मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अज्‌जिल्‌जाल

सूरह - अज्‌जिल्‌जाल

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मदीनालीन, वचने ८)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

जेव्हा पृथ्वी आपल्या संपूर्ण आवेशानिशी हलवून सोडली जाईल आणि पृथ्वी आपल्या आतील सर्व ओझे बाहेर टाकील आणि मानव म्हणेल की, हिला हे काय होत आहे? त्या दिवशी ती आपले (वरील घडलेले) अहवाल निवेदन करील कारण तुझ्या पालनकर्त्याने तिला (असे करण्याची) आज्ञा दिलेली असेल त्या दिवशी लोक विभिन्न स्थितीत परततील जेणेकरून त्यांची कृत्ये त्यांना दाखविली जातील. मग ज्याने तिळमात्र पुण्य केले असेल ते तो पाहील. आणि ज्याने तिळमात्र पाप केले असेल तेही तो पाहील. (१-८)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP