मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण| अश्शाम्य कुराण अल् फातिहा अल् बकरा आलिइमरान अन्निसा अल् आअराफ अल्अन्फाल अत्तौबा यूनुस हूद य़ूसुफ अर्रअद इब्राहीम अल्हिज्र बनीइस्राईल अल्कहफ मरयम तॉहा अल्अंबिया अल्हज अल्मुअमिनून अन्नूर अल्फुरकान अश्शुअरा अन्नम्ल अल्कसस अल्अन्कबूत अर्रूम लुकमान अस्सज्दह अल्अहजाब सबा फातिर याऽसीऽऽन अस्साऽऽफ्फात सॉऽऽद अज्मुमर अल्मुअमिन हामीऽऽम अस्सजदा अश्शूरा अज्जुखरूफ अद्दखान अल्जासियह अल्अहकाफ मुहम्मद अल्फत्ह अलहुजुरात काऽऽफ अज्जारियात अत्तूर अन्नज्म अल्कमर अर्रह्मान अल्वाकिआ अल्हदीद अल्मुजादला अल्हश्र अल्मुम्तहिना अस्सफ अल्जुमुआ अल्मुनाफिकून अत्तगाबुन अत्तलाक अत्तहरीम अल्मुल्क अल्कलम अल्हाऽऽक्का अल्मआरिज नूह अल्जिन्न अल्मुज्जम्मिल अल्मुद्दस्सिर अल्कियामा अद्दहर अल्मुर्सलात अन्नबा अन्नाजिआत अबस अत्तकवीर अल्इन्फितार अल्मुतफ्फिफीन अल्इन्शिकाक अल्बुरूज अत्तारीक अल्आला अल्गाशिया अल्फज्र अल्बलद अश्शाम्य अल्लैल अज्जुहा अलम् नश्राह अत्तीन अल्अलक अल्कद्र अल्बय्यिन: अज्जिल्जाल अल्आदीयात अल्कारिया अत्तकासुर अल्अश्र अल्हुमज: अल्फील कुरैश अल्माऊन अल्कौसर अल्काफिरून अन्नस्र अल्लहब अल्इखलास अल्फलक अन्नास सूरह - अश्शाम्य कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो. Tags : literaturequransahityatranslationअनुवादकुराणग्रंथसाहित्य अश्शाम्य Translation - भाषांतर (मक्काकालीन, वचने १५)अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.सूर्य आणि त्याच्या उन्हाची शपथ आणि चंद्राची शपथ जेव्हा तो त्याच्या पाठीमागे येतो. आणि दिवसाची शपथ जेव्हा तो (सूर्याला) स्पष्ट करतो आणि रात्रीची शपथ जेव्हा ती (सूर्याला) झाकून घेते, आणि आकाशाची व त्या अस्तित्वाची शपथ ज्याने त्याला उभारले, आणि पृथ्वीची व त्या अस्तित्वाची शपथ ज्याने तिला अंथरले आणि मानवी जीवाची व त्या अस्तित्वाची शपथ ज्याने त्याला नीटनेटके केले. मग त्याच्यातील दुष्टता व पापभिरूता त्यावर प्रकट केली. खचितच सफल झाला तो ज्याने अंत:करणाची शुद्धी केली आणि विफल झाला तो ज्याने त्याला दाबून टाकले. (१-१०)समूदने आपल्या दुर्वर्तनाने खोटे ठरविले. जेव्हा त्या राष्ट्राचा सर्वात जास्त कठोर माणूस चवताळून उठला तेव्हा अल्लाहच्या प्रेषिताने त्या लोकांना सांगितले की खबरदार, अल्लाहच्या उंटिणीला (हात लावू नका) आणि तिच्या पाणी पिण्य़ात (अडथळा बनू नका). परंतु त्यांनी त्याचे म्हणणे खोटे ठरविले आणि उंटिणीला ठार केले. सरतेशेवटी त्यांच्या अपराधापायी त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्यावर अशी आपत्ती कोसळविली की एकाच वेळी सर्वांना जमीनदोस्त केले आणि आपल्या (या कृत्याच्या) कोणत्याही दुष्परिणामाची कोणतीही भीती नाही. (११-१५) N/A References : N/A Last Updated : November 18, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP