मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
उपोषणें असतां निर्णय

प्रथम परिच्छेद - उपोषणें असतां निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


अथव्रतादिसन्निपातेनिर्णयः तत्रतिथिद्वयसन्निपातेतत्रोक्तंदानहोमादिक्रमेणानुष्ठेयं अविरोधात्  इदंपूर्वारब्धेष्वेव एकमध्येन्यकाम्यकर्मारंभस्तुनभवत्येवगुणफलादृते यस्ययज्ञेप्रततेंतरायज्ञस्तायतेतंयज्ञंनिऋतिर्गृह्णातीतिराणकधृतश्रुतेः यज्ञः व्रतादिकर्ममात्रं अनंगेनव्यवधानदोषस्यसर्वत्रसाम्यात् शिष्टास्तुमाघकार्तिकस्नानादिमध्येलक्षहोमतुलाभारतश्रवणाद्याचरंतितन्नित्यमध्येऽस्तु काम्यमध्येचिंत्यम् ।

आतां एककालीं दोन तीन व्रतें किंवा उपोषणें प्राप्त असतां निर्णय सांगतो -
दोन तिथि एक दिवशीं प्राप्त झाल्या असतां त्या ठिकाणीं सांगितलेलें दान होमादिक असेल तें क्रमानें करावें. कारण, विरोध नाहीं. हा निर्णय पूर्वी आरब्ध जीं व्रतें त्यांविषयीं होतो. पूर्वी एक काम्यकर्म आरंभिलें असेल तर अंग काम्यकर्मावांचून दुसर्‍या काम्यकर्माचा आरंभ ( पूर्वारब्धाची समाप्ति झाल्यावांचून ) होत नाहीं; कारण, “ ज्याचा एक यज्ञ आरंभिला असतां ( त्याची समाप्ति झाल्यावांचून ) मध्यें दुसरा यज्ञ आरंभिला तर त्या यज्ञाला राक्षस ग्रहण करितो ” अशी राणकग्रंथांत श्रुति आहे. यज्ञ म्हणजे व्रतादिक सर्व कर्मै जाणावीं; कारण, अंगावांचून इतर कर्मानें जो व्यवधान ( अंतरजन्य ) दोष येतो तो सर्वत्र तुल्य आहे. शिष्टजन तर माघस्नान, कार्तिकस्नान इत्यादिक कर्मै आरंभून त्यांमध्यें लक्षहोम, तुलादान, भारतपुराणश्रवण इत्यादिकांचा आरंभ करितात, तो नित्यकर्मामध्यें आरंभ असो. काम्यकर्मामध्यें आरंभ प्रमाणशून्य आहे.

यत्रतुनक्तैकभक्तादौविरोधस्तत्रप्राथम्यादेकभक्तंकार्यम् नक्तंतुपरेद्यस्तत्तिथौगौणकालेकार्यम् समकालीनविरुद्धव्रतादौत्वेकंस्वयंकृत्वान्यद्भार्यादिनाकारयेदितिमाधवः यत्रतुशिवरात्र्यादौतिथिमध्येपारणयाऽह्निभोजनंप्राप्तं भूताष्टम्योर्दिवाभुक्त्वारात्रौभुक्त्वाचपर्वणि एकादश्यामहोरात्रंभुक्त्वाचांद्रायणंचरेदितितन्निषेधश्च तत्रपारणायावैधत्वाद्दिवैवभोजनम् निषेधस्तुरागप्राप्तभोजनविषयः एवमष्टम्यादिनक्तव्रतेसंक्रांत्यादौरवौसंकष्टचतुर्थ्यांचरात्रौभोजनम् ।

जेथें नक्तभोजन, एकभक्त इत्यादिक, परस्परविरुद्ध व्रतें असतात त्या ठिकाणीं प्रथम असल्यामुळें एकभक्त करावें, आणि नक्तव्रत करणें तें दुसर्‍या दिवशीं ह्या तिथीचे ठायीं गौणकालीं करावें. दोहोंचा समान काल, समान कालीं दोन विरुद्ध ( नक्तभोजन, उपोषण इत्यादि ) व्रतादिक प्राप्त होतील तर एक आपण करुन दुसरें भार्यादि प्रतिनिधिद्वारा करवावें असें माधव म्हणतो. ज्या स्थलीं शिवरात्रि इत्यादिक व्रतांचे ठायीं पारणाप्रयुक्त तिथीमध्यें दिवसा भोजन प्राप्त झालें, आणि “ चतुर्दशीस व अष्टमीस दिवाभोजन व पर्वणीस रात्रिभोजन, एकादशीस अहोरात्र भोजन केलें असतां चांद्रायण करावें ” ह्या वचनानें दिवाभोजनाचा निषेधही प्राप्त झाला, तेथें पारणा विधिप्राप्त असल्यामुळें दिवसासच भोजन करावें; दिवाभोजननिषेध तर राग ( इच्छा ) प्राप्त भोजनविषय आहे. याप्रमाणें अष्टम्यादिक नक्तव्रताच्या दिवशीं संक्रांति वगैरे असतां आणि रविवारीं संकष्टचतुर्थी असतां रात्रौ भोजन करावें.  

यत्रत्वष्टम्यादौदिवाभुजिनिषेधः संक्रमेचरात्रावितिनिषेधद्वयंतत्रोपवासएवकार्यः यद्यपिपुत्रिण उपवासोनिषिद्धस्तथाप्युपवासनिषेधेतुभक्ष्यंकिंचित्प्रकल्पयेदितिवचनात्किंचिद्भक्षयित्वोपवासः कार्यः चांद्रायणमध्ये एकादश्यादौतुग्राससंख्यानियमेनभोजनंकार्यमेव चांद्रायणस्यकाम्यत्वेननित्यबाधकत्वात् अबाधेनगत्यसंभवाच्च एकादश्यामेकांतरोपवासादिपारणायांजलपारणांकृत्वोपवसेत् आपोवाअशितमनशितंचेतिश्रुतेः एवंद्वादश्यां मासोपवासश्राद्धप्रदोषादिषुज्ञेयं एवंकाम्यनैमित्तिकनित्यत्वादिकृतंबलाबलंस्वयमूह्यमितिदिक् इतिकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौव्रतपरिभाषासमाप्ता ।

जेथें अष्टम्यादिप्रयुक्त दिवाभोजननिषेध आणि संक्रांतिनिमित्त रात्रौ भोजननिषेध असे दोन निषेध प्राप्त होतात तेथें उपवासच करावा. जरी पुत्रवान्‍ गृहस्थाला उपवास निषिद्ध आहे तथापि “ उपवासनिषेध असतां कांहीं अल्प फलादि भक्षण करावें ” असें वचन आहे यास्तव कांहीं अल्प उपहार करुन उपवास करावा. चांद्रायण व्रतामध्यें एकादश्यादि उपोषण प्राप्त झालें असतां ग्राससंख्येच्या नियमाचें भोजनच करावें. कारण, चांद्रायण हें काम्यव्रत असल्यामुळें काम्यानें नित्याच म्हणजे एकादश्यादिकांचा बाध होतो; व बाध न करुन दुसरी गतिही नाहीं. एकादशीस एकांतरोपवासादिव्रताची पारणा प्राप्त होईल तर उदकानें पारणा करुन उपोषण करावें; कारण, “ उदकपान करणें हें उपोषण व पारणा असें द्विविध ( दोन प्रकारचें ) होय ” अशी श्रुती आहे. याप्रमाणें द्वादशीचे दिवशीं मासोपवासव्रत ( एक महिनापर्यंत सतत उपवास ), श्राद्धदिनीं प्रदोषव्रत इत्यादि प्राप्त होतील तर उदकानें पारणा करावी. याप्रमाणें ( “ काम्यं नित्यस्य बाधकं ” काम्य कर्म नित्य कर्माचें बाधक होतें इत्यादि वचनांनीं ) काम्य, नैमित्तिक ( निमित्तप्राप्त ), नित्य यांचा प्रबल दुर्बल भाव स्वतः विचार करुन आचरण करणें तें करावें.

इति कमलाकरभट्टकृते निर्णयसिंधौ व्रतपरिभाषाप्रकरणे महाराष्ट्रभाषाटीका समाप्ता ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP