TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
मंगलारंभ

प्रथम परिच्छेद - मंगलारंभ

प्रस्तुत ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


मंगलारंभ

॥ श्री गणेशाय नमः ॥

यन्नामग्रहणाद्देवा अपि मंगलमाप्नुवन् ‍ ॥ ऋद्धिसिद्धोः प्रदातारं तं नमामि गजाननम् ‍ ॥१॥

अगाधं दुस्तरं सिंधुं तर्तु निर्णयपूर्वकम् ‍ ॥ विरचिष्ये बालबोधां तरणिं देशभाषया ॥२॥

अग्न्यादितरणीभिर्यः पारं गंतुं न शक्यते ॥ साधारणैः स हस्ताभ्यां तर्तुमिच्छेद्यथा पुमान् ‍ ॥३॥

उपहासास्पदं याति तथैवाहं निराश्रयः ॥ तरणिं कर्तुमुत्सेहे सहायो हरिरस्तु मे ॥४॥

अशी विज्ञापना करुन निर्णयसिंधूच्या मराठी टीकेला आरंभ करितों .

कारुण्यैकनिकेतं रामं सीतालतायुक्तम् ‍ ॥ विश्वामित्रान्ववायव्रततिसमालंबिशाखिनं वंदे ॥१॥

कारुण्याचें मुख्य आस्पद ( स्थान ), सीतारुप वल्लीनें समन्वित , विश्वामित्राची गोत्ररुप जी वल्ली तिला आश्रयभूत असा जो रामरुप वृक्ष त्याला नमस्कार करितों ॥१॥

लक्ष्मीसहायं कल्पद्रुतलरंजितगोकुलम् ‍ ॥ बर्हापीडं घनश्याम महः किंचिदुपास्महे ॥२॥

लक्ष्मीला सहायभूत किंवा लक्ष्मी आहे सहाय ( बरोबर ) ज्याच्या असें ( लक्ष्मीसहित ), कल्पवृक्षांच्या तलांनीं अनुरंजित केलें आहे गोकुळ ज्यानें असें , मयूरपिच्छ - भूषणानें युक्त , सजल मेघाप्रमाणें श्यामवर्ण , अशा एक प्रकारच्या तेजाची आम्हीं उपासना करितों . ॥२॥

वेदार्थधर्मरक्षायै मायामानुषरुपिणम् ॥ पितामहं हरिं वंदे भट्टनारायणाह्वयम् ` ॥३॥

वेदप्रतिपाद्य धर्माच्या संरक्षणाकरितां मायेच्या योगानें मनुष्यरुप धारण करणारा साक्षात् ‍ हरि असा जो आमचा ( ग्रंथकर्त्याचा ) पितामह भट्टनारायण ( नारायणभट्ट ) त्याला नमस्कार करितों . ॥३॥

यत्पादसंस्मृतिः सर्वमंगलप्रतिभूर्मता ॥ तान् ‍ भट्टरामकृष्णाख्यान् ‍ श्रीतातचरणान्नुमः ॥४॥

ज्याच्या पायांचें स्मरण सर्व मंगलांना जामिनाप्रमाणें साधन करणारें आहे त्या भट्टरामकृष्णसंज्ञक पित्याला नमस्कार करितों . ॥४॥

सर्वकल्याणसंदोहनिदानं यत्पदद्वयम् ॥ द्युनदीसोदरीमंबामुमाख्यां नौमि सादरम्॥५॥

जिचे पाय सर्व प्रकारच्या कल्याणांच्या समुदायांचें निदान ( आदिकारण ) आहे , व जी भागीरथीची सोदर भगिनीरुप ( परम पवित्र ) उमानामक माता तिला आदरपूर्वक नमस्कार करितों . ॥५॥

बिंदुमाधवपादाब्जरोलंबीकृतविग्रहम् ॥ ज्यायांसं भ्रातरं भट्टदिवाकरमुपास्महे ॥६॥

भगवान् ‍ बिंदुमाधवाच्या चरणकमलीं भृंगाप्रमाणें लुब्ध केला आहे देह ज्यानें असा जो आमचा ( ग्रंथकर्त्याचा ) ज्येष्ठ भ्राता दिवाकरभट्ट त्याची आम्हीं ( कमलाकरभट्ट ) उपासना करितों . ॥६॥

हेमाद्रिमाधवमते प्रविचार्य सम्यगालोच्य तत्त्वमथ तीर्थकृतां परेषाम् ॥

श्रीरामकृष्णतनयः कमलाकराख्यः काले यथामति विनिर्णयमातनोति ॥७॥

हेमाद्रि व माधव यांच्या मतांचा उत्तम प्रकारानें विचार करुन व इतर धर्मशास्त्रकारांच्या तत्त्वांचें आलोचन करुन श्रीरामकृष्णभट्टांचा पुत्र कमलाकर कालाविषयीं यथामति निर्णय करितो . ॥७॥

संति यद्यपि विद्वांसस्तन्निबंधाश्च कोटिशः ॥ तथाप्यमुष्य वैदग्धीं केचिद्विज्ञातुमीशते ॥८॥

जरी कालनिर्णय जाणणारे विद्वान् ‍ व त्या विद्वानांचे ग्रंथ कोट्यवधि आहेत तथापि या ग्रंथाची कौशल्यशैली जाणण्याविषयीं कितीएक विद्वान् ‍ समर्थ होतात . ॥८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-05-09T05:42:16.6230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कुरोंडी

  • स्त्री. कुरवंडी पहा .' साकरेची कीजे करौंडी । ' - शिशु १८ . ' केली स्वर्गसंसाराची कुरोंडी । ' - ज्ञा ६ . २८ . 
RANDOM WORD

Did you know?

Wife disgracing, defaming her husband, what is the solution ?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.