मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण| अभंग १६१ ते १६५ पंचीकरण अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८५ अभंग ८६ ते ९० अभंग ९१ ते ९५ अभंग ९६ ते १०० अभंग १०१ ते १०५ अभंग १०६ ते ११० अभंग १११ ते ११५ अभंग ११६ ते १२० अभंग १२१ ते १२५ अभंग १२६ ते १३० अभंग १३१ ते १३५ अभंग १३६ ते १४० अभंग १४१ ते १४५ अभंग १४६ ते १५० अभंग १५१ ते १५५ अभंग १५६ ते १६० अभंग १६१ ते १६५ अभंग १६६ ते १७० अभंग १७१ ते १७५ अभंग १७६ ते १८० अभंग १८१ ते १८५ अभंग १८६ ते १९० अभंग १९१ ते १९५ अभंग १९६ ते २०० अभंग २०१ ते २०५ अभंग २०६ ते २१० अभंग २११ ते २१६ पंचीकरण - अभंग १६१ ते १६५ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ अभंग १६१ ते १६५ Translation - भाषांतर ॥१६१॥ मृत्तिकेचा ऐसा करी नानापरी ।मागुता टवकारी नर्क तेथें ॥१॥नर्क तेथें आहे कैसा हा काढावा ।व्यर्थ वाढवावा लोकाचार ॥२॥लोकाचार केला लैकिकीं देखतां ।अंतरी शुद्धता आढळेना ॥३॥आढळेना ज्ञान पूर्ण समाधान ।सर्वदा बंधन संदेहाचें ॥४॥संदेहाचे पाप झालें वज्रलेप ।विचार निष्पापर रामदासीं ॥५॥॥१६२॥ प्रपंचीं तें भाग्य परमार्थीं वैराग्य ।दोनी यथासांग दोहींकडे ॥१॥दोहींकडे सांग होतां तो समर्थ ।नाहींतरी व्यर्थ तारंबळीं ॥२॥तारंबळी होतां विचार नसतां ।दास म्हणे आतां सावधान ॥३॥॥१६३॥ बंधाचा मुमुक्षें प्रबोध करावा ।मग उद्धरावा ज्ञानमार्गें ॥१॥ज्ञानमार्गें द्यावें सत्य समाधान ।तरी मग जन पाठीं लागे ॥२॥पाठीं लागे त्याचें अंतर जाणावें ।आपुलें म्हणावें दास म्हणे ॥३॥॥१६४॥ पतित हे जन करावे पावन ।तेथें अनुमान करूं नये ॥१॥करूं नये गुणदोष उठाठेवी ।विवेकें लावावी बुद्धि जना ॥२॥बुद्धि सांगे जना त्या नांव सज्जन ।पतितपावन दास म्हणे ॥३॥॥१६५॥ महापापी लोक पूर्वींचे आहेती ।तेचि पालटती जयाचेनी ॥१॥जयाचेनि योगें होतसे उपाय ।तुटती अपायें नानाविध ॥२॥नानाविध जन सुबुद्धचि होती ।साधूचे संगतीं दास म्हणे ॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 31, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP