मंदार मंजिरी - ज्ञानसंपदा

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


ज्ञानरूपी संपत्ति इतर सर्व प्रकारच्या संपत्तीहून वरच्या प्रतीची आहे, हें ह्या काव्यांत वर्णिले आहे.
ज्ञानधन सर्वहि धनापरिस थोर,
लेशहि नसे तदवनीं हृदयिं घोर ।
संदुक नको तदवनास्तव नरास,
काहिहिं पडे तदवनास्तव न यास ॥१॥
ज्ञानधन सर्वहि धनापरिस थोर ।
हें हरुं शके चतुरही कधिं न चोर ।
लोहभय संदुकिंहि अन्यविध वित्त
ठेवुनहि भीति हृदयीं उपजवींते,
राजभय, चोरभय नित्य डवचीतें ।
ज्ञानधन शुध्द शमवर्धन करून
स्वर्गसुख चाखवि नराप्रति अनून ॥३॥
भूमिपति दुष्ट अतिवेल, मदपुष्ट,
पंडितवरावरि असो प्रखर रुष्ट ।
ज्ञान न शके श्रम करूनहि हराया,
तच्छम् अनंत तरि जातिलचि वाया ॥४॥
पद्मसर आटविल रुष्ट विधि सारें,
कीं जल तयामधिलही करिल खारें, ।
दुग्धजलभेदकृतिपाटवविहीन
होइ भुवि हंस रुसतां विधि कधीं न ॥५॥
ज्ञानधन देउनि सरेलचि कधीं न,
अन्यधन देउनि धनी धनहीन ।
ज्ञानधन देउनिच तें धन दुणावे,
अन्य देउनि हळुं हळुं उणावे ॥६॥
ज्ञानधन वृध्दि पवतें वितरणानें,
ज्यापरि नदीजल सदा प्रवहणानें ।
क्षीण परि अन्यविध होइ धन दानें,
चंद्रवपुसें सुरकृतें अमृतपानें ॥७॥
ज्ञानधन दे वितरतां शम मनास,
अन्यधनदान पिळितेंच हृदयास ।
हें पथकर नचि कधीहिं मनुजास,
तें सतत हो परमसौख्यद मनास ॥८॥
ज्ञानधन मान परचित्तिं ठसवीतें,
द्वेष परचित्तिं धन अन्य उठवीतें ।
हें असुखहेतु मनुजाप्रति सदैव,
तें सुखद जेविं अनुकूल भुवि दैव ॥९॥
करी विद्याधर कृती ही अल्पा “ज्ञानसंपदा” ।
शांतिदा ती तया होओ, लोकां संतत सौख्यदा ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP