मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीभक्तविजय| आरती श्रीविठ्ठलाची युगें ... श्रीभक्तविजय ॥ मंगलाचरणम् ॥ आरती श्रीविठ्ठलाची युगें ... अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ आरती श्रीविठ्ठलाची, प्रार्थना - आरती श्रीविठ्ठलाची युगें ... संतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित Tags : bhakta vijaymahipatipuranपुराणभक्त विजयमराठीमहिपती आरती श्रीविठ्ठलाची, प्रार्थना Translation - भाषांतर आरती श्रीविठ्ठलाचीयुगें अठ्ठावीस विठेवरी उभा ॥ वामांगीं रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥ पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ॥ चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥ जय देव जय देव जय पांडुरंगा ॥ रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥धृ०॥ तुळसीमाळा गळां कर ठेवुनी कटीं ॥ कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटीं ॥ देव सुरवर नित्य येती भेटी ॥ गरुड हनूमंत पुढें उभे रहाती ॥जय०॥२॥ धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ॥ सुवर्णाचीं कमळें वनमाळा गळां ॥ राई रखुमाबाई राणीया सकळा ॥ ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ॥ज०॥३॥ओंवाळूं आरत्या कुर्वंड्या येती ॥ चंद्रभागेमाजी सोडुनियां देती ॥ दिंड्या पताका वैष्णव नाचती ॥ पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥जय०॥४॥ आषाढी कार्तिकी भक्तजन येती ॥ चंद्रभागेमाजी स्नानें जे करिती ॥ दर्शन हेळामात्रें तयां होय मुक्ती ॥ केशवासी नामदेव भावें ओंवाळिती ॥ जयदेव०॥५॥प्रार्थनाघालीन लोटांगण वंदीन चरण ॥ डोळ्यांनि पाहिन रूप तुझें ॥ प्रेमें आलिंगिन आनंदें पूजिन ॥ भावें ओंवाळीन म्हणे नामा ॥१॥त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ॥ त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत् सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ॥३॥अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ॥ श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥हरेराम हरेराम रामराम हरेहरे । हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्णकृष्ण हरेहरे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP