥
तुझा प्रकाशु प्रकाशु मातें; गुणाभासु जेथें आथीचिना. ॥छ॥
दिगंबरा ! ज्ञानविज्ञानसारा ! सार तें तूं सर्व प्रकृतीपरा ! ॥२॥

७०२
अंतरीं कुश्चीळु; बाह्य कांटाळे; वमन मूखीं; कैसा लावि तो डोळे ? ॥१॥धृ॥
ऐसें वेडेपण लागलें जना. परकर्मदूषणा प्रवर्त्तले. ॥छ॥
आत्मा दीगंबरु हे खूण नाहीं. बाह्य कुशळत्व दाविसी कायी ? ॥२॥

७०३
आत्मां परब्रह्म अंतरीं आहे. भूलला हा जनु बाहेरि पाहे. ॥१॥धृ॥
पावें गा ! देवा ! पावें गा ! देवा ! चुकलों तूझी सेवा; करुणा करीं. ॥छ॥
दिगंबरा ! ऐसें भूललें जग. देवो जाणवे; तें चूकलें अंग. ॥२॥

७०४
निरुमुक्ता ! तुतें बंधूचि नाहीं.
लटिका तो मोक्षु ! मागसी कायी ? ॥१॥धृ॥
बंधु तो कवणु ? मोक्षु तो कवणु ?
मागसी जया, तो देॐ चि कवणु ? ॥छ॥
जाणोंनि पाहातां लटकी तीन्हीं ! आत्मा दिगंबरु सत्य निर्वाणी ! ॥२॥

७०५
आपणा जाणोनि देवासि पाहीं.
तूंचि देॐ. उगा. ठाइ कां राहीं ? ॥१॥धृ॥
नेणोनि तळमण करितासि काह्या ?
द्रष्टा देॐ; येर अवघें चि माया ! ॥छ॥
आत्मा दिगंबरु सांडूंनि देवो, देवो नाहीं तेथ धरितासि भवो ! ॥२॥

७०६
देॐ नाहीं, ऐसा ठाॐ चि नाहीं.
उगाचि टकमका पाहासी कायी ? ॥१॥धृ॥
खूणेचें देखणें वेगळेंचि आहे. आपणां नेणोंनि जाणतां नये. ॥छ॥
आत्मदृष्टी जग ब्रह्म निर्गुण; दिगंबर सत्य चैतन्यधन. ॥२॥

७०७
भवपुरीं सांते वरपडि जाली. हातिची मुद्रा गळोनि पडली. ॥१॥धृ॥
नाम मुद्रिका दे कां ? गा ! देवा ! करीन तुझी सेवा निरंतर. ॥छ॥
दिगंबरनाम बहुगुणमुद्रा संसारविखारा उतरिती. ॥२॥

७०८
पथिची सिदोरी; विटाळ जाला. अहंकारु भजनीं दोषु लागला. ॥१॥धृ॥
आतां कैसें काये करूं ? गा ! देवा ! नेणें पापी केव्हां आतळला ? ॥छ॥
दिगंबर नित्य लागला संगीं. तुजवीण नाहीं छेदिता जगीं. ॥२॥

७०९
दीनु मालवला; झुंजूर जालें; डोळा चुकउंनि चोरटें आलें. ॥१॥धृ॥
चिद्रत्न माझें नेलें वो ! तेणें. येणें तमोगुणें नाप्रवीलें. ॥छ॥
दिगंबरा ! मीं लागैन पायीं. चोरटें मारुंनि चिद्रत्न देयीं. ॥२॥

७१०
दृश्य वाळवण खादलें गायी. गाये बारगळ ! कवणाची कायी ? ॥१॥धृ॥
ईसि धणीं नाहीं ! ईसि धणीं नाहीं ! ओढूंनि दृदयीं बांधिलीसे ! ॥छ॥
दिगंबरनामें सगुण गाये ! तीचे महिमान बोलतां नये ! ॥२॥

७११॥१॥धृ॥
सविषविषमविषयनदीं बुडताहें निजतत्त्वअबोधीं.
येथें कवणां कास मागों ? गा ! देवा ! जनू चि अघवा बुडतसे. ॥छ॥
दिगंबरें मज दिधला हातु. तेणें परपार पावलों पंथु. ॥२॥

७१२
दृश्य मृगजळ. धांवसी काह्या ? पाणी पाणी नव्हे; अवघी माया. ॥१॥धृ॥
आशेचे डोंगर जाले गा ! देवा जिव हे जिवनभावा न पवती. ॥छ॥
दिगंबरेवीण तृष्णां न तुटे. सागरु प्राशिजे येकें चि घोटें ! ॥२॥

७१३
संसारसागरीं मानव्यतारूं; स्वमती सुवायें पावैन पारू. ॥१॥धृ॥
पूर्वकर्में कैसें तारूं बुडालें ? मागे पुढें देवा ! अंतर पडलें ! ॥छ॥
दिगंबरा ! येथ तूं येक तारूं ! तुजवरी आतां घातला भारू ! ॥२॥

७१४
डोळे गेले; माझी मोडली काठी. कवण करील भेटि सद्गुरूसीं ? ॥१॥धृ॥
मनाचा पेंधा वलला गा ! देवा ! चरणस्मरणसेवा अंतरली. ॥छ॥
योग तेर काळीं; विज्ञान डोळे; दिगंबर दोहीं पांसाव कळे. ॥२॥

७१५
पंथु निडाळितां श्रमले डोळे. मानसें चंचळें पंथु न कळे. ॥१॥धृ॥
कयीं तूझें रूप देखैन ? देवा ! जीवाचीया जीवा ! योगिरावा ! ॥छ॥
दिगंबरा माझें मन वोढाळ; आपुलें चि मूळ वीसरलें. ॥२॥

७१६
अमृताचें विष केलें वो ! येणें. याचें दीजे कव्हणाप्रति गार्‍हाणें ? ॥१॥धृ॥
मन हें धरूनि घ्या का वो ! कव्हणी ? मातें याची करणी गुणु नेंदी ॥छ॥
दिगंबरीं येक मन चि माया; न मरे; हें तंव नेणिजे ठाया. ॥२॥

७१७
मुद्राबंधु देहीं तैसाचि आहे. मन गेलें काये कवणे वाटा ? ॥१॥धृ॥
चोरटें हें मन धरा, वो ! धरा. मतीसि विसरां पाडियेलें. ॥छ॥
दिगंबरीं ध्येलें मनस पुरे. साधन कासया तेथ दुसरें ? ॥२॥

७१८
मन न धरितां योगूचि वायां. मन पाहे; तेणें खंडिली छाया. ॥१॥धृ॥
अतःपर कैसें करणें ? गा ! देवा ! गुंति हे उगवा झडकरूनी. ॥छ॥
दिगंबरीं मन पाहातां चि वावो. योगवियोगु हा कल्पीत भावो. ॥२॥

७१९
मन हारपलें; देह न दीसे. पाहातां आपणा जालें ऐसें. ॥१॥धृ॥
सेखीनें मीपण कोठें चि नाहीं. पाहातेपण ही पारुषलें. ॥छ॥
दीगंबरीं पाहों; नेणे तो बद्धु. पाहों प्रवर्ते, तो परम अंधु. ॥२॥

७२०
लक्षाचा लाभु ते मुदलाची तूटी. हाणि ते बळकट बांधिली गांठी. ॥१॥धृ॥
आतां कैसी बुद्धि करणें ? गा ! देवा ! आठवें आठवा ग्रासियेलें. ॥छ॥
दिगंबरीं लक्ष समूळ खोटें. अर्थाचें स्फुरण वरि वोखटे. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP