मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
स्त्रीव्रताविषयीं निर्णय

प्रथम परिच्छेद - स्त्रीव्रताविषयीं निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


अथस्त्रीव्रतेषुविशेष उच्यते तत्र हेमाद्रौव्रतकांडे गारुडे गंधालंकारतांबूलपुष्पमालानुलेपनं उपवासेनदुष्यंतिदंतधावनमंजनमिति इदंचसभर्तृकोपवासविषयं अंजनंचसतांबूलंकुंकुमंरक्तवाससी धारयेत्सोपवासापिअवैधव्यकरंयतः विधवायतिमार्गेणकुमारीवायदृच्छयेतितत्रैवभविष्योक्तेः तथाविष्णुधर्मे सर्वेषुतूपवासेषुपुमान्वाथसुवासिनी धारयेद्रक्तवस्त्राणिकुसुमानिसितानिच विधवाशुक्लवसनमेकमेवहिधारयेत् मनुरपि पुष्पालंकारवस्त्राणिगंधधूपानुलेपनं उपवासेनदुष्यंतिदंतधावनमंजनम् मदनरत्नेव्यासः दंतधावनपुष्पादिव्रतेप्यस्यानदुष्यतीति ।

आतां स्त्रीव्रताविषयीं विशेष निर्णय सांगतो.
हेमाद्रींत - व्रतकांडांत - गरुडपुराणांत - " सुगंधि द्रव्यें, अलंकार, तांबूल, पुष्पमाला ( पुष्पांची वेणी ), अनुलेपन ( उटी ), दंतधावन, आणि अंजन हीं उपवासाचे ठायीं सेवन केलीं असतां दोषकारक होत नाहींत. " हें वरील वचन सौभाग्यवती स्त्रीच्या उपवासविषक होय; कारण, " अंजन, तांबूल, कुंकुम आरक्त वस्त्रें हीं, उपवास करणार्‍या स्त्रियेनेंही धारण करावीं, कारण, तीं अवैधव्यकारक होत. विधवा स्त्रीनें तर यतिमार्गेकरुन व्रत करावें. कुमारीनें तर इच्छानुरुप करावें. " असें हेमाद्रींतच भविष्यवचन आहे. तसेंच विष्णुधर्मात - " पुरुष किंवा सुवासिनी यांनीं सर्व उपवासव्रतांचे ठायीं आरक्त वस्त्रें, श्वेतपुष्पें धारण करावीं; विधवा स्त्रीनें एक श्वेतवस्त्र मात्र धारण करावें. " मनुही  " पुष्पें, अलंकार, रंगीत वस्त्रें, सुगंधि पदार्थ, धूप, चंदनादिकांची उटी, दंतधावन, अंजन हीं उपवासाचे ठायीं दोषकारक नाहींत. ” मदनरत्नांत - व्यास - " दंतधावन, पुष्पादिक, हीं स्त्रीला व्रताचे ठायीं दोषकारक नाहींत. "

यद्यपीदंसर्वोपवासविषयंप्रतीयतेतथापिशिष्टाचारात्सौभाग्यद्यर्थंक्रियमाणनवरात्रत्रिरात्राद्युपवासविषयमेव नत्वेकादश्यादिविषयं असकृज्जलपानाच्चसकृत्तांबूलचर्वणात् उपवासः प्रणश्येतदिवास्वापाच्चमैथुनादित्यपरार्केदेवलेनतन्निषेधात् नचास्यपुंविषयत्वेनसावकाशत्वात्स्त्रीणांतांबूलादिप्राप्नोतीतिवाच्यम् तांबूलादिप्रापकस्यैवैकादशीतरविषयत्वेनवैपरीत्यस्यापिसुवचत्वात्

जरी हें वरील सांगणें सर्व उपवासविषयक आहे असें दिसून येतें, तथापि शिष्टाचारावरुन, सौभाग्यादिवृद्ध्यर्थ करावयाचीं जीं नवरात्र, त्रिरात्र, इत्यादिक काम्य उपवासव्रतें तद्विषयकच होय, एकादश्यादिव्रतविषयक नाहीं; कारण, " वारंवार उदकपान, एकवार तांबूलभक्षण, दिवानिद्रा, मैथुन यांहींकरुन उपवास नाश पावतो. ” ह्या अपरार्कांतील देवल वचनानें तांबूलादिकांचा निषेध केला आहे. आतां हें वचन पुरुषपर मानिलें असतां वचनाला सार्थक्य येऊन स्त्रियांला तांबूलादिभक्षणाधिकार येईल असें म्हणूं नये; कारण, तांबूलादिप्रापक जें वचन तेंच एकादशी इत्यादि व्यतिरिक्तविषयक आहे, असें म्हटल्यानें तांबूलादिनिषेधही सांगण्यास शक्य आहे.

यत्तुहरिवंशे अंजनंरोचनंचैवगंधान्सुमनसस्तथा व्रतेचैवोपवासेचनित्यमेवविवर्जयेत् शिरसोभ्यंजनं सौम्येनैवमेतत्प्रशस्यते नपादयोर्नगात्रस्यस्नेहेनेतिस्थितिः स्मृतेति तत्तत्रैवोक्तपुण्यकव्रतविषयं नतुसर्वत्र पूर्वोक्तविरोधादिति मदनरत्नेउक्तं तत्रैव अश्रुप्रपातोरोषश्चकलहस्यकृतिस्तथा उपवासाद्व्रताद्वापिसद्योभ्रंशयतिस्त्रियं स्त्रियमित्युपलक्षणं मदनरत्नेशिवधर्मे दानव्रतानिनियमाज्ञानंध्यानंहुतंजपः यत्नेनापिकृतंसर्वंक्रोधितस्यवृथाभवेत् ।

आतां जें हरिवंशांत - " अंजन, गोरोचन, सुगंधिद्रव्यें, पुष्पें, हीं व्रत, उपवास यांचे ठायीं नित्य वर्ज्य करावीं. स्नेहानें ( तैलादिकानें ) मस्तकाला अभ्यंग करणें प्रशस्त नाहीं, तसाच पाय व शरीर यांना स्नेहानें अभ्यंग प्रशस्त नाहीं; असी शास्त्रमर्यादा आहे ” असें तें त्या ठिकाणींच उक्त जें पुण्यकव्रत तद्विषयक होय; सर्व व्रतांविषयीं नाहीं; कारण पूर्वोक्त वचनाशीं विरोध येतो, असें मदनरत्नांत सांगितलें आहे. तेथेंच सांगतो - “ उपवास, व्रत यांचे ठायीं अश्रुपात, क्रोध, कलह हीं केलीं असतां स्त्रियेला व्रतापासून भ्रष्ट करितात. ” ‘ स्त्रियेला ’ असें जें पद तें व्रती याचें उपलक्षण आहे. मदनरत्नांतशिवधर्मांत - “ दानें, व्रतें, नियम, ज्ञान, ध्यान, होम, जप हीं यत्नानें जरी केलीं असतील तरी क्रोध आला असतां सर्व व्यर्थ होतात. ”

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP