मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचक| स्फुट पंचक भक्तिपर अभंगपंचक कलियुगपंचक मूर्खपणपंचक भ्रांतिपंचक अभिभानपंचक उन्मत्तपंचक आळसपंचक बंधनपंचक पराधीनपंचक मलिनपंचक प्रस्ताविकपंचक वेडसरपंचक क्षोभपंचक वोसणपंचक विवेकपंचक वैराग्यपंचक संशयपंचक नीतिपंचक उपासनापंचक भक्तिपंचक कथापंचक निष्ठापंचक शिकवणपंचक निश्चयपंचक अलिप्तपंचक ज्ञानपंचक ध्यानपंचक सख्यपंचक संवादपंचक अर्थसार्थपंचक सुंदरपंचक व्यर्थपंचक होळीपंचक वादपंचक भ्रमपंचक झटपणीपंचक गंधपंचक संतपंचक स्फुट पंचक - स्फुट समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ स्फुट Translation - भाषांतर ॥१॥ त्याचे पाय हो नमावे ।त्याचें कीर्तन हो ऐकावें ॥१॥दुजियासी सांगे कथा ।आपण वर्ते त्याची पथा ॥२॥कीर्तनाचें न करी मोल ।जैसे अमृताचे बोल ॥३॥सन्मानितां नाहीं सुख ।अपमानितां नाहीं दु:ख ॥४॥किंचित् दिलें दातयानें ।तेंहि घेत आनंदानें ॥५॥ऐस आहे हरिदास ।लटकें न वदे रामदास ॥६॥॥२॥ वाणी शुद्ध करी नामीं ।चित्त शुद्ध होय प्रेमीं ॥१॥नित्य शुद्ध होय नामीं ।वसतांही कामीं धामीं ॥२॥कर्ण शुद्ध करी कीर्तन ।प्राण शुद्ध सुमन ॥३॥त्वचा शुद्ध करी रज ।मस्तक नमितां पदांत्रुज ॥४॥करशुद्धि राम पूजितां ।पादशुद्धि देउळी जातां ॥५॥नेमें लिंग करी शुद्ध ।अंतर निर्मळ करी गुद ॥६॥रामापायीं रहाताम बुद्धि ।रामदासा सकळ शुद्धी ॥७॥॥३॥ माझें सर्व जावें देवानें रहावें ।देवासी पहावें भक्तपणें ॥१॥भक्तपणें मज देवची जोडला ।अभ्यास मोडला सर्व कांहीं ॥२॥सर्व कांहीं जावेओ एक देव राहो ।माझा आर्त भावो ऐसा आहे ॥३॥जो हेत अंतरीं देव तैसा झाला ।हा दीन पाहिला कोणी एक ॥४॥कोणी एक पुण्य जे होतें संचलें ।दास म्हणे झालें समाधान ॥५॥॥४॥दीनाचा दयाळू कीर्ति ऐकियेली ।म्हणूनी पाहिली वाट तूझी ॥१॥अनाथाचा नाथ होथील कैवारी ।म्हणोनियां हरीं बोभाईलें ॥२॥तुजविण कोण जाणे हे अंतर ।कोणासी जोजार घालूं माझा ॥३॥दास म्हणे आम्ही दीनाहूनी दीन ।करावें पालन दुर्बळाचें ॥४॥॥५॥ आम्हां पतितांची सांड केली जरी ।आमचा कैवारी कोण आहे ॥१॥आम्हीं भरवंसा कोणाचा धरावा ।सांगावें केशवा दयानिधे ॥२॥तुजविण आम्हां नाहीं त्रिभुवनीं ।धांवे चक्रपाणि दीनबंधो ॥३॥पतितपावन ब्रीद हें बांधिलें ।तारावें वहिलें दासालागीं ॥४॥॥६॥ पळशी तूं तरी नाम कोठें नेशी ।आम्ही अहर्निशीं नाम घोकूं ॥१॥आम्हांपासोनियां जातां नये तुज ।तें हें वर्म बीज नाम जपूं ॥२॥देवा आम्हां तुझें नाम हो पाहिजे ।मग भेटी सहजें सहजें देणें लागे ॥३॥भोळे भक्त आम्ही चुकलोचि कर्म ।सांपडलें वर्म रामदासा ॥४॥॥७॥ गजेंद्र सावज पडला पानवडीं ।रामें तेथें उडी टाकियेली ॥१॥प्रल्हाद गांजितां कोण सहाकारी ।स्वयेंची मुरारि प्रगटला ॥२॥क्षत्रियें ब्राह्मणें गांजिलीं बापडीं ।रामें तेथें उडी घाडियेली ॥३॥तेहतीस कोटी देव पडिले बांदोडीं ।रामें तेथें उडी टाकियेली ॥४॥दासापायीं पडली देहबुद्धि बेडी ।रामें तेथें उडी टाकियेली ॥५॥रामदास म्हणे नका करूं शीण ।रामें भक्त कोण उपक्षिले ॥६॥॥८॥ तुजविण देव मज कोणी नाहीं ।माझी चिंता कांहीं असों द्यावी ॥१॥वैराग्यें अनिष्ट अभावें वरिष्ठ ।माझे मनीं नष्ट संदेहता ॥२॥विवेकें सांडिलें ज्ञानें ओसंडिलें ।चित्त हें लागलें तुझे पायीं ॥३॥तुझें नाम वाचें उच्चारीत असें ।अंतरीं विश्वास धरीयेला ॥४॥रामदास म्हणे मी तुझें अज्ञान ।माझें समाधान करी देवा ॥५॥॥९॥ श्वानाचिया पुत्रें कल्होळ मांडिला ।कलहो लागला एकसरां ॥१॥भुंकितां गुरगुरी वासितोचि तोंड ।वरती थोबाड करूनियां ॥२॥एक ते भुंकती एक ते रडती ।दास म्हणे गति निंदकांची ॥३॥॥१०॥ मेरूचिया माथां ठेवूनियां पाव ।जात असे राव कैलासींचा ॥१॥कैलासींचा राव एक देव क्षोभला ।देशधडी केला लंकानाथ ॥२॥लंकेच्या चोहाटीं मांडियेला खेळ ।अग्रीचा कल्लोळ घरोघरीं ॥३॥जाळीयेलीं घरें सुंदर मंदिरे ।पावला कैवारें जानकीच्या ॥४॥जानकीचा शोक दुरी दुराविला ।यशवंत झाला रामदास ॥५॥॥११॥ जाणावा तो नर देवची साचार ।वाचें निरंतर राम राम ॥१॥सगुणीं सद्भाव नाहीं ज्ञानगर्व ।तयालागीं सर्व सारीखची ॥२॥निंदका वंदका सगट सांभाळीं ।मन सर्व काळीं पालटेना ॥३॥पालटेना मन परस्रीकांचनीं ।निववी वचनीं पुढिल्यासी ॥४॥पुढिल्यासि तोचि सुख देत आहे ।उपकारीं देह लावीतसे ॥५॥लावीतसे देह रामभजनास । रामीं रामदास हरिभक्त ॥६॥॥१२॥ भक्तपणें रामनामाचा अव्हेर ।करी तो गव्हार मुक्त नव्हे ॥१॥मुक्त नव्हे काय स्वयें शूलपाणि ।रामनाम वाणी उच्चारीतो ॥२॥राम म्हणे शिव तेथें किती देव ।बापुडे मानव देहधारी ॥३॥देहधारी नर धन्य ते संसारीं ।वाचे निरंतरीम रामनाम ॥४॥रामनाम वाचें स्वरूप अभ्यंतरीं ।धन्य तो संसारीं दास म्हणे ॥५॥॥१३॥ मी खरा पतित तूं खरा पावन ।आतां अनमान करूं नको ॥१॥आतां कांहीं मज चिंता तीही नसे ।तुझें नाम कैंसें वाचे येई ॥२॥समथे घेतला नामासाठीं भार ।मज उपकार कासयाचा ॥३॥रामदास म्हणे तुझें तुज उणें ।सोयरीम पिशूनें हांसतील ॥४॥॥१४॥ पतितपावना जानकीजीवना ।वेगीं माझ्या मना पालटावें ॥१॥मिथ्या शब्दज्ञानें तुज अंतरलों ।संदेहीं पडलों मीपणाच्या ॥२॥सदा खळखळ निर्गुणाची घडे ।सगुण नातुडे ज्ञानगवै ॥३॥रामदास म्हणे ऐसा मी पतीत ।मीपणें अनंत आतुडेना ॥४॥॥१५॥ टाळ धरूं कथा करूं ।रामालागीं हांका मारूं ॥१॥ये रे रामा ये रे रामा ।तुझी आवड लागो आम्हां ॥२॥तुजविण गाईल कोण ।ऊठ सांडिलें मीतूंपण ॥३॥राम-दास पाहे वास ।भेटी द्यावी सावकाश ॥४॥॥१६॥ रामभक्तिवीण आन नाहीं सार ।साराचें हें सार राम एक ॥१॥कल्पना-विस्तारू होतसे सन्वरू ।आम्हां कल्पतरू चाड नाहीं ॥२॥कामनेलागोन विटलेंसे मन ।तेथें चाड कोण कामधेनु ॥३॥चिंता नाहीं मनीं राम गातां गुणीं ।तेथें चिंतामणि कोण पुसे ॥४॥कदा नाही नाश स्वरूप सुंदर ।तेथें आम्हां हिरे चाड नाहीं ॥५॥रामदास म्हणे रामभक्तीवीण ।जाणावें तें उणें सर्व कांहीं ॥६॥॥१७॥ सीतापति राम पतितपावन ।गाती भक्तजन आवडीनें ॥१॥राघवाच्या गुणा न दिसे तूळणा ।कैलासींचा राणा लांचावला ॥२॥देवांचें मंडण भक्तांचें भूषण ।धर्म संरक्षण राम एक ॥३॥रामदास म्हणे धन्य त्यांचें जिणें ।कथानिरूपणें जन्म गेला ॥४॥॥१८॥ आम्हीं देखिला विठोबा ।आनंदें विटेवरी उभा ॥१॥तेथें दृश्याची जे दाटी ।तेचि रुक्मिणी गोमटी ॥२॥रामीं रामदास म्हणे ।जो ओळखे तोचि धन्य ॥३॥॥१९॥ लांचावोनि भक्तिलोभा ।असे वाळवंटीं उभा ॥१॥पदकीं इंद्रनीलशोभा ।प्रभे शोभा उजळती ॥२॥भक्त पुंडलिकें गोविला ।जाऊं नेदी भांबाविला ॥३॥विटे नीट असे ठाकला ।भीमातीर वाळुवंटी ॥४॥भाग्य पुंडलिकाचें ।उभें दैवत त्रिलोकींचें ॥५॥कीं जें तारूं भवसागरीं ।भीमातीरीं विनटलें ॥६॥एकें पुंडलिकें करुनी जोडी ।आम्हांसी दिधली कल्पकोडी ॥७॥तुटलीं संसारसांकडीं ।रामदास म्हणतसे ॥८॥॥२०॥ जीवन्मुक्त प्राणी होऊनियां गेले ।तेणें पंथें चाले तोचि धन्य ॥१॥जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी ।नि:संदेह मनीं सर्वकाळ ॥२॥मिथ्या देहभान प्रारब्ध अधीन ।राखे पूर्णपण समाधानीं ॥३॥आवडीनें करी कर्म उपासना ।सर्व काळ ध्यानारूढ मन ॥४॥पदार्थाची हानि हाता नये कोणी ।जयाची करणी बोला ऐसी ॥५॥धन्य पैं ते दास संसारीं उदास ।तयां रामदास नमस्कारी ॥६॥॥२१॥ संसार देखिला तरी पाहे सार ।वायां येरेझार पाडूं नको ॥१॥पाडूं नको दु:खसागरीं आपणा ।म्हणे नारायणा ओळखावें ॥२॥वेगीं आप आपणासीं ।संसारीं सुटशीं दास म्हणे ॥३॥॥२२॥ विचारें संसार होतो देशधडी ।सोनियाची घडी जात असे ॥१॥डावा तास गेला मोक्षपंथा जातां ।विवेकें तत्त्वतां याशीं नांवें ॥२॥सदा श्रीरामाचं भजन करितां ।दास म्हणे चिंता दूर होय ॥३॥॥ अभंगसंख्या ॥१०५॥एकूण अभंगसंख्या ॥१९५६॥ N/A References : N/A Last Updated : March 31, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP