मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचक| कथापंचक पंचक भक्तिपर अभंगपंचक कलियुगपंचक मूर्खपणपंचक भ्रांतिपंचक अभिभानपंचक उन्मत्तपंचक आळसपंचक बंधनपंचक पराधीनपंचक मलिनपंचक प्रस्ताविकपंचक वेडसरपंचक क्षोभपंचक वोसणपंचक विवेकपंचक वैराग्यपंचक संशयपंचक नीतिपंचक उपासनापंचक भक्तिपंचक कथापंचक निष्ठापंचक शिकवणपंचक निश्चयपंचक अलिप्तपंचक ज्ञानपंचक ध्यानपंचक सख्यपंचक संवादपंचक अर्थसार्थपंचक सुंदरपंचक व्यर्थपंचक होळीपंचक वादपंचक भ्रमपंचक झटपणीपंचक गंधपंचक संतपंचक स्फुट पंचक - कथापंचक समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ कथापंचक Translation - भाषांतर ॥१॥ धन्य धन्य तें नगर ।जेथें कथा निरंतर ॥१॥गुण गाती भगवंताचे ।तेचि मानावे दैवाचे ॥२॥स्वयें बोले जगजीवन ।थोर कलियुगीं कीर्तन ॥३॥रामदास म्हणे भले ।हरिभक्तीं उद्धरले ॥४॥॥२॥ रामनामावीणें कांहीं ।अंतीं सोडवण नाहीं ॥१॥गंगातीरीं योगेश्वर ।अथवा प्रपंचीं ईश्वर ॥२॥थोरपणें धरितां तांठा ।तरि तो नागवे करंटा ॥३॥बहुत पूजिलीं दैवते ।योग याग नाना मतें ॥४॥धोती पोती हो भुजंगी ।लोकीं कर्म करिता योगी ॥५॥ विनवी रामीं रामदास ।नाना साधनीं सायास ॥६॥॥३॥ सकळ साधनांचें फळ ।रामनामचि केवळ ॥१॥जप तप अनुष्ठान ।अंतीं नामचि प्रमाण ॥२॥नाना मंत्र मंत्रावळी ।सोडवीना अंतकाळीं ॥३॥महापातकी पतित ।नामें तारिले अनंत ॥४॥नाम साराचेंहि सार ।नाम सकळांसी आधार ॥५॥दास म्हणे सांगो किती ।नामावीण नाहीं गति ॥६॥॥ अभंगसंख्या ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : March 30, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP