मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १२०१ ते १२२०

दासोपंताची पदे - पद १२०१ ते १२२०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१२०१
कर्मटा पूसें, तव ते सदा अज्ञान दाविती सेण, माती, समिधा, तृण,
पृथ्वी, आपु, तेज स्वर्गभुवन; आतां कैसेनिं होये श्रीदत्तज्ञान ? ॥१॥धृ॥
कई भेटसी ? श्रीकृष्णश्यामा ! मनस न राहे हें आत्मया ! रामा ! ॥छ॥
भक्तांसि पूसें, तव ते करिती कोल्हाळू; नृत्य ना गीतु, देॐस्वरु, ना ताळू,
प्रेमरूदन ऐसा तो येक खेळू. कोठें मीं पाहों दिगंबरु निर्मळु ? ॥२॥

१२०२
जपियां पुसें, तव स्फुटकार वाती, न्यास, मुद्रा अंगचार करीता;
गोमुखें पटपट मंत्र जपती; ते काये माझी माये ! फेडिती भ्रांती ? ॥१॥धृ॥
ये रे ! दत्ता कमळनयना ! नावडे मज गुणकृत कल्पना. ॥छ॥
योगियांप्रति पुसों गेलियां मानूं तेही मौन चि धेलें. न कळे पंथु !
जयांतें मूळीं बंध तो चि परमार्थु.
तयां कैसा वो ! कळे माझा श्रीदत्तु ? ॥२॥
देवा ! तुझें मी करीन ध्यान. कयीं पाहीन रूप श्याम सगूण ? ॥छ॥
संन्यासियांप्रति सेंडी चि नाहीं. येर ते जैसें तैसे. बोलोंनि कायी ?
शब्दें परमतत्व कें पडे ठायीं ? दिगंबरा ! म्यां आतां करणें कायी ? ॥३॥

१२०३
जीवाचा जीउ माझा प्राणविसावां शास्त्रज्ञां पुसें माझा श्रीदत्तु दावा !
पुस्तकभारु तो म्यां कैसा वाहावा ?
वादें विश्रांति नाहीं; श्रमु अघवा. ॥१॥धृ॥
शब्दें श्रीदत्ता जाणें कैसी ? ऐसा कें शब्दु निजतत्वप्रकाशीं ? ॥छ॥
पुराणी कीं वर्म दाविलें खूणा; आइका ह्मणती जीर्ण कथा पुराणा !
तेणें विश्रांति न पवे मना. दीगंबराची सोये कव्हणी बोलेना ! ॥२॥

१२०४
श्रमू चि जाला; माये ! त्रासलें मन; श्रीदत्तु आत्मा याची न कळे खूण
आतां मीं देह हें वो ! दृश्य सोडीन;
जेथिचें देखणें. मीं तेथें आटीन. ॥१॥धृ॥
आत्मा रे ! तूं श्रीयोगिराया ! कयी देसील भेटी ? दतात्रेया !॥छ॥
द्रषत्वा मूळीं मीं वो ! लाधली खूण; विविक्तज्ञानें जालें देवदर्शन.
बुझावणीं फाटीं दिधलें मीपण दिगंबर मग कळलें सगूण. ॥२॥

१२०५
श्रीदत्तेंवीण मज नावडे आन; मन वेधलें माये ! करीन ध्यान.
ध्येय सावळें रूप ध्यातां सगुण, ध्यानीं विरोंनि गेलें मींतुंपण. ॥१॥धृ॥
कैसें मी करूं ? वो ! सैये ! द्वैत न साहे. अंगें कवणें पाहों ययाचे पाये ? ॥छ॥
दृश्य देखणें गळे; चळे प्रेम; भेदा उरी चि नाहीं. कें रूप नाम ?
गुणाची वृत्ति आंगीं; नसावेग्कर्म. ऐसें दिगंबर निर्गुण ब्रह्म. ॥५॥

१२०६
स्वरणानंदु माये ! प्रेमरसधारा लोटली; जाईन मीं ज्ञान सागरा.
जातिसे विकळ मीं; कव्हणी घरा. बहू अंतर जालें वेदु न करा. ॥१॥धृ॥
आतां येथूंनि मज परता नाहीं; जायीन पूर्वकृतें ठाईची ठायीं. ॥छ॥
येणें गेलें जे न दे तया सकळां. पुसती परती नाही. वेचली कळ.
दिगंबरू वो ! कोठें मज भेटला ? संसारूभोगु माझा वायां केला. ॥२॥
 
१२०७
जळो चंचळ मन माझें माये ! कैसी मीं धरू योगिराजाचे पाये ?
वयाचा वेगु तरि हा प्रवाहो वाहे; वायां जातसे जन्मु. करणें काये ? ॥१॥धृ॥
श्रीगुरु येकुदां मज भेटवा वो ! जीउ देयीन भेटी ! धरीन पाये ! ॥छ॥
लक्ष कोटी वो लाभु; मी करूं काये ? श्रीदत्तवीण सर्व दुःख वि आहे.
वियोगवेदना आंगींन साहे. दिगंबरेवीण असिलें न काये ॥२॥

१२०८
नामें वांचूंनि काहीं श्रवणीं न सहए; दतेंवांचूंनि स्वरूप न अयनीं न पाहें.
मनस माझें ध्यानीं लागत आहे. नेघे परति चित्त येरे उपायें. ॥१॥धृ॥
परम निदान मजवरि पडों माये ! साहीन तैसें ही दुःख जें जें होये. ॥छ॥
तत्व न चिंतीआन वीण श्रीदत्तें; शरणगतु मी नव्हे आनायेकातें.
बोलणें सत्य सत्य माझें यथार्थे. दिगंबरेंवीण नेणें परातें. ॥२॥

१२०९
देवा ! अनंतब्रह्मांडगोलकोटी तव संकल्पें जाहाली सकळ सृष्टी.
ब्रह्मादीक हें जन्मले तुझा पोटीं; तया तुजप्रति काय आणू भेटी ? ॥१॥धृ॥
क्षीरसाग्रु कासेन तुप्ति कीजे ? बाहीं गगन कैसेनि कवलीजे ?
मशकें मेरू हा कैसा जी ! आराधीजे ? योगिराया ! तुतें काये समर्पिजे ? ॥छ॥
चंद्र सूर्य उजलती जेणें तेजें, तयाप्रति दीपु कवणु समर्पीजे !
आतां भजन अवघें चि असो मातें. दिगंबरा ! तुझा चरणी नूरिजे. ॥२॥

१२१०
दृष्टी पाहों, तरि तूं न मासि गोचरु; ध्यान करीं, तंवं बुद्धीहूंनि परु.
पूजा करिनि पाहें, तंव तूं निराकारु; कैसा व्योमासि समर्पूं उपचारु ? ॥१॥धृ॥
देवा ! कैसें भजन तुझेंकीजे ? क्रिया,योग मातें काहीं चि नूमजे.
सर्व असो ! आतां तें येक कीजे, तूजमाजि आह्मीं मीपण निराजे. ॥छ॥
देवा ! आत्मयांसि कैसें शरण जावें ? सर्वव्यापी केवि शिरसें वंदावें ?
दिगंबरा ! आतां असो हे असो हें अघवें !
तूंचि होउंनि आतां उगलें असावें. ॥२॥

१२११
तूटि पडली सखिये काये करूं ? घडला अपराधु मज सैये ! थोरू ।
म्यां वो ! केला या देवासी नमस्कारु;
देॐ आत्मा ऐसा नेणोंनि विचारू ॥१॥धृ॥
अवधूता ! दत्ता ! रे ! क्षमा करीं ! नमस्कारें मज अंतर न धरीं.
अवघा तूं चि तूं केलां हीं नमस्कारीं;
मन न राहे. सावरूं कवणें परीं ? ॥छ॥
अवो ! भज्य कैसें वो ! भजावें ? क्रियेप्रति हेतु काहीं न संभवे !
मन न राहे; विषयो धरिला जीवें; ऐसे अपराध साहातां बरवें ? ॥२॥
यातें नेणोनि भजन कैसें करूं ? यातें जाणतां भेदासि होये मारू.
दिगंबराचे चरण कैसें धरूं ? बाह्य दृष्टीसि पडला अंधकारू. ॥३॥

१२१२
आशा लाउंनि, निराशा येणें केली; भेटी आलें तवं, भेदु विसरली.
मीं मीपणापासूंनि अंतरली. रूप जाणें केवि ? मति पांगूळली. ॥१॥धृ॥
ऐसें कैसें नवल याचें ? माये ! रूप दाऊंनि भेदाची वृत्ति खाये ?
तेथें सर्वस्वें मज चि हानि होये. सेखी देखिलें, तें बोलतां हीं नये. ॥छ॥
वृत्ति नूपडे; आसक्त जालें मन. आतां नीवादु न पावें मीं येथूंन.
दिगंबराचें पुरे वो ! संनिधान ! जीवनाशें हीं सूटिका नाहीं, जाण. ॥२॥

१२१३
रूप दिसे; परि मायावी जाण माये ! लक्ष ठेवितां काहीं चि आया नये.
द्वैत ग्रासूंनि स्वयें चि सर्व होये ! संसारीक सकळ वायां जाये. ॥१॥धृ॥
भेटि जालियां नीवाडु पुडती नाहीं; भेदें नुरतां कवणाचें मग कायी ?
संवंसारीक हारपे अवघें ही. ऐसें अगूण न पाहावें डोळां दोहीं. ॥छ॥
काहीं नाहीसें होउंनि माये असणें; दिगंबररूप भजावें कवणें ? ॥२॥

१२१४
आशा करूंनि आलियें तूजपासीं; सेखीं माझें चि तूं सर्व हारितासी;
पाहों ह्मणतां हीं रूप लपविसी;
ऐसी माव आतां न करीं आह्मांसीं. ॥१॥धृ॥
देयीं देवा ! माझें चि मातें मन; सर्व हरूंनि गोविसी काजेवीण.
पुरें, पुरें जाहालें तुझें ज्ञान; भेदु मरे ऐसें न करूं साधन. ॥छ॥
पाहों ह्मणतां पाहाणें चि हरितासी; तुझें गार्‍हाणें सांगावें कवणा पासीं ?
बोळु बोलता तुटी चि वरि येसी; मौन धरीतां काहीं चि न फळसी. ॥२॥
पावे धरूं, मां द्रवैल तुझें मन. काहीं राखसी आमुचें भिन्नपण.
देवा ! काये केलें तें जीवपण ? सर्व बैसलासि उदरीं घालूंन. ॥३॥
देवा ! कैंची आलियें तुजपासीं ? सिद्ध मूकलियें माणूसपणासी.
दिगंबरा ! प्रेम कैसें विसंचीसी ?
नको ! नको ! मीं होईन तुझी दासी. ॥४॥

१२१५
धन्य काळु ! तुजसीं भेटि जाली ! बहू दुरूंनि तुजप्रति आली !
जीवें आशा अपार होती केली;
बोलसी ना ! कां तुवां दुरावीली ? ॥१॥धृ॥
माझें हृदय दुःखें फूटताहे ! सागों कवणा ? बापु तूं माझी माये !
बुझाउं तूज कवणें उपायें ? अपराधी धरीन दोन्ही पाये ! ॥छ॥
श्रमु सांगणें तें तैसें चि ठेलें. भेटी दुःख आगळें दुणावलें.
मायेबापा ! तुझेनि येकें बोलेंवीण माझें अंतर करपलें ! ॥२॥
पाहावयां अधिकारू मातें नाहीं. बोलावयां आतां मीं करूं कायी ?
कैसा राखों प्राण मी यये देहीं ? दिगंबरा ! वीनउं नेणें काहीं. ॥३॥

१२१६
बहु दिवस जाहाले; भेटी नाहीं ! पाहावया आवडी जाली देहीं;
तें चि ध्यान लागलें डोळां दोहीं ! पासीं
आलयां उदास करिसी कायी ? ॥१॥धृ॥
पुढें यावया अधिकारू नाहीं; परतोंनि जावें कवणे ठायीं ?
तुजवीण आश्रयो नेणों काहीं. मध्यें ऐसें जीणें. मी करूं कायी ? ॥छ॥
तापत्रय लागला वन्हि देहीं; तुझा वियोगु प्रज्वळला हृदयीं;
साह्य जालासि तयातें तूं हीं; तरि आतां सर्वथा उरि नाहीं. ॥२॥
आजि पर्वतु हा कोसळला ! प्रळयाग्नी म्यां नयनी देखीला !
दिगंबरू न बोले काहीं केला ! आतां प्राणु देइन मीं आपुला ! ॥३॥

१२१७
जप तपसु तुजविण नेणें काहीं; माझें मनस हें तुझा चि ठायीं !
मज विश्रांति तुमचा चि ठाईं; पासीं यावया अधिकार नाहीं ! ॥१॥धृ॥
कासया ऐसा देहो ठेवणें ? नाम स्मरतां लाजिरवाणें !
माझें अपराध मीं तवं नेणें; क्षमा करिजसु उदारपणें ! ॥छ॥
तुझा संगू चि मज परप्राप्ति; मा सेवया परम विश्रांति.
बहु काळ संगति मज होती. दिगंबरा ! प्रकट करु मूर्ती. ॥२॥

१२१८
तुज सोडूंनि म्यां केलें अर्थध्यान; नाना विषय भोगिले देवा ! जाण !
दिवा रात्रौ घडलें विस्मरण; कोण्ही द्यावया नाहीं आठवण ! ॥१॥धृ॥
अपराधांसि गणना न दीसे ! माजलों तेणें विषयरसें !
तुझा वियोगीं सतोषु ध्येला मनसें; आतां तुजप्रति येइजे कैसें ? ॥छ॥
जन, जन, जन, धन, धन, जाया वणवण केली अवघी वांयां !
क्षणक्षणें क्षीण गति जाली वया ! आतां स्मरों मीं कैसेनि दत्तात्रेया ? ॥२॥
तुज सोडूंनि भक्षिलें अन्न; केलें अन्यदेवतायजन;
आशा करूंनि सेविले देवा जन; दिगंबरा ! कित्ती करूं आठवण ? ॥३॥

१२१९
देवा ! अपराध घडले साचार ! परी अवधारीं माझें उत्तर.
दोषजनित तें कर्म समग्र तूं तवं जाणतासि साक्षी अंतर. ॥१॥धृ॥
मातें उपचारु कवणें करावा तुज वांचूंनि ? श्रीदेवदेवा !
मायेबापु तूं प्राणविसावां; बोलु कवणा जी ! आतां ठेवावा ? ॥छ॥
दोषत्रय मिनलें ये देहीं; अविद्येस्तव उमजू चि नाहीं.
दोषविकार प्रकटले, साही ! अरिषड्वर्ग ते. सांगों काई ? ॥२॥
तेणें भ्रमित जाहालें माझें मन; बुद्धि, चित्त, सकळ करणगण; तें तूं
मानितासि कैसें क्रियमाण ? यत्नु न करिसी; बोलसी कठीण. ॥३॥
हास्य करी, तें हांसणें न मनवे; करी रुदन, तें रुदन नव्हे;
व्यर्थ ! व्यर्थ चि धर्म अघवे काये पाहातासि ? न दिसे बरवें ! ॥४॥
पाहे माझें मज स्मरण नाहीं ! बापु तूं, तरि आरत न पाहीं !
वेगवत्वरु मजपासीं येइं ? दिगंबरा ! दर्शनामृत देयीं ! ॥५॥

१२२०
ऐसी करितां सोसणी श्रमु जाला ! गुणी प्राणु विकळु माझा गेला !
बापु माझा धावोंनु पासीं आला ! अवधूतें गुणदोषु हरीला ! ॥१॥धृ॥
माझें हृदय शीतळ जालें माये ! रूप सावळें सुंदर भासताहे !
मातें वियोगवेदनाते न साहे ! बाहीं कवळीं अवधूतु माझी माये ! ॥छ॥
देवा ! आतां न सोडी तुझी कास; सवें येईन मीं न राहें निमिष !
परमसखे पाहीन निजदास ! दिगंबरा ! झणें करिसी उदास. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP