मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अन्‌नाजिआत

सूरह - अन्‌नाजिआत

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ४६)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

शपथ आहे (त्या दूतांची) जे ओढून खेचून आणीत असतात. आणि हळूच काढून नेतात आणि (त्या दूतांची जे सृष्टीत) चपळाईने झेपावत असतात. मग (हुकुमाची अंमलबजावणी करण्यासाठी) चढाओढ करतात. मग (ईश्वरी आज्ञेनुसार) मामल्यांची व्यवस्था चालवितात. ज्या दिवशी हादरून सोडील भूंकपाचा झटका, आणि त्याच्या पाठोपाठ आणखी एक झटका बसेल, काही ह्र्दये असतील ज्यांचा त्या दिवशी भयाने थरकान उडत असेल, नजरा त्यांच्या भयभीत झाल्या असतील. (१-९)

ते लोक म्हणतात, “काय खरोखर आम्ही पूर्वीच्या स्थितीत पुन्हा परत आणले जाऊ? काय जेव्हा आम्ही जीर्ण हाडे बनलेले असू?” म्हणू लागले, “हे परतणे मग तर फार तोटयाचे होईल.” वस्तुत: ते केवळ इतके काम आहे की एक जोराची दर्डावणी होईल आणि अकस्मात ते खुल्या मैदानात हजर होतील. (१०-१४)

काय तुम्हाला मूसा (अ.) च्या कथेची वार्ता पोहोचली आहे? जेव्हा त्याच्या पालनकर्त्याने त्याला तुवाच्या पवित्र खोर्‍यात हांक दिली होती, “फिरऔन जवळ जा, तो दुराचारी झाला आहे, आणि त्याला सांग, काय तू यासाठी तयार आहेस की पवित्रता प्राप्त करावी आणि मी तुझ्या पालनकर्त्याकडे तुझे मार्गदर्शन करावे तर (त्याचे) भय तुझ्यात निर्माण होईल?” मग मूसाने (अ.) (फिरऔनपाशी जाऊन) त्याला मोठा संकेत दाखविला परंतु त्याने खोटे ठरविले आणि मानले नाही, मग कुटील कारस्थान खेळण्यासाठी परतला आणि लोकांना गोळा करून त्याने सांगितले, “मी तुमचा सर्वश्रेष्ठ पालनकर्ता आहे.” सरतेशेवटी अल्लाहने त्याला मरणोत्तर जीवन आणि जगाच्या प्रकोपात पकडले. वस्तुत: यात मोठा धडा आहे त्या प्रत्येक इसमासाठी जो भीत असेल. (१५-२६)

काय तुम्हा लोकांची निर्मिती अधिक कठीण काम आहे की आकाशाची? अल्लाहने ते बनविले. त्याचे छत खूप उंच उठविले मग त्यांच्यात संतुलन प्रस्थापित केले. आणि त्याची रात्र झाकली आणि त्यचा दिवस उजाडला. त्यानंतर पृथ्वीला त्याने अंथरले. तिच्यातून तिचे पाणी व तिचा चारा काढला आणि पर्वत तिच्यात रोवले जीवनसामग्नी म्हणून तुमच्यासाठी व तुमच्या जनावरांसाठी. (२७-३३)

मग जेव्हा तो मोठा हलकल्लेळ माजेल ज्या दिवशी मनुष्य आपले सर्व कर्म आठवील आणि प्रत्येक पहाणार्‍यासमोर नरक उघडून ठेवले जाईल. तर ज्याने दुराचार केला होता आणि जगातील जीवनाला प्राधान्य दिले होते, नरकच त्याचे ठिकाण असेल. आणि ज्याने आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्याचे भय बाळगले होते आणि मनाला वाईट इच्छेपासून दूर ठेवले होते, स्वर्ग त्याचे ठिकाण असेल. (३४-४१)

हे लोक तुम्हाला विचारतात की, “अखेर ती घटका केव्हा येऊन ठेपेल?” तुमचे काय काम, की तिची वेळ सांगावी. तिचे ज्ञान तर अल्लाहवर समाप्त आहे. तुम्ही केवळ खबरदार करणारे आहात त्या प्रत्येक इसमाला जो तिचे भय बाळगीत असेल. ज्या दिवशी हे लोक तिला पाहतील तर त्यांना असे वाटेल की (जगात आणि मृतावस्थेत) हे केवळ एका दिवसाच्या शेवटच्या अथवा पहिल्या प्रहरापर्यंत थांबले आहेत. (४२-४६)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP