मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
विकृतीष्टींच्या कालाचा निर्णय

प्रथम परिच्छेद - विकृतीष्टींच्या कालाचा निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


अथविकृतीष्टिः तत्रापस्तंबः यदीष्ट्यायदिपशुनायदिसोमेनयजेत सोमावास्यायांपौर्णमास्यांचेति अत्रप्रकृतितः कालेसिद्धेपिसद्यस्कालताविधेया तृतीययासांगत्वेनोक्तेः अत्रपौर्णमास्यमावास्याशब्दाभ्यांतदंत्यक्षणोगृह्यते तेनतद्वत्यहोरात्र इत्यर्थमाहरामांडारः माधवोपि इष्ट्यादिविकृतिः सर्वापर्वण्येवेतिनिर्णय इति ।

आतां विकृतीष्टींच्या कालाचा निर्णय सांगतो.
त्याविषयीं आपस्तंब - “ जर इष्टि, पशुयाग, किंवा सोमयाग करणें आहे, तर तो अमावास्या व पौर्णमासी यांतून कोणत्याही पर्वाचे ठायीं करावा. ” ‘ प्रकृतीप्रमाणें विकृति करावी ’ या वचनानें प्रकृतीचा ( दर्शपौर्णमासेष्टीचा ) काल ह्या विकृतींविषयीं सिद्ध असतां हें वचन, त्या विकृतींला सद्यस्कालत्व ( अन्वाधान व याग यांना एककालत्व ) विधान करण्यासाठीं आहे. कारण, ‘ इष्ट्या, पशुना ’ ह्या पदांत तृतीयाविभक्ति असल्यामुळें सांगकर्म त्याच दिवशीं करावें, असें सूचित होतें. ह्या स्थलीं पौर्णमासी अमावास्या शब्दांनीं त्यांचा अत्यक्षण घ्यावा, म्हणजे अंत्यक्षणयुक्त अहोरात्राचे ठायीं, असा अर्थ रामांडार सांगतो. माधवही - “ इष्ट्यादिक सर्व विकृति पर्वाचे ठायींच कराव्या असा निर्णय जाणावा. ”

अत्रविशेषमाहत्रिकांडमंडनः कात्यायनश्च आवर्तनात् प्राग्यदिपर्वसंधिः कृत्वातुतस्मिन् प्रकृतिंविकृत्याः तदैवयागः परतोयदिस्यात्तस्मिन्विकृत्याः प्रकृतेः परेद्युरिति धूर्तस्वाम्यादयोप्येवमाहुः यदीष्ट्येतिसांगायाविकृतेः पर्वकालत्वादावर्तनात्‍ प्राक्संधौसंधिमभितोयजेतेतिप्रकृतेः प्रतिपदिसमाप्तिनियमात् प्रकृत्यनंतरंप्रतिपदिविकृत्ययोगात्पूर्वेद्युर्विकृतिरित्युक्तंतंत्ररत्नेपार्थसारथिना यद्यपिप्रकृतेः पूर्वत्वादपूर्वमंतेस्यादित्यापस्तंबेनोक्तं तथापिहेतुवादेनश्रुतिमूलत्वाभावादंगंवासमभिव्याहारादितिवदप्रामाण्यमितितदाशयः आग्रयणेतुविशेषंवक्ष्यामः अन्वारंभणीयातुचतुर्दश्यांकार्येतिहिरण्यकेशिवृत्तौमातृदत्तीये अन्येषांपर्वण्येव ।

याविषयीं विशेष सांगतो - त्रिकांडमंडन व कात्यायन - “ आवर्तनाचे पूर्वी जर पर्वसंधि असेल तर त्या संधिदिवशीं प्रकृतियाग करुन नंतर विकृतियाग त्याच दिवशीं करावा. जर आवर्तनकालापलीकडे पर्वसंधि असेल तर त्या दिवशीं विकृतियाग करावा; आणि प्रकृतियाग संधिदिवसाच्या दुसर्‍या दिवशीं करावा. ” धूर्तस्वाम्यादिक ग्रंथकारही असेंच सांगतात. “ यदीष्ट्या यदि पशुना यदि सोमेन यजेत ” ह्या आपस्तंबवचनानें सांग विकृतीचा काल पर्व ( अमावास्या पौर्णिमा ) सांगितल्यावरुन व आवर्तनाच्या पूर्वी संधि असतां “ संधीच्या पूर्वीं व पलीकडे याग करावा ” ह्या वचनावरुन प्रकृतीची समाप्ति प्रतिपदेंत करावी असा शास्त्रनियम असल्यामुळें प्रकृतीनंतर प्रतिपदेंत विकृति होत नसल्यामुळें पूर्वदिवशीं विकृति करावी, असें तंत्ररत्नांत पार्थसारथीनें सांगितलें आहे. जरी “ प्रकृति ही पहिली असल्यामुळें अपूर्व कर्म जें विकृति तें शेवटीं करावें ” असें आपस्तंबानें सांगितलें आहे, तथापि त्या आपस्तंबवचनांत हेतुवाद ( म्हणजे प्रकृति पूर्वी असण्याला हेतु प्रकृति पहिली आहे, आणि विकृति नवीन आहे, म्हणून ती नंतर असावी, असें कारण ) असल्यामुळें या सांगण्याला मूलश्रुति नाहीं म्हणून जसें - कात्यायन शाखेंत पिंडपितृयज्ञ दर्शश्राद्धाच्याबरोबर सांगितल्यामुळें तो दर्शाचें अंग आहे; पण अशा हेतूनें सांगितलेलें अंगत्व सर्वांना प्रमाणभूत होत नाहीं - तसें येथें प्रामाण्य नाहीं, असा पार्थसारथीचा आशय होय. आग्रयणाविषयीं विशेष निर्णय पुढें ( द्वितीय परिच्छेदांत ) सांगूं, अन्वारंभणीया इष्टि चतुर्दशीचे दिवशीं करावी, असें हिरण्यकेशिसूत्राचे मातृदत्तीयवृत्तींत आहे. इतरांनीं पर्वाचे ठायींच करावी.

पशौसोमेचकालांतरमप्याहबौधायनः आमावास्येनवाहविषेष्ट्वानक्षत्रेचेति शुक्लपक्षेकृत्तिकादिविशाखांतेषुदेवनक्षत्रेष्वितिकेशवस्वामीव्याचख्यौ चातुर्मास्येष्वपिद्वादशाहयथाप्रयोगपक्षयोर्नक्षत्रेष्वप्यारंभः यावज्जीवसांवत्सरप्रयोगयोस्तुफाल्गुन्यांचैत्र्यांवारंभः पशौतुविशेषमाहकात्यायनः अर्धादह्नोभवतिनियतंपर्वसंधिः परस्तात्कृत्वातस्मिन्नहनितुपशुंसद्यएवव्द्यहंवा आरभ्याथप्रकृतिरथचेत्पर्वसंधिः पुरस्तात्कृत्वातस्मिन्‍ प्रकृतिमथतुस्यात्पशुः सद्यएव अधिकारपशुस्त्वग्नीषोमीयेणसवनीयेनवासमानतंत्रोवाकार्यइति त्रिकांडमंडनः ।

पशुयाग व सोमयाग यांविषयीं दुसराही काल सांगतो - बौधायन - “ आमावास्येन वा हविषेष्ट्वा नक्षत्रे च ” नक्षत्रे च याचा अर्थ - शुक्लपक्षांत कृत्तिकेपासून विशाखेपर्यंत जीं नक्षत्रें तीं देवनक्षत्रें होत, त्यांचे ठायीं पशुयाग व सोमयाग करावा असें केशवस्वामी सांगतो. चातुर्मास्यांचा काल सांगतो - चातुर्मास्यांच्या प्रयोगाचे चार पक्ष आहेत. ते असे: - द्वादशाहपक्ष, यथाप्रयोगपक्ष, यावज्जीवपक्ष आणि सांवत्सरप्रयोगपक्ष. प्रथम दिवशीं वैश्वदेवपर्व, चवथ्या दिवशीं वरुणप्रघासपर्व, आठवा व नववा ह्या दिवशीं साकमेधपर्व, बाराव्या दिवशीं शुनासीरीयपर्व, असा बारा दिवसांचा जो पक्ष तो द्वादशाहपक्ष. पांच दिवसांनीं समाप्ति करणें तो यथाप्रयोगपक्ष. द्वादशाहपक्ष व यथा प्रयोगपक्ष यांचा आरंभ उदगयनांत शुक्लपक्षीं देवनक्षत्राचे ठायींही ( कृत्तिकेपासून ) विशाखांपर्यंत जीं नक्षत्रें तीं देवनक्षत्रें त्यांचे ठायींही ) करावा. यावज्जीवपक्ष व सांवत्सरपक्ष यांचा आरंभ चैत्री किंवा फाल्गुनी पौर्णिमा यांतून कोणत्याही दिवशीं करावा. पशुयागाविषयीं विशेष सांगतो - कात्यायन - “ जर दिवसाच्या उत्तरार्धांत पर्वसंधि असेल तर त्या संधिदिवशीं सद्यस्काल किंवा व्द्यहकाल ( दोन दिवस करणें तो ) असा पशुयाग करुन प्रकृतीचा आरंभ करावा; आणि पर्वसंधि दिवसाच्या मध्याह्नीं किंवा पूर्वाह्णीं असेल तर संधिदिवशीं प्रकृति समाप्त करुन सद्यस्कालिक पशुयाग करावा. ” अधिकारपशुयाग तर अग्नीषोमीय पशु अथवा सवनीय पशु यांसह समानतंत्र करावा, असें त्रिकांडमंडन सांगतो.   

N/A

References : N/A
Last Updated : May 22, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP