मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचक| प्रस्ताविकपंचक पंचक भक्तिपर अभंगपंचक कलियुगपंचक मूर्खपणपंचक भ्रांतिपंचक अभिभानपंचक उन्मत्तपंचक आळसपंचक बंधनपंचक पराधीनपंचक मलिनपंचक प्रस्ताविकपंचक वेडसरपंचक क्षोभपंचक वोसणपंचक विवेकपंचक वैराग्यपंचक संशयपंचक नीतिपंचक उपासनापंचक भक्तिपंचक कथापंचक निष्ठापंचक शिकवणपंचक निश्चयपंचक अलिप्तपंचक ज्ञानपंचक ध्यानपंचक सख्यपंचक संवादपंचक अर्थसार्थपंचक सुंदरपंचक व्यर्थपंचक होळीपंचक वादपंचक भ्रमपंचक झटपणीपंचक गंधपंचक संतपंचक स्फुट पंचक - प्रस्ताविकपंचक समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ प्रस्ताविकपंचक Translation - भाषांतर ॥१॥ डोळे चिरींव चांगले ।वृद्धपणीं सरक्या झाले ॥१॥ओले मातीचा भरंवसा ।काय मानीसी माणसा ॥२॥मुख रसाळ चांगलें ।पुढें अवघें सुर्कुतलें ॥३॥रम्य नासीक सरळें ।सर्वकाळ पाणी गळे ॥४॥कर्ण भूषणें सुंदर ।पुढें जाहालीं बधिर ॥५॥बरवी दंताची पंगती ।परी ती उन्मळूनी पडती ॥६॥बरवे कर आणि चरण ।परि ते झाले निष्कारण ॥७॥अंगकांति होती बरी ।झाली चिरगुटाचे परी ॥८॥केश होताती पांढरे ।लाळ गळतां ना धरे ॥९॥बहुसाल होतें बळ ।पुढें जाहलें निर्बळ ॥१०॥देह होतें जें निर्भळ ।तेंचि झालें अभंगळ ॥११॥सर्व तारुण्यें चांगला ।प्राणी दीनरूप झाला ॥१२॥रामीं रामदास म्हणे ।आतां सावधान होणें ॥१३॥॥२॥ थोटे पांगुळे बधिर ।आतां तरी होती नर ॥१॥नाहीं देहाचा भरंवसा ।शरण जावें जगदीशा ॥२॥कोड कुश्चळ सर्वांगीं ।एक झाले क्षयरोगी ॥३॥एक प्राणी अंध होती ।एका समंध लागती ॥४॥नाना रोगांचे उमाळे ।काय होईल न कळे ॥५॥रामदास म्हने भावें ।वेगीं सार्थक करावें ॥६॥॥३॥ वेगीं व्हावें सावधान ।ऐसें आहे वृद्धपण ॥१॥डोळे जाती कान जाती ।दांत अवघेची पडती ॥२॥हात गेले पाय गेले ।देह पाझर्म लागलें ॥३॥दास म्हणे शक्ति गेली ।मती अवघीच खुंटली ॥४॥॥४॥ ऐसें आहे सर्व कांहीं । चिरंजीव कांहीं नाहीं ॥१॥युक्ति जाते बुद्धि जाते ।क्तिया तेही पालटते ॥२॥धीर विचार बुडाला ।होता विवेक तोही गेला ॥३॥रामीं रामदास म्हणे ।वृद्धपणाचीं लक्षणें ॥४॥॥५॥ अंतीं एकलेंचि जावें ।म्हणोनि राघवीं भजावें ॥१॥मातापिता बंधूजन ।कन्या पुत्रही सोडून ॥२॥जन्मवरी केला भार ।शेखीं सोडूनी जोजार ॥३॥म्हणे रामीं रामदास ।सर्व सांडुनियां आस ॥४॥॥६॥ काळ जातो क्षणक्षणा ।मूळ येईल मरणा ॥१॥कांहीं धांवाधांव करी ।जंव तो काळ आहे दुरी ॥२॥देह आहे जाइजणें ।भुललासी कवण्या गुणें ॥३॥मायाजाळीं गुंतले मन ।परि हें दु:खाचें कारण ॥४॥सत्य वाटतें सकळ ।परी जातां नाहीं वेळ ॥५॥रामीं रामदास म्हणे ।आतां सावधान होणें ॥६॥॥७॥ झालें देह हो गलित ।आलें संसार लंछित ॥१॥सावधान सावधान ।पुढें नाहीं व्यवधान ॥२॥आतां मन आटोपावचें ।आपुल्या विजधामा जावें ॥३॥राहे देवाचें स्मरण ।रामीं रामदास म्हणे ॥४॥॥८॥ पुण्य पहावया कारणें ।देव धाडी बोलावणें ॥१॥वाट चांगली धरावी ।पुण्यसामोग्री करावी ॥२॥वाट वेच नाहीं जाया ।पुढें सुख कैंचें तया ॥३॥रामीं रामदास म्हणे ।बुद्धिवंत ते शहाणे ॥४॥॥९॥ अंतकाळ येतयेतां ।पुढे नये चूकवितां ॥१॥अकस्मात लागे जावें ।कांहीं पुण्य आचरावें ॥२॥पुण्यावीण जातां प्राणी ।घडे यमाची जाचणी ॥३॥रामदास म्हणे जना ।कठीण यमाची यातना ॥४॥॥१०॥ अभक्त भोगीत यातना ।देव राखे भक्तजना ॥१॥देव भक्त दोन्ही एक ।यम देवाचा सेवक ॥२॥भक्तें देव केला सखा ।तोचि त्याचा पाठीराखा ॥३॥रामीं रामदास म्हणे ।भक्ति करा याकारणें ॥४॥॥११॥ लक्ष्मी आहे रे चंचळ ।इस जातां नाहीं वेळ ॥१॥सत्य मानावें उत्तर ।देव नित्य निरंतर ॥२॥नाना वैभव समस्त ।येंती जाती अकस्मात ॥३॥म्हणे रामीं रामदास ।काय देहाचा विश्वास ॥४॥॥१२॥ नाना व्यथा उद्भवती ।प्राणी अकस्मात जाती ॥१॥मृत्यु बांधला पदरीं ।होती आयुष्याची भरी ॥२॥काळ लागला सन्निधी ।एक घडी लागों नेदी ॥३॥राम-दास म्हणे खुणें ।भेद जाणती शहाणे ॥४॥॥१३॥ नदी मर्यादा सांडिती ।उष्णकाळीं वोस होती ॥१॥तैसा तारुण्याचा भर ।सवेंचि होतसे उतार ॥२॥भाग्य चढों लागे वेगें ।सवेंचि प्राणी भीक मागे ॥३॥रम दास म्हणे काळ ।दानीं दिवस पर्वकाळ ॥४॥॥१४॥ पुरें पट्टणें वसती ।एक वेळे वोस होती ॥१॥तैसें वैभव सकळ ।येतां जात नाहीं वेळ ॥२॥बहु सृष्टीचीं रचना ।होय जाय क्षणक्षणा ॥३॥दास म्हणे सांगों किती ।आले गेले चक्रवतीं ॥४॥॥१५॥ सेवकासी भाग्य चढे ।त्याचे अधीन होणें पडे ॥१॥देव करील तैसें व्हावें ।काय करील तें पहावें ॥२॥वर्तमान घडे जैसें ।उगेंच व्हावें लागे तैसें ॥३॥दास म्हणे वेळ कैंसी ।राज्य जाहलें कलीसी ॥४॥॥१६॥ काम क्रोध खवळले ।मद मत्सर मातले ॥१॥त्यांचे अधीन लागे होणें ।ऐसें केलें नारायणें ॥२॥लोभ दंभ अनावर ।जहाला गर्व अहंकार ॥३॥दास म्हणे सांगों किती ।पडली ऐशांची संगति ॥४॥॥१७॥ ऐसें कैंसें रे सोंवळें ।शिवतां होतसे ओंवळें ॥१॥स्नानसंध्या टिळे माळा ।पोटीं क्रोधाचा उमाळ ॥२॥नित्य दंडीतोसी देह ।तरी फिटेना संदेह ॥३॥बाह्य केली झळफळ ।देहबुद्धीचा विटाळ ॥४॥नित्यनेम खटाटोप ।मनीं विषयाचा जप ॥५॥रामदासीं दृढभाव ।तेणेंविण सर्व वाव ॥६॥॥१८॥ देह विटाळाचा गोळा ।कैंसा होतसे सोंवळा ॥१॥तुज कळेना विचारू ।ऐसेंयासि काय करूं ॥२॥दृढ केला अभिमान ।तेणें साधणें बंधन ॥३॥रामदासीं स्वामीविण ।केला तितका होय शीण ॥४॥॥१९॥ गेला संदेहाचा मळ ।तेणें नि:संग निर्मळ ॥१॥बाह्य गंगाजळस्रान ।चित्तशुद्धि ब्रह्मज्ञान ॥२॥सर्वकाळ कर्मनिष्ठ ।सर्वसाक्षित्वें वरिष्ठ ॥३॥रामदासीं स्नानसंध्या ।सुत करी माता वंध्या ॥४॥॥२०॥ सर्वकाळ संतृप्तता ।तृप्त केली लोलंगता ॥१॥फळ जाहलें तर्पणीं ।संसारासी पडिलें पाणी ॥२॥देवराव तृप्त केले ।भावें आत्म निवेदिलें ॥३॥रामदासाचे तर्पणीं ।सर्व केलें रामार्पणीं ॥४॥॥२१॥ अनित्याचा भ्रम गेला ।शुद्ध नित्य नेम केला ॥१॥नित्यानित्य हा विचार ।केला स्वधर्म आचार ॥२॥देहबुद्धि अनंर्गळ ।बोधें फिटला विटाळ ॥३॥रामदासीं ज्ञान झालें ।आणि स्वधर्म रक्षिले ॥४॥॥अभंगसंख्या ॥९९॥ N/A References : N/A Last Updated : March 30, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP