मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मंदार मंजिरी| स्पृश्यास्पृनिरूपण. मंदार मंजिरी मंदार मंजिरी पापी माणसाची कृत्यें गोमती नदीच्या काठी सुचलेले विचार. मोहवी मदिरा मना. पुण्यपंक्ति. श्री शारदा स्पृश्यास्पृनिरूपण. वेलावेदन गुलाबाच्या फुलांचे भाषण. शंकातंक माध्वीकमाधुरी. मेषपेषण पहिला सर ऐश्वर्यचलता प्रसूपय शिवाजीचे चारित्र्य चित्रचातुरी काककाणता जिताजित स्मारकाचा उपयोग ज्ञानसंपदा कवीचा आनंद सदा सुवेला सुकृता कवीचा आनंद व्यंजनावली सुकन्या विसंवाद मंदार मंजिरी - स्पृश्यास्पृनिरूपण. भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये. Tags : poemकविताकाव्यमराठी शिवाशिव Translation - भाषांतर [रोटीबेटी ह्या व्यवहारामध्यें स्पृश्य आणि अस्पृश्य हा विचार करावा; परंतु सार्वजनिक कामांत विटाळ मानूं नये असे विचार ह्या काव्यांत कवीनें ग्राथत केले आहेत.]वृत्त आर्या संहितेने देशाची जीं कार्यें देशभक्त करितात ।तीं करितां ते स्पृश्यास्पृश्यत्वविचार नाणिति मनांत ॥१॥रोटी बेटी देतां घेता निर्बंध जातिचे पाळी ।परि मूल्य तयां इतर व्यवहाराच्या न साधु दे काळीं ॥२॥मी ब्राम्हण तो अंत्यज, त्याचा स्पर्शहि नको मुळीच मला ।हें आजवरि कधींहि ब्राम्हण न म्हणावया दिसे सजला ॥३॥देशाची करितांना कार्यें धरि देशभक्त न विटाळ ।हिंदू सारे एकचि, सारे ते हिंदभूमीचे बाळ ॥४॥अस्पॄश्यां वगळुनि जो देशाच्या भावुकी झटेल नर ।तो अन्नातें पचवूं पाहेल असोनि रुग्णही जठरा ॥५॥सगळ्याही जातीच्या ऐक्यानी देशकार्य साधेल ।नसतां पुरोहितादिक यजमान न मखफलास पावेल ॥६॥अत्यंजपथकें होतीं शिवबाच्या वाहिनीमधि अनेक ।शिवला कधी तयाच्या मूर्खपणाचा मनास न विवेक ॥७॥अत्यंज सैनिक घेउनि लढला यवनांविरुध्द शिवराया ।स्पृश्यस्पृश्याविचारा अवसर न दिला तयें मनिं शिराया ॥८॥सामान्य शत्रु आला चाल करुनि त्यास दूर साराया ।शिवबानें कास कसुनि सार्या हिंदूस जुळविलें याया ॥९॥मूर्खपणाचा केला त्यानें न विवेक, सर्व सम त्याला ।सर्वों जुळवुनि नेलें देशाचें नष्टचर्य विलयाला ॥१०॥हा अत्यंत मी ब्राम्हण देशहित बुडो, शिवेन मी न तया ।हें न म्हणेल ब्राम्हण देशहिती काळजी पवित्र जया ॥११॥देशाचें हित करितां ब्राम्हण अत्यंज असा नुरे भेद ।हा भेद केलियानें देशहिताचाच होइ विच्छेद ॥१२॥समरीं ब्राम्हण अत्यंज दंडाला दंड लावुनी प्रेमें ।लढले, लढती, लढतील, देश अशानेंच भरतसें क्षेमें ॥१३॥सार्वजनीन सभास्थलि समरीं संकटि समान सगळेच ।समजून शिवाजीनें देशाचा दूर सारिला पेचे ॥१४॥हिंदूहिंदूमध्ये शिवबाने भेद आणिला न मनीं ।सर्वा समान समजुनि झाला तो आदरास पात्र जनीं ॥१५॥दास्यभुजंगास्यक्षुरभुज वंद्य तुम्हास शिव असेल जर ।तर तत्पथानुसरणी वाटावी कां बरें तुम्हा कचर? ॥१६॥या जवळि अत्यंजनो, कचरूंप नका, तुम्हि अम्ही एक ।साधूं देशहितातें, सत्प्रेमाचा न शक्य अतिरेक ॥१७॥प्रेमानें एकवटुनि सहवीर्य करोनि देशहित साधूं ।देशहिताच्या कामीं न विटाळा स्थान वितरती साधूं ॥१८॥स्पृश्यास्पृश्य, शिवाशिव, वर्ण अधम उच्चतम, असा भेद ।देशहितीं नुरतो हें तत्व शिकवितात आपणा वेद ॥१९॥स्पृश्य गणा अत्यंज, ह्या स्पृश्यत्वांतुनि निघेल सहवास ।प्रेमेहि सहवासातुनि, त्यांतून निघेल गौढ विश्वास ॥२०॥विश्वासातुंनि ऐक्य स्थिर, साहाय्यस्पृहा तयांतून ।तींतूनि देशकार्यप्रगति विभवमार्गिं होइल अनून ॥२१॥धिक त्यां नरां करिति जे उच्चावचैवर्णभेद देशहितीं ।धिक त्यां नरां शिवाशिव देशहितीं जे मनांत दृढ धरिती ॥२२॥ह्या स्पृश्यास्पृश्यत्वा भूता प्रेमें नृसिंहमंत्रेच ।सहवीर्य करुनि पळवूं, देशाचा दूर सारुं या पेच ॥२३॥जो मांगाला भाऊ, धेडाला बाप, वैदुला मुलगा ।समजे देशहिताच्या कामीं तो देशभक्त, तद्यश गा ॥२४॥स्पृश्यास्पृश्यविचारांचे निरुपण करी कवी- ।वामनात्मज, तें लोकां मार्गदर्शक हो भवीं ॥२५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP