मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण| अभंग ८१ ते ८५ पंचीकरण अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८५ अभंग ८६ ते ९० अभंग ९१ ते ९५ अभंग ९६ ते १०० अभंग १०१ ते १०५ अभंग १०६ ते ११० अभंग १११ ते ११५ अभंग ११६ ते १२० अभंग १२१ ते १२५ अभंग १२६ ते १३० अभंग १३१ ते १३५ अभंग १३६ ते १४० अभंग १४१ ते १४५ अभंग १४६ ते १५० अभंग १५१ ते १५५ अभंग १५६ ते १६० अभंग १६१ ते १६५ अभंग १६६ ते १७० अभंग १७१ ते १७५ अभंग १७६ ते १८० अभंग १८१ ते १८५ अभंग १८६ ते १९० अभंग १९१ ते १९५ अभंग १९६ ते २०० अभंग २०१ ते २०५ अभंग २०६ ते २१० अभंग २११ ते २१६ पंचीकरण - अभंग ८१ ते ८५ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ अभंग ८१ ते ८५ Translation - भाषांतर ॥८१॥ दर्पणी पाहातां दिसे सर्व अंग ।परी पृष्ठीभाग आढळेना ॥१॥आपुलाच पाठी आपणा न दिसे ।ऐसें बोलतसे सर्व जन ॥२आपशुद्धि नेणे त्या काय करावें ।म्हणोनि जाणावें आपणासी ॥३॥आपणासी जाणें संतांचे संगतीं ।जया अधोगति जन्म नाहीं ॥४॥जन्म नाहीं मृत्यु नाहीं येणें जाणें ।स्वरूपीं राहणें दास म्हणे ॥५॥॥८२॥ भयानक स्वप्र जया वाटे भयें ।तेणें निजो नये सर्वकाळ ॥१॥सर्वकाळ जागा विवेकसंगतीं ।तयासी कल्पांतीं भय नाहीं ॥२॥भय उठे देहीं तूं तंव विदेहीं ।देहातीत पाही आपणासी ॥३॥आपणा नेणतां वाटे नाना चिंता ।म्हणोनि दुश्चिता राहु नये ॥४॥राहूं नये कदा या देहसंबंधीं ।मनी धरी शुद्धि स्वरूपाची ॥५॥स्वरूपाची शुद्धि जया ठांई पडे ।तया नरा घडे समाधान ॥६॥समाधान घड देवा आठवितां ।राम-दासीं चिंता दूर ठेली ॥७॥॥८३॥ जंव आहे तुज हा देहसंबंध ।तंद नव्हे बोध राघवाचा ॥१॥राघवाचा बोध या देहावेगळा ।देह कळवळा तेथें नाहीं ॥२॥नाहीं सुख दु:ख नाहीं येणें जाणें ।चिरंजीव होणें रामरूपीं ॥३॥रामरूपीं होय जन्म मृत्यु वाव ।विश्रांतीचा ठाव राम एक ॥४॥राम एकरूपीं सर्वरूपीं आहे ।अनुभवीं पाहे आपुलिया ॥५॥आपुल्या अंतरीं बाह्य निरंतरीं ।सर्वसृष्टिभरी नांदतसे ॥६॥नांदतसे सदा जवळी कळेना ।कदा आकळेना साधुविण ॥७॥साधुविण राम धांडोळितां श्रम ।नव्हेचि विश्राम साधुविणें ॥८॥साधुविणें राम कदा आकळेना ।संदेह तुटेना कांहीं केल्या ॥९॥कांहीं केल्या नव्हे साधुसंतांविण ।रामदासी खूण सांगतसे ॥१०॥॥८४॥ लागतसे मुळीं हा देहसंबंधु ।करितसे खेदु अहंभावें ॥१॥अहंभावें कदा नये पुरवला ।भवभ्रम झाला दु:खराशी ॥२॥दु:खराशी झाल्या देहाचे संबंधें ।सर्व ज्ञानबोधें तुटतील ॥३॥तुटती संबंध संतांचे राहाणीं ।होईल झाडणी पंचभूतां ॥४॥पंचभूतां लयो स्वरूपअन्वयो ।तुटला संशयो संबंधाचा ॥५॥॥८५॥ पाहातां दिसेना तेंचि बरें पाहें ।तेथें रूप आहे राघवाचें ॥१॥राघवाचें रूप जाणावें अरूप ।शुद्ध तत्स्वरूप निराकार ॥२॥निराकार राम देखतां विश्राम ।दुरीं ठाके श्रम संसारींचा ॥३॥संसारींचा श्रम राघवीं असेना ।परि तो दिसेना राम डोळां ॥४॥राम डोळां आहे अनुभवें पाहें ।मीपण न साहे रामरूपीं ॥५॥रामरूपीं नाम रूप दोनी नाहीं ।तेथें मना राहीं सर्वकाळ ॥६॥सर्वकाळ रामदर्शन होतसे ।निर्गुणीं विश्वासे मन माझें ॥७॥मन माझें रामस्वरूपीं संचरे ।तेणें देहीं भरे विदेहता ॥८॥विदेहता देहीं अलक्ष लक्षावें ।नि:शब्दा बोलावें संतसंगें ॥९॥संतसंगें घडे नि:संगाचा संग ।राघवीं संयोग रामदासीं ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : March 31, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP