मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
तिथिनिर्णय

प्रथम परिच्छेद - तिथिनिर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


अथतिथिनिर्णयः तत्रतिथिर्द्वेधा शुद्धाविद्धाच दिनेतिथ्यंतरसंबंधरहिताशुद्धा तद्रहिताविद्धा तत्र शुद्धायामसंदेहाद्विद्धानिर्णीयते तत्रसामान्यतोवेधमाहमाधवीयेपैठीनसिः पक्षद्वयेपितिथयस्तिथिंपूर्वांतथोत्तरां त्रिभिर्मुहूर्तैर्विध्यंतिसामान्योऽयंविधिः स्मृत इति हेमाद्रिमदनरत्ना दौतुद्विमुहूर्तोप्युक्तः उदिते दैवतंभानौपित्र्यंचास्तमितेरवौ द्विमुहूर्तात्रिरह्नश्चसातिथिर्हव्यकव्ययोरिति विष्णुधर्मोक्तेः द्विमुहूर्तत्वं चानुकल्पः द्विमुहूर्तापिकर्तव्यायातिथिर्वृद्धिगामिनीतिदक्षेणापिशब्दोक्तेः अयंवेधःप्रातरेवसायंतुत्रिमुहूर्तो वेधएव यांतिथिंसमनुप्राप्ययात्यस्तंपद्मिनीपतिः सातिथिस्तद्दिनेप्रोक्तात्रिमुहूर्तैवयाभवेदिति स्कांदोक्तेः दीपिकापि त्रिमुहूर्तगातुसकलासायेति ।

आतां तिथिनिर्णय सांगतो.
तिथि दोन प्रकारची, एक शुद्धातिथि आणि दुसरी विद्धातिथि; ज्या तिथीस सार्‍या दिवसांत अन्यतिथीचा संबंध नाहीं ती शुद्धातिथि, म्हणजे सूर्योदयापासून अस्तमानापर्यंत असणारी - व शिवरात्र्यादिक व्रतांचे ठायीं मध्यरात्रीपर्यंत असणारी ती शुद्धातिथि; तीहून भिन्न ती विद्धातिथि जाणावी. शुद्धातिथिविषयीं संशय नसल्यामुळें निर्णयाचें प्रयोजन नाहीं. विद्धातिथीचा निर्णय सांगतो - त्या विद्धातिथीच्या निर्णयासाठीं सामान्यतः वेध सांगतो - माधवीयांत - पैठीनसि म्हणतो - " शुक्ल व कृष्ण ह्या दोनही पक्षांत सर्व तिथि, पूर्व तिथीला व उत्तर तिथीला तीन मुहूर्तांनीं विद्ध करितात, हा वेधाचा प्रकार सामान्य सर्व तिथींना सांगितला आहे. " हेमाद्रि, मदनरत्न इत्यादिकांत तर द्विमुहूर्तही वेध सांगितला आहे. कारण " सूर्याच्या उदयकालीं दोन मुहूर्त दैवत ( देवदेवताक ), आणि सूर्याच्या अस्तसमयीं तीन मुहूर्त पित्र्य ( पितृदेवताक ) होत, यास्तव प्रातःकालीं दोन मुहूर्त असणारी तिथि हव्या ( देवकर्मा ) विषयीं घ्यावी. आणि सायंकालीं तीन मुहूर्त असणारी तिथि कव्या ( पित्र्यकर्मा ) विषयीं घ्यावी " असें विष्णुधर्मांत वचन आहे. प्रातः कालीं दोन मुहूर्त असें जें सांगितलें, तो अनुकल्प ( गौणपक्ष ) आहे. कारण, " जी तिथि वाढणारी असेल ती जरी दोन मुहूर्तही असली तरी घ्यावी " या दक्षस्मृतींत ‘ अपि ’ शब्द ( दोन मुहूर्तही ) आहे. हा दोन मुहूर्तांचा वेध प्रातःकालींच ग्रहण करावा. सायंकालीं तर त्रिमुहूर्तच वेध घ्यावा. कारण, " सूर्य ज्या तिथीला जाऊन अस्त पावतो ती तिथि अस्ताचे पूर्वीं तीन मुहूर्त असतां संपूर्ण जाणावी " असें स्कांदवचन आहे. दीपिकाही - " सायंकालीं त्रिमुहूर्तव्यापिनी जी तिथि ती संपूर्ण तिथि होय. "

यानितु व्रतोपवासस्नानादौघटिकैकापियाभवेत् उदयेसातिथिर्ग्राह्याविपरीतातुपैतृकइत्यादीनिस्कांदादिवचनानितानिवैश्वानराधिकरणन्यायेनावयवस्तुत्यात्रिमुहूर्तप्रशंसापराणि तिथिविशेषेवेधविशेषःस्कांदे नागोद्वादशनाडीभिर्दिक्पंचदशभिस्तथा भूतोष्टादशनाडीभिर्दूषयत्युत्तरांतिथिमिति अयंचोपवासातिरिक्तविषयइतिवक्ष्यते इतिवेधः ।

आतां जीं " उदयकालीं एक घटिका जरी तिथि असली तरी ती व्रत, उपवास, स्नान इत्यादिक कर्मांविषयीं घ्यावी; पितृकर्माविषयीं अस्तकालगामिनी घ्यावी ” इत्यादिक स्कांदादिवचनें तीं, वैश्वानराधिकरणन्यायानें अवयवाच्या स्तुतिद्वारानें त्रिमुहूर्तप्रशंसापर आहेत. विशेष तिथींना विशेष वेध स्कांदांत सांगतो - " पंचमी बारा घटिकांनीं षष्ठीला विद्ध करिते. दशमी पंधरा घटिकांनीं एकादशीला विद्ध करिते. चतुर्दशी अठरा घटिकांनीं उत्तर तिथीला ( पौर्णिमेला ) विद्ध करिते. " हा सर्व प्रकारचा वेध उपवासव्यतिरिक्तविषयक होय, असें पुढें सांगूं. याप्रमाणें वेधनिर्णय जाणावा.

तत्रसर्वातिथिर्यदहः  कर्मकालव्यापिनीसैवग्राह्या कर्मणोयस्ययः कालस्तत्कालव्यापिनीतिथिः तयाकर्माणिकुर्वीतह्नासवृद्धीनकारणमितिविष्णुधर्मोक्तेः दिनद्वयेतद्याप्तावेकदेशव्याप्तौवायुग्मवाक्यान्निर्णयः तस्य पूर्वाबाधेनोपपत्तेः कर्मकालस्यप्रधानांगत्वाच्च ।

तिथि घ्यावयाची ती अशी - ज्या कर्माचा जो काल रात्रीं किंवा दिवसा असेल त्या कालीं व्यापून राहणारी ज्या दिवशीं जी तिथि असेल तीच घ्यावी. कारण, " ज्या कर्माचा जो काल तत्कालव्यापिनी तिथि घ्यावी, त्या तिथीनें कर्मैं करावीं; कर्मकालाविषयीं क्षय, वृद्धि हीं कारण नाहींत " असें विष्णुधर्मांत वचन आहे. दोन दिवशीं कर्मकालव्यापिनी तिथि असली किंवा एकदेशव्यापिनी असली तर युग्मवाक्यानें निर्णय करावा. तसा निर्णय केला असतां पूर्वोक्त कर्मकालाचा बाध न येतां वाक्याची उपपत्ति होते. कर्मकालाचा बाध होऊं द्या, असें म्हणतां कामा नये; कारण, कर्मकाल हें प्रधान अंग आहे.

युग्मवाक्यंतुनिगमः युग्माग्नियुगभूतानांषण्मुन्योर्वसुरंध्रयोः रुद्रेणद्वादशीयुक्ताचतुर्दश्याचपूर्णिमा प्रतिपद्यप्यमांवास्यातिथ्योर्युग्मंमहाफलं एतद्यस्तंमहादोषंहंतिपुण्यंपुराकृतमिति अत्ररंध्रांताःशब्दाद्वितीयादिनवम्यंततिथिवाचकाः रुद्रएकादशी द्वितीयातृतीयायुतासाचद्वितीयायुतेतिसप्तयुग्मानीत्यर्थः इदंचशुक्लपक्षे अमाप्रतिपद्युग्मस्यपूर्णिमायाश्चतत्रैवसत्त्वादितिकेचित्‍ तत्त्वंत्वमावास्याप्रतिपद्युग्मात्कृष्णपक्षलिंगात्पक्षद्वयपरमिदंतत्तद्विशेषवाक्यैः कृष्णेतिथिविशेषोपोह्यत इति दशमीतूक्तापुराणसमुच्चये संपूर्णेदशमीकार्यामिश्रितापूर्वयाथवेति संपूर्णेशुक्लपक्षे त्रयोदशीतुसुमंतुनोक्ता ’ त्रयोदशीतुकर्तव्याद्वादशीसहितामुनेइति ।

युग्मवाक्य असें - निगम - " युग्म म्हणजे द्वितीया, अग्नि म्हणजे तृतीया, युग म्हणजे चतुर्थी, भूत म्हणजे पंचमी, षट्‍ म्हणजे षष्ठी, मुनि म्हणजे सप्तमी, वसु म्हणजे अष्टमी, रंध्र म्हणजे नवमी, रुद्र म्हणजे एकादशी, द्वितीया तृतीयाविद्धा घ्यावी, तृतीया द्वितीयाविद्धा घ्यावी. याप्रमाणें द्वितीया व तृतीया यांचें युग्म, चतुर्थी व पंचमीचें युग्म, षष्ठी व सप्तमीचें युग्म, अष्टमी व नवमीचें युग्म, एकादशी व द्वादशीचें युग्म, चतुर्दशी व पौर्णिमेचें युग्म, अमावास्या व प्रतिपदेचें युग्म, याप्रमाणें सात युग्में होत. तिथींचें युग्म महाफल देणारें आहे. आणि याच्या उलट म्हणजे युग्मतिथि ज्या नसतील त्यांचा योग महादोषकारक असून पूर्वीचें पुण्य घालवितो. " हीं युग्में शुक्लपक्षांतील आहेत. कारण, अमावास्या व प्रतिपदेचें युग्म, आणि चतुर्दशी व पौर्णिमेचें युग्म हीं शुक्लपक्षांतच आहेत असें कोणी म्हणतात. ह्याचें तत्त्व म्हटलें तर, अमावास्या व प्रतिपदेचें युग्म हें कृष्णपक्षांतील घेण्यास लिंग ( प्रमाण ) असल्यामुळें हें युग्मवाक्य उभयपक्षपर आहे. आतां कृष्णपक्षांत ज्या ज्या युग्मतिथी इष्ट नसतील त्या त्या युग्मतिथींचें निराकारण त्या त्या विशेष वाक्यांनीं करावें, असें तात्पर्य. पुराणसमुच्चयांत दशमी सांगतो - " शुक्लपक्षांतील दशमीतिथि, पूर्वतिथीनें ( नवमीनें ) मिश्रित ( युक्त ) अशी घ्यावी. त्रयोदशी तर सुमंतूनें सांगितली आहे - ती अशीः - " हे मुने, त्रयोदशी तिथि, द्वादशीसहित असेल ती घ्यावी. "

कृष्णपक्षेत्वापस्तंबः प्रतिपत्सद्वितीयास्याद्दितीयाप्रतिपद्युता चतुर्थीसंयुतायाचसातृतीयाफलप्रदा पंचमीचप्रकर्तव्याषष्ठ्यायुक्तातुनारद कृष्णपक्षेष्टमीचैवकृष्णपक्षेचतुर्दशी पूर्वविद्धाप्रकर्तव्यापरविद्धानकुत्रचित्‍ दशमीचप्रकर्तव्यासदुर्गाद्विजसत्तम षष्ठ्यष्टमीअमावास्याकृष्णपक्षेत्रयोदशी एताः परयुताः पूज्याः पराः पूर्वेणसंयुताइति ।

कृष्णपक्षांतील तिथींविषयीं सांगतो - आपस्तंब - " प्रतिपदा द्वितीयायुक्त घ्यावी. द्वितीया प्रतिपदायुक्त घ्यावी. तृतीया चतुर्थीयुक्त घ्यावी ती फलप्रदा होते. पंचमी षष्ठीयुक्त घ्यावी. कृष्णपक्षांतील अष्टमी, चतुर्दशी, ह्या तिथि पूर्वविद्धा कराव्या, परविद्धा कदापि करुं नयेत. दशमी नवमीयुक्ता करावी. कृष्णपक्षांतील षष्ठी, अष्टमी, अमावास्या, त्रयोदशी ह्या तिथि उत्तरविद्धा घ्याव्या. आणि उत्तरतिथि पूर्वतिथिविद्धा घ्याव्या. "

यत्तुव्याघ्रः खर्वोदर्पस्तथाहिंसात्रिविधंतिथिलक्षणम्‍ खर्वदर्पौपरौपूज्यौहिंसास्यात्पूर्वकालिकीति खर्वः साम्यम्‍ दर्पोवृद्धिः तयोःपरा हिंसाक्षयस्तत्रपूर्वेत्यर्थः एतच्छ्राद्धादिविषयम्‍ द्वितीयादिषुयुग्मानापूज्यता नियमादिषु एकोद्दिष्टादिवृद्ध्यादौह्नासवृद्ध्यादिचोदनेतिव्यासोक्तेः नियमादिषु व्रतदानादिकर्मसु एकोद्दिष्टादितिथेर्वृद्ध्यादावित्यर्थः ।

आतां जें व्याघ्र सांगतो - " खर्व, दर्प, आणि हिंसा असें तीन प्रकारचें तिथिस्वरुप आहे; खर्व व दर्प हे पर घ्यावे, व हिंसा पूर्व घ्यावी. " खर्व म्हणजे साम्य, दर्प, म्हणजे वृद्धि, साम्य किंवा वृद्धि असतां परविद्धा घ्यावी, आणि हिंसा म्हणजे क्षयगामिनी असतां पूर्वविद्धा तिथि घ्यावी, असा फलितार्थ आहे. हें वचन श्राद्धादिविषयक आहे. कारण, " द्वितीयादिक तिथींचीं युग्में जीं सांगितलीं तीं व्रतें, दानें इत्यादिक देवकर्माविषयीं जाणावीं, एकोद्दिष्टादिक पित्र्यकर्मैं, तिथीची वृद्धि, क्षय यांचे निर्णयानें करावीं, अशाकरितां क्षयवृद्धीं सांगितली आहे " असें व्यासवचन आहे.

कर्मकालव्याप्त्यभावेतुकर्मोपक्रमकालगैवग्राह्या कर्मोपक्रमकालगातुकृतिभिर्ग्राह्यानयुग्मादर इतिदीपिकोक्तेः यानितु यांतिथिंसमनुप्राप्य उदयंयातिभास्करः सातिथिः सकलाज्ञेयादानाध्ययनकर्मस्वित्यादीनितानित्रिमुहूर्तादिस्तुतिरितिनिर्णयशैली ।

कर्मकालव्यापिनी नसेल तर कर्माच्या उपक्रमाचा ( आरंभाचा ) जो काल त्या कालीं असेल तीच घ्यावी. कारण, " कर्मोपक्रमकालगामिनी घ्यावी, युग्मवाक्याचा आदर नाहीं ( म्हणजे युग्मवाक्यानें निणींत असून कर्मकालव्यापिनीच तिथि आवश्यक आहे असें नाहीं. ) " असें दीपिकावचन आहे. आतां जीं " ज्या तिथींला जाऊन सूर्य उदय पावतो ती तिथि; दान; अध्ययन इत्यादि कर्माविषयीं संपूर्ण जाणावी " इत्यादिक वचनें तीं त्रिमुहूर्तादि स्तुतिपर होत, याप्रमाणें निर्णयशैली आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP