मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मंदार मंजिरी| सदा सुवेला सुकृता मंदार मंजिरी मंदार मंजिरी पापी माणसाची कृत्यें गोमती नदीच्या काठी सुचलेले विचार. मोहवी मदिरा मना. पुण्यपंक्ति. श्री शारदा स्पृश्यास्पृनिरूपण. वेलावेदन गुलाबाच्या फुलांचे भाषण. शंकातंक माध्वीकमाधुरी. मेषपेषण पहिला सर ऐश्वर्यचलता प्रसूपय शिवाजीचे चारित्र्य चित्रचातुरी काककाणता जिताजित स्मारकाचा उपयोग ज्ञानसंपदा कवीचा आनंद सदा सुवेला सुकृता कवीचा आनंद व्यंजनावली सुकन्या विसंवाद मंदार मंजिरी - सदा सुवेला सुकृता भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये. Tags : poemकविताकाव्यमराठी वृत्त वंशस्थ Translation - भाषांतर चांगलें कृत्य करावयाचें मनांत येतांच तें करावयाला उपक्रम करावा, मुहूर्त पहात बसूं नये, असा बोध ह्या काव्यांत केला आहे.धनिक - “धनें उद्यांपासुनि मी अकिंचनां दयार्द्रभावें वितरीन सज्जनां” ।कवि -दिलें न कां आजवरी तुवां धना? न देशि वा आजहि कां धना जनां? ”धनिक -“गृहें उद्यांपासुनि मी अनाश्रया विशाल देईन जनां रहावया” ।कवि-“दिलीं न कां आजवरी तुवां गृहें? न आज कां देशि? असें सुकृत्य हें.”धनिक - “उद्यां अशा ह्या कृति चांगल्या दिनीं करीन अन्याहि सुपुण्यवर्ध्दिनी”कवि - “उद्या असें कां म्हणसी सुहृत्तमा? न आज कां तूं करिसी उपक्रमा? ॥३॥मुमूर्षु जो अन्न नसे म्हणोनिया तयास द्या अन्न दया करोनिया ।विलंब होतां उपयोग कायसा? मृतीं नसे वीर्य मुळीं सुधारसा ॥४॥त्वरा करा, द्या बुडत्यास हात हो! विलंब हेतु न निमज्जनास हो ।विलंब झाल्यास मरेल तो नर, तयास तारील न तूमचा कर ॥५॥करावयाला सुकृतें सदा झटा, न अंतरायें सुकृतार्जनीं हटा ।मुहूर्त सारे शुभ पुण्यसाधना, करूं नका निष्फल कालयापना ॥६॥असेल जो जो अनुप्रत मानव तया क्षमाया न विलंब हो लव ।बुध प्रशस्या गणिती क्षमा दया, सदा सुवेला सुकृता करावया ॥७॥स्वदेशभव्यार्थ करावया श्रम करा त्वरा द्वारिं उभा जरी यम ।करा त्वरा, चित्तिं धरुं नका भया, सदा सुवेला सुकृता करावया ॥८॥स्वदेशकार्यें असतीं अनेक तीं न एकट्यालाच कधींच साधती ।तुम्ही करावा श्रमभाग आपला, विलंब होतां न बधाल सत्फला ॥९॥स्वधर्मसंस्थाबलवीर्यरक्षणीं त्वरा करा, साधु सुकृत्य तें गणी ।स्वधर्मसेवा रुचते महाशयां नका कधीं ती कचरूं करावया ॥१०॥न काल कोणाकरिताहिं थांबतो, गती न मंदा करितो कधींच तो ।विलंब हावा सुकृतास कासया? सदा सुवेला सुकृता करावया ॥११॥“सदा सुवेला सुकृता” काव्य वामननंदनें ।रचिलें तें बहु प्रेमें आदरावें सदा जनें ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP